जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
वन व पर्यावरण

  …या तालुक्यात अवैध वृक्षतोड,वन अधिकाऱ्यांचा कानाडोळा !

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)
 
  कोपरगाव तालुक्यातील कोळगाव थडी ग्रामपंचायत हद्दीत आज काही इसमांनी अवैधरित्या वृक्षतोड केली असल्याने दिसून आले असून याबाबत वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडे काही नागरिकांनी तक्रार करूनही त्याकडे त्यांनी सोयीस्कररीत्या कानाडोळा केला असल्याचा धक्कादायक आरोप येथील कार्यकर्ते अक्षय निकम यांनी केला आहे.

दरम्यान याबाबत कोपरगाव येथील वन विभागाचे प्रभारी अधिकारी निलेश रोडे यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी,”संबंधित ठिकाणी वृक्षतोड करणाऱ्या इसमाचा ट्रॅक्टर,बाभळीची लाकडे,लाकूड तोडण्याचे यंत्र आदी जप्त करून पुढील कारवाई केली असल्याची माहिती दिली आहे.

   अलिकडच्या एका सरकारी अहवालात भारताचा वन स्थिती अहवाल सकारात्मक असल्याचे दिसून आले आहे,कारण त्यात असे दिसून आले आहे की देश काही निवडक राज्यांमध्ये वन आच्छादन वाढवत आहे आणि नकारात्मक म्हणजे इतर राज्यांमध्येही देशाचे वन आच्छादन कमी होत असल्याचे उघड झाले आहे.केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी गतवर्षी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीत ही बाब उघड झाली आहे.उत्सर्जन कमी करण्याच्या जागतिक प्रयत्नात विशेषतः घनदाट जंगले महत्त्वाची आहेत.घनदाट जंगलाचे प्रमाण कमी झाल्यामुळे,हवामान,वन्यजीव आणि पाण्यावर परिणाम झाल्यामुळे ही पर्यावरणीय कार्ये कमकुवत होऊ शकतात.जागतिक तापमान वाढ होऊन समुद्रलगतची शहरे पाण्याखाली जाऊ शकतात असे जागतिक संघटनेने जाहीर केले असले तरीही वन विभाग याकडे सोयीकररीत्या कानाडोळा करताना दिसत आहे.त्याचे ताजे उदाहरण आज कोपरगाव तालुक्यातील कोळगाव थडी ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या गायरान जमिनीतील वृक्षतोडीतून उघड झाले आहे.ही वृक्षतोड थेट ट्रॅक्टर,झाड तोडणी संयंत्र यांच्या सहाय्याने सुरू होती.याबाबत काही जागृत ग्रामस्थानी ही बाब वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली.वन अधिकाऱ्यांनी आपल्या वाहनासह घटनास्थळी भेट दिली मात्र कार्यवाही होत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.


  या बाबत ग्रामपंचायत पदाधिकारी,सदस्य,तंटामुक्ती अध्यक्ष आदींनी तक्रार करूनही संबंधित वन अधिकाऱ्यांनी त्यावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न केल्याची माहिती हाती आली आहे.त्यामुळे काही नागरिकांनी भ्रमनध्वनीवरून आ.आशुतोष काळे यांचे कार्यालयास या प्रश्नी लक्ष वेधून घेतले होते.त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत बजावले असताना या अवैध वृक्षतोडीला आळा बसला नाही.त्याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.

आमच्या प्रतिनिधीने तेथील सरपंच मीनल गवळी यांचे भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी गोदावरी काठी गट क्रमांक ०१ मध्ये गायरान जमिनीचे ७.२८ हेक्टर क्षेत्र असल्याचे मान्य केले आहे.मात्र त्या ठिकाणी वृक्षतोड सुरू असल्याबाबत आपल्याला माहिती नसल्याचे सांगितले आहे.

  याबाबत आमच्या प्रतिनिधीने तेथील सरपंच मीनल गवळी यांचे भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी गोदावरी काठी गट क्रमांक ०१ मध्ये गायरान जमिनीचे ७.२८ हेक्टर क्षेत्र असल्याचे मान्य केले आहे.मात्र त्या ठिकाणी वृक्षतोड सुरू असल्याबाबत आपल्याला माहिती नसल्याचे सांगितले आहे.त्याबाबत आपण माहिती घेऊन कळवतो असे सांगितले आहे.

    दरम्यान याबाबत कोपरगाव येथील वन विभागाचे प्रभारी अधिकारी निलेश रोडे यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी,”संबंधित ठिकाणी वृक्षतोड करणाऱ्या इसमाचा ट्रॅक्टर,बाभळीची लाकडे,लाकूड तोडण्याचे यंत्र आदी जप्त करून पुढील कारवाई केली असल्याची माहिती दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close