वन व पर्यावरण
…या परिसरात बिबट्याचे दर्शन,शेतकऱ्यांत भीती !
न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील जवळके येथील प्रगतशील शेतकरी प्रल्हाद पाटील जवरे यांचे वस्तीवर चिक्कुच्या बागेत रात्री ०८ वाजेच्या दरम्यान किरण जवरे यांना आपल्या चारचाकी वाहनातून घरी जाताना बिबट्याने ऐन रस्त्यावर दर्शन दिल्याने शेतकऱ्यांना रात्र जागून काढावी लागली आहे.त्यामुळे शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
काही महिन्यांपूर्वी धोंडेवाडी येथील जुना येवला रोडलगत असलेल्या नेहे वस्तीवर विहिरीत बिबट्या आढळला होता.तर काही दिवसापू्वी चंद्रकांत नामदेव थोरात यांचे कुक्कुट पालन शेडजवळ तो आढळला होता.विहिरीतील तो बिबट्या वन विभागाने विहिरीतून काढून त्यास जीवदान देऊन ताब्यात घेतला होता.त्या नंतर पोहेगाव परिसरात बिबट्याचे दर्शन घडले होते.आता जवळके ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या जवरे वस्तीवर काल रात्री ०८ ऑगस्ट रोजी वस्तीवर आपल्या चार चाकी गाडीने घरी जाताना किरण जवरे यांना तो चिक्कूच्या बागे शेजारी असलेल्या रस्त्यावर जाताना दिसला होता.मात्र तो रस्त्यावरून हटत नव्हता.त्याने गाडीच्या समोर जाताना वस्तीनजिक थेट संरक्षण भिंतीलगत मजल मारली होती.मात्र तो रस्त्यावरून बाजूस होण्याचे नाव घेत नव्हता मात्र त्यांच्या पत्नी पूनम जवरे हिने त्याच्यावर विजेरीचा झोत धरल्याने त्याने नाईलाजाने चिक्कुच्या बागेत प्रवेश केला.त्यानंतर त्यांनी घराच्या छतावर जावून फटाक्यांचा आवाज केल्याने तो बागेतून अज्ञात ठिकाणी निघून गेला की त्याचं परिसरात आहे हे समजण्यास मार्ग नाही.
दरम्यान जवळके,बहादरपुर,धोंडेवाडी, बहादराबाद,शहापूर,अंजनापुर आदी परिसरातील शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले असून कोपरगाव तालुका वन विभागाने या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी वन विभागाच्या अधिकारी सौ.माने यांचेकडे आमच्या प्रतिनिधीच्या माध्यमातून केली आहे.