जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
वन व पर्यावरण

बिबट्याचा बंदोबस्त करा -…या नेत्याची मागणी

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

   संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग गावात दि.13 डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास बिबट्याने एका चार वर्षीय चिमुकल्याचा बळी घेतल्याची धक्कादायक घटना घडली असून या ठिकाणी शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी कडलग कुटुंबाची भेट देऊन सांत्वन केले आहे.

शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी जवळे कडलग याठिकाणी जाऊन कडलग कुटुंबाची भेट देऊन सांत्वन केले तो क्षण.

   

“अहिल्यानगर जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि अजूनही सरकार याकडे गांभीर्याने पाहत नाही,हे अत्यंत निंदनीय आहे.बिबट प्रजनन नियंत्रणात कशा प्रकारे करता येईल,दिवसा थ्री फेज लाईटची सुविधा आणि या सततच्या हल्ल्यांना राज्य आपत्ती घोषित करण्याची मागणी आम्ही सरकारकडे वेळोवेळी केली आहे.सरकारने तातडीने ठोस पावले उचलावीत,अन्यथा संतप्त जनता सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही”-खा.भाऊसाहेब वाकचौरे,शिर्डी लोकसभा मतदार संघ.

  राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये बिबट्याची चांगलीच दहशत पसरली आहे.विशेषतः पुणे,नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये बिबट्यांनी धुमाकूळ घातला आहे.उसात लपण्यासाठी जागा,मुबलक प्रमाणात पाणी आणि खाद्य म्हणून पाळीव प्राणी यामुळे बिबट्यांची संख्या वाढतच चालली आहे.आता हे बिबट्या शिकारीच्या शोधात वस्त्यावर आणि गावात शिरत असल्याचं पहायला मिळत आहे,बिबटे पाळीव प्राण्यांसोबतच लहान मुलं आणि वृद्ध माणसांवर देखील हल्ले करत असल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.कोपरगाव तालुक्यातील टाकळी फाटा या ठिकाणी एका ऊसतोड कामगाराची मुलगी ठार झाल्या नंतर येसगाव येथील एक महिला घास कापत असताना बिबट्याचे त्याच्यावर हल्ला करून तिला जागीच ठार केले होते.त्यानंतर जवळके,सुरेगाव,ब्राम्हणगाव आदी परिसरात बिबट्याने आपली दहशत निर्माण केली असून या धास्तीने अनेक शेतकऱ्यांनी शेतात जाणं देखील सोडून दिलं आहे.दरम्यान या बिबट्यांना आवर घालणं आणि त्यांच्यापासून लोकांचं संरक्षण करणं हे प्रशासनासाठी तसेच वनविभागासाठी डोकेदुखीचं काम ठरलं आहे.या बाबत अशीच एक घटना जवळे कडलग या ठिकाणी एका बालकावर बिबट्याने हल्ला केला.या हल्ल्यात चि.सिद्धेश सुरज कडलग या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.या घटनेची माहिती मिळताच शिर्डीचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी कडलग कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले आहे.

  त्यावेळी खा.वाकचौरे यांनी म्हटले आहे की,”उत्तर नगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याच्या हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे.दररोज बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू व कित्येक जण जखमी व्हायला लागले तर आम्ही घराबाहेर पडायचे कसे असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.आता घटना घडल्यानंतर वनविभागाचे अधिकारी,शासकीय यंत्रणा,लोकप्रतिनिधी घटनास्थळी भेट देतील व कुटुंबियांचे सांत्वन करतील.परंतु,केवळ सांत्वन करून हा प्रश्न सुटणार नाही.बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभाग आणि रेस्क्यू पथकांचे शोधकार्य सुरु आहे,मात्र हा तात्पूरता उपाय आहे.बिबट्याच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी तातडीने कठोर पावले उचलली पाहिजे अशी मागणी खा.वाकचौरे यांनी केली आहे.जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि अजूनही सरकार याकडे गांभीर्याने पाहत नाही,हे अत्यंत निंदनीय आहे.बिबट प्रजनन नियंत्रणात कशा प्रकारे करता येईल,दिवसा थ्री फेज लाईटची सुविधा आणि या सततच्या हल्ल्यांना राज्य आपत्ती घोषित करण्याची मागणी आम्ही सरकारकडे वेळोवेळी करत आलो आहोत.सरकारने तातडीने ठोस पावले उचलावीत,अन्यथा संतप्त जनता सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा त्यांनी शेवटी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close