जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
विशेष दिन

कोपरगावात,’आंतरराष्ट्रीय योग दिवस’ उत्साहात संपन्न

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरात दरवर्षी योग संस्थेच्या वतीने,’आंतरराष्ट्रीय योग दिवस’ साजरा करण्यात येत असून यावर्षी आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.

दि.२१ जून हा दिवस संपूर्ण जगभरात जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जातो.योग ही भारताने जगाला दिलेली एक अनमोल देणगी आहे.संपूर्ण जगभरात योग दिन साजरा व्हावा यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत भारताचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रस्ताव मांडला होता त्यास त्यांनी मंजुरी दिली असून आता कोपरगावसह हा दिन जगभर साजरा करण्यात आला आहे.शहरात योग संस्थेच्या वतीने हा दिन उत्साहात साजरा करण्यात आला आहे.

कोपरगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी,राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्षओमप्रकाश कोयटे,तालुका आरोग्य अधिकारी विकास घोलप,कोपरगाव ग्रामीण पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे,इंजिनिअर फुलारी,पराग संधान,दिपक साळुंखे,दत्ता काले,डॉ.अशोक गावित्रे,रंजना परजणे,सुनीता नरोडे,भारती शिरोडे,संगीता नरोडे,वैशाली अमृतकर आदी अनेक नागरिक योग साधक साधिका मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमास उपस्थित होते.

गेल्या तेवीस वर्षांपासून महिलांसाठी निःशुल्क योग वर्ग चालविणाऱ्या योग संस्थेच्या योग शिक्षिका विमल पुंडे व दत्ता पुंडे यांचा कोपरगाव करांचे वतीने पतसंस्था फेडरेशनचे नेते ओमप्रकाश कोयटे,भाजप (कोल्हे गट) कार्यकर्ते पराग संधान व सर्व मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आला आहे.नगर परिषदेचे मुख्याधिकारी व सहकारी अधिकाऱ्यांनी गोदावरी घाटाचे सौंदर्यीकरण हाती घेतले त्याबद्दल नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे.उपस्थित योग साधकांचा योग शिक्षक दत्ता पुंडे यांचे मार्गदर्शनाखाली योगाभ्यास घेण्यात आला.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अर्चना लाड यांनी केले तर सदर प्रसंगी उपस्थितांचे विमल पुंडे यांनी आभार मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close