जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
विधी व न्याय विभाग

पढेगाव स्मशानभूमीचा निर्णय तीन आठवड्यांनी-खंडपीठांचा आदेश

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद औरंगाबाद खंडपीठात श्रीरामपूर तालुक्यातील पढेगांव ग्रामपंचायतीसाठी मागणी केलेल्या शेती महामंडळाची जागेचा निर्णय तीन आठवड्यानंतर देणार असल्याची माहिती वकील संघाचे माजी अध्यक्ष अड्.अजित काळे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

“सदर पढेगाव स्मशानभुमीची सुनावणी दि.१९ जुलै रोजी न्या.गंगापुरवाला व न्या.आर.एन.लढ्ढा यांच्या खंडपीठा पुढे आली असता उच्च न्यायालयाने जिल्हाधिकारी,महामंडळ,प्रांत व तहसिलदार यांना आपले म्हणणे तीन आठवडयाच्या आत सादर करण्याचा आदेश दिला आहे.व त्या बाबत चौकशी करण्यास सांगितले आहे. सदर प्रकरण हे आता तीन आठवडयानंतर सुनावणीस येणार आहे”-अड्.अजित काळे.औरंगाबाद खण्डपीठ.

सदरचे सविस्तर वृत असे की,श्रीरामपूर तालुक्यातील पढेगांव येथील शेती महामंडळाची गट नं.-५१ ही जमीन ग्रामपंचायत पढेगांवच्या स्मशानभूमी,दशक्रिया विधी,पाणीपुरवठा व तत्सम सार्वजनिक प्रयोजनासाठी सन-२०१५ पासून संबंधित ग्रामपंचायत व मागासवर्गीय,आदिवासी संघटना करत आहे.
सदर क्षेत्र हे प्रवरा नदी काठाच्या तीरावर असल्याने तो स्मशानभूमीसाठी सुलभ असुन ग्रामस्थांचा प्रलंबित प्रश्न कायमचा सुटणार आहे.त्यामुळे ग्रामस्थ व विविध संघटनांकडून सातत्याने सदर जागा ही ग्रामपंचायतीस मिळावी म्हणून पाठपुरावा सुरु असून त्यासाठी ग्रामसभेचे ठराव देखील झाले आहेत तसेच दि.०४ मे २०१२ च्या खंडकरी जमिन वाटप नियमाप्रमाणे जर एखादी जागा सार्वजनिक प्रयोजनास लागत असल्यास ती जागा वाटपास काढु नये अशी स्पष्ट तरतुद शासनादेशात आहे.
सदर जागे संदर्भात ठराव करुन व ग्रांमपंचायतीच्या वतीने विविध कार्यालयात मागणी करुन देखील ती प्रशासनाने अदाखलपात्र केली आहे.ती जमिन ही गावा बाहेरील खंडक-यांना काही प्रतिष्ठीत व्यक्तीच्या आग्रहाखातर वाटण्याचा घाट घातला गेला असल्याचे समजते.सदर जमिनी पैकी सहा एकर जमिन १३ लोकांना वाटप करण्यासाठी दबाव येत होता.तसेच खंडकरी शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची जमीन मिळावी तेथील ग्रामस्थांची मागणी आहे.परंतु खंडकरी शेतकऱ्यांना हिच जमीन मिळावी म्हणून श्रीरामपूर येथील काही प्रतिष्ठीत व्यक्तींनी दबाव वाढवला आहे.
नमुना नं.-३ तयार करण्यात आला असला तरी त्यांना गावातील शेती महामंडळाची इतर गटा मधील उपलब्ध असलेली जमिन वाटप केल्यास त्याचे कोणतेही नूकसान होणार नाही. उलट पक्षी ग्रामपंचायतीला सदरची जागा मिळाल्यास ग्रामस्थांची कायमची अडचण दूर होणार आहे.त्यामुळे ग्रामपंयातीच्या वतीने सदर जागा मिळावी म्हणून उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खण्डपीठात सचिन बाबसाहेब तोरणे यांच्या वतीने याचिका दाखल करण्यात आली आहे.

सदरची सुनावणी दि.१९ जुलै रोजी न्या.गंगापुरवाला व न्या.आर.एन.लढ्ढा यांच्या खंडपीठा पुढे आली असता उच्च न्यायालयाने जिल्हाधिकारी,महामंडळ,प्रांत व तहसिलदार यांना आपले म्हणणे तीन आठवडयाच्या आत सादर करण्याचा आदेश दिला आहे.व त्या बाबत चौकशी करण्यास सांगितले आहे. सदर प्रकरण हे आता तीन आठवडयानंतर सुनावणीस येणार आहे.हा विषय सर्व ग्रामस्थांच्या जिव्हाळयाचा असल्याने सदर याचिकेकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे. सदर याचिकेत ग्रांमपचायतीच्या वतीने ॲड.अजीत बबनराव काळे हे तर महामंडळाच्या वतीने अड्.पराग बरडे काम पाहत आहे.याचिकेची आगामी सुनावणी आता दि.०९ ऑगष्ट रोजी संपन्न होणार आहे.
या बाबत सदर जागा ही भुसंपादनाची कार्यवाही करून मिळण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने अर्ज करण्यात येणार असल्याची माहिती सचिन तोरणे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close