विधी व न्याय विभाग
कोपरगाव राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव येथील न्यायालयात दि.०१ ऑगष्ट रोजी सकाळी १०.३० वाजता राष्ट्रीय लोक न्यायालयाचे आयोजन केल्याची माहिती जिल्हा व सत्र न्यायालयाचे सरकारी वकील अशोक वहाडणे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.
लोक न्यायालयांच्या माध्यमातून आजवर हजारो खटले तडजोडीने सोडविण्यात यश आले आहे.सलग सहा वर्षांपासून राबविल्या जाणाऱ्या या मोहिमेत महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि तालुका विधी सेवा समिती यांचे तंटे मिटविण्याच्या कामी सहाय्य घेण्यात यावे अशा सूचना शासनाने आधीच केल्या आहे. त्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना व कार्यवाहीची पद्धतही निश्चित करून देण्यात आली आहे.
लोकन्यायालय म्हणजे काय ? वाद उद्भवला तर तो शक्यतोवर सामंजस्याने सोडवावा हि आपली प्राचीन परंपरा. गावातील जुनी–जाणती मानसे एकत्र येत आणि कोणाही मध्ये उद्भवलेला कुठल्या हि स्वरूपाचा वाद समजुतीने मिटवीत.ज्यांच्यापुढे वाद नेला जाई ते त्या गावातील आदरणीय आणि नि:पक्षपाती लोक असत. यालाच ‘गाव-पंचायत असे म्हणत. सध्याचे ‘लोकन्यायालय’ म्हणजे या गाव पंचायतीचेच आधुनिक रूप,जेथे कायदा जाणणाऱ्या नि:पक्षपाती लोकांचे न्यायमंडळ त्यांच्यापुढे येणाऱ्या प्रकरणांमध्ये सामंजस्याने न्याय्य तडजोड घडवीते.समाजातील सांविधिक न्यायपद्धतीला पूरक,मुख्यत्वे लोकांचा सहभाग असलेली,पक्षकारांना परवडणारी,कमी खर्चाची आणि सुलभ व लवकर न्याय मिळवून देणारी न्याययंत्रणा. समाजातील सर्व लोकांना, विशेषतः दुर्बल, मागास व न्यायापासून वंचित असलेल्यांना,तिचा निश्चित चांगला फायदा होऊ शकतो.या दृष्टीने आधुनिक काळात लोकन्यायालये प्रकर्षाने विकसित होत आहेत.
लोक न्यायालयांच्या माध्यमातून आजवर हजारो खटले तडजोडीने सोडविण्यात यश आले आहे.सलग सहा वर्षांपासून राबविल्या जाणाऱ्या या मोहिमेत महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि तालुका विधी सेवा समिती यांचे तंटे मिटविण्याच्या कामी सहाय्य घेण्यात यावे अशा सूचना शासनाने आधीच केल्या आहे. त्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना व कार्यवाहीची पद्धतही निश्चित करून देण्यात आली आहे. दिवाणी, महसुली व इतर न्यायालयात प्रलंबित दाव्यात तडजोड झाल्यानंतर उभय पक्षकारांच्या स्वाक्षरीने न्यायालयात वा सक्षम प्राधिकाऱ्याकडे पक्षकारांनी अथवा त्यांच्या वकीलामार्फत तडजोडनामा तयार करून त्यावर न्यायालयाचे अथवा सक्षम प्राधिकाऱ्यांचे आदेश प्राप्त करून घेण्याची एक पद्धती आहे.या पद्धतीत शासनाने लोक न्यायालयांकडे अर्ज करून तडजोडनामा दाखल करावा आणि लोक न्यायालयाकडून हुकुमनामा अथवा आदेश प्राप्त करून घेण्याचीही पद्धती तंटे मिटविण्यासाठी अवलंबिण्याचा निर्णय घेतला आहे. लोक न्यायालयाचा हुकूमनामा अथवा आदेश प्राप्त झाल्यानंतर त्याची सत्यप्रत अभिलेखांवर घेवून त्याद्वारे तंटा मिटला असे समजले जाते.अशा तंट्याची संख्या मोठी आहे.त्यामुळे असे तंटे मिटविण्यासाठी लोकन्यायालयांची गरज निर्माण झाली आहे.कोपरगावात असे लोक न्यायालय आयोजित केले आहे हि समाधानाची बाब आहे.
कोपरगावात आयोजित करण्यात आलेल्या लोक न्यायालयात सर्व बँका,पतसंस्था,महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी,मोटार अपघात प्रकरणे,या खेरीज न्यायालयात प्रलंबित असलेली तडजोड पात्र दिवाणी,फौजदारी प्रकरणे ठेवली जाणार आहे.संबंधित नागरिकांनी आपल्या वकीलांशी चर्चा करून संपर्क साधून आपले खटलेराष्ट्रीय लोक न्यायालयात ठेवण्यास सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा न्यायाधीश तथा तालुका विधी समितीचे अध्यक्ष एम.एस.बोधनकर,जिल्हा न्या.स.बा.कोऱ्हाळे आदींनी केले आहे.