विधिमंडळ कामकाज
साईबाबांची,’श्रद्धा सबुरी’ कामी आली-मुख्यमंत्री
न्यूजसेवा
शिर्डी (प्रतिनिधी)
सध्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनामध्ये महाराष्ट्राचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झालेले देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये चर्चा करताना श्री साईबाबांचा विशेष उल्लेख करून श्री साईबाबांची श्रद्धा सबुरी ची शिकवण प्रत्येकाने अंगीकारली तर नक्कीच जीवनातील दुःख कमी होईल व योग्य ती वाट मिळेल असे आपले वैयक्तिक मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अधिवेशनात बोलताना म्हणाले की,”जीवनात संयम हा महत्त्वाचा आहे.संयम म्हणजेच सबुरी,श्री साईबाबांची भक्ती हा प्रत्येकाचा वैयक्तिक विषय आहे.मात्र साईबाबांच्या पाठीमागे श्रद्धा व सबुरी हे दोन शब्द आहेत.त्यांची श्रद्धा व सबुरी ची शिकवण राजकारण्यांनी प्रत्यक्षात आचरणात आणली तर नक्कीच दुःख कमी होण्यास मदत होईल व आपली वाटचालही मोकळी होण्यास काहीशी मदत झाल्याशिवाय राहणार नाही असे त्यांनी सांगत श्री साईबाबांचा उल्लेख अधिवेशनात केला आहे.
श्रद्धा सबुरी ची शिकवण साईबाबांनी संपूर्ण विश्वाला दिली.या शिकवणीचे आचरणही राजकारणी नेत्यांनी केले तर नक्कीच त्याचा फायदा होईल असे जणू व्यक्तिगत मत त्यांचे त्यातून असू शकते हे दिसून आले.कारण मुख्यमंत्री सुद्धा हे एक साईभक्त आहेत ते अनेकदा शिर्डीला येऊन साईबाबांचे त्यांनी दर्शन घेतले आहे.त्यामुळे नक्कीच साईंच्या श्रद्धा सबुरीचा शिकवणीचा त्यांच्यावर एक मोठा पगडा आहे व तो त्यांनी गेले अडीच वर्षाच्या अडचणीच्या कालावधीत आपल्या आचरणात राखला,त्यामुळेच त्यांना परत हे दिवस आले व मी पुन्हा येणार ! हा जो नारा त्यांनी लगावला होता.तो साईंच्या शिकवणीच्या श्रद्धा सबुरीमुळेच परत एकदा तो नारा सिद्ध करण्यात ते यशस्वी ठरले आहेत.व परत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत.अशी चर्चा आता या त्यांच्या विधानसभेतील साईंच्या श्रद्धा सबुरीचा वक्तव्यामुळे नागरिकांमधून होत आहे.व त्यामुळे त्यांचे कौतुकही होत आहे.
श्री साईंची श्रद्धा सबुरी ची शिकवण राजकारण्यांनी आचरणात आणली तर नक्कीच दुःख कमी होऊन योग्य ती वाटही मिळू शकेल-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत आपले व्यक्तिगत मत केले व्यक्त केले आहे.