जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
वन व पर्यावरण

बिबट्याचा तरुणावर जीवघेणा हल्ला,गंभीर जखमी

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)


   कोपरगाव तालुक्यातील अंजनापुर येथील रहिवासी मात्र लोणी येथील महाविद्यालयात आपल्या दुचाकीवरून जाणारा तरुण सचिन भाऊसाहेब गव्हाणे (वय-२१) यांचेवर ऐन होळीच्या दिवशी काल सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास मनेगाव-काकडी विमानतळ मार्गे जात असताना विमानतळ भिंतीच्या आड दबा धरून बसलेल्या बिबट्याने जोरदार हल्ला चढवल्याने त्यात तो गंभीर जखमी झाला आहे.त्यांचेवर लोणी येथील रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.त्यामुळे कोपरगाव संगमनेर तालुक्यातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

जखमी तरुण सचिन गव्हाणे अंजनापुर हा छायाचित्रात दिसत आहे.

  

अंजनापुर येथील तरुण सचिन गव्हाणे हा रांजणगाव देशमुख,मनेगाव वरून डांगेवाडी चौफुलीवर जावून विमानतळ भिंतीजवळ लागून जांभुळवाडी फाट्यावरून जात असतो.काल सकाळी तो आपल्या दुचाकीवरून जात असताना विमानतळ भिंतीच्या खड्ड्यात लपलेल्या बिबट्याने सावज आपल्या टप्प्यात आल्यावर थेट मोटारसायकल वर झेप घेऊन तरुणावर हल्ला चढवला होता.त्यामुळे त्याचा तोल जावून तो खाली पडला असून त्यात सदर बिबट्याने त्यांचेवर हल्ला केल्याने तो गंभीर जखमी झाला आहे.

  अहिल्यानगर जिल्ह्यात सध्या बिबट्यांनी धुमाकूळ घातला असून,त्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेले वनखाते मात्र बिबट्याला पकडण्यात पूर्णत: अपयशी ठरले आहे.बिबट्याला पकडणारे विशेष पथक व आवश्यक यंत्रणेचा अभाव असल्यामुळे हे संकट दूर करण्यात वन विभाग अपयशी ठरत असल्याची जाहीर कबुली अधिकारी देत असल्याने बिबट्याचा संचार असलेल्या भागांतील ग्रामस्थांची मात्र झोप उडाली आहे.नगर जिल्ह्यात बिबट्यांचा नेहमीच संचार असतो.मात्र,जंगलात संचार करणारे बिबटे गेल्या काही वर्षापासून नागरीवस्तीत येऊन जनावरे व माणसांना लक्ष्य करत आहेत.मागीलवर्षी गोगलगाव नजीक एका लहान बालकावर हल्ला करून त्याचा जीव घेतला होता.गेल्या काही महिन्यात बिबट्या ग्रामस्थांना समक्ष दिसल्याच्या व काही जनावरांवर हल्ला केल्याच्या घटनाही घडल्या आहेत.

ग्रामस्थांना दिसलेला व कॅमेऱ्यात कैद झालेला बिबट्या छायाचित्रात दिसत आहे.

   कोपरगाव तालुक्यात धोंडेवाडी,जवळके आदी ठिकाणी बिबटे वारंवार दिसत आहे.मागील तीन महिन्यांपूर्वी जवरे वस्तिसह जवळके शिवांरात व गावठाण हद्दीतील बिबट्या दिसला होता.त्यामुळे ग्रामस्थांत भीतीचे वातावरण पसरले आहे.अशीच घटना काल होळीच्या दिवशी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास काकडी विमानतळावर उघड झाली आहे.यातील अंजनापूर येथील रहिवासी असलेला तरुण सचिन गव्हाणे हा लोणी येथील महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेत आहे.तो दररोज अंजनापूर या ठिकाणाहून लोणी येथे ये-जा करत असतो.त्यासाठी तो अंजणापुर रांजणगाव देशमुख,मनेगाव वरून डांगेवाडी चौफुलीवर जावून विमानतळ भिंतीजवळ लागून जांभुळवाडी फाट्यावरून जात असतो. काल सकाळी तो आपल्या दुचाकीवरून जात असताना विमानतळ भिंतीच्या खड्ड्यात लपलेल्या बिबट्याने सावज आपल्या टप्प्यात आल्यावर थेट मोटारसायकल वर झेप घेऊन तरुणावर हल्ला चढवला होता.त्यामुळे त्याचा तोल जावून तो खाली पडला असून त्यात सदर बिबट्याने त्यांचेवर हल्ला केल्याने तो गंभीर जखमी झाला आहे.मात्र सदर हल्ला सदर रस्त्यावरून जाणाऱ्या अनेक प्रवाशांनी पाहिल्यावर त्याची सोडवणून केली आहे.त्याला नजीकच्या ग्रामस्थांनी लोणी येथील रुग्णालयात उपचारार्थ भरती केले आहे.
  
   दरम्यान ही बातमी हल्यात जखमी झालेल्या तरुणाचे वडील भाऊसाहेब अर्जुन गव्हाणे यांनी आज आमच्या प्रतिनिधीशी बोलताना त्यांनी सांगितली आहे.त्यामुळे आता कोपरगाव वन विभाग या बिबट्या वर काय कारवाई करणार व सदर तरुणाचा पंचनामा करणार का ? त्यास भरपाई देणार का ? असा सवाल निर्माण झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close