वन व पर्यावरण
…या गांवासाठी एक हजार रोपांचे वितरण
न्यूजसेवा
संवत्सर (वार्ताहर)
संवत्सर गांवचे माजी उपसरपंच कै.केशवरावकेशवराव भाकरे यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव प्रा.सुनिल भाकरे व कोपरगांव येथील आयुर्वेदाचे प्रसारक डॉ.ज्ञानेश्वर वाघचौरे यांनी संवत्सर ग्रामपंचायत,जिल्हा परिषद मराठी शाळा,प.पूज्य राजधरबाबा रोपवाटिका व महानुभाव आश्रम परिसरात सुमारे एक हजार विविध आयुर्वेदीक रोपांचे वृक्षारोपन करण्याचा संकल्प आज युधवार रोजी आषाढी एकादशीचे औचित्य साधून पूर्ण केला आहे.
“आयुर्वेदासारखे अनेक प्रकारची रोपे दान करून भाकरे परिवाराने आजारी माणसांना जिवनदान देण्याचे मोठे कार्य केले आहे.आज लावलेली रोपे भविष्यात मोठी होऊन सावलीबरोबरच जिवनदान देण्याचे काम करणार आहे”-संवत्सर उपसरपंच विवेक परजणे.
संवत्सरचे उपसरपंच विवेक परजणे माजी उपसरपंच चंद्रकांत लोखंडे,भाऊसाहेव कासार,लक्ष्मणराव परजणे, भिकाभाऊ कर्षे,मुख्याध्यापक फैय्याजखान पठाण,संभाजी भाकरे,नामदेवराव पावडे,माणिकराव भाकरे, सोमनाथ निरगुडे,अनिल आचारी,कारभारी भाकरे यांच्यासह अनेक मान्यवरांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या शाळेत वृक्षारोपण करण्यात आले.या रोपांमध्ये हिरडा,बेहडा,आडुळसा,बहावा,अर्जुना अशा विविध आयुर्वेदीक वनस्पतींचा समावेश आहे.याशिवाय लिंब,चिंच,वड,पिंपळ आदी रोपांचाही त्यात समावेश आहे.
संवत्सर गांवचे माजी उपसरपंच कै.केशवराव भाकरे पाटील यांनी त्यांच्या हयातीत अनेक सामाजिक कार्य केलेले असून आपल्या कार्यकाळात संवत्सर गांवच्या विकासासाठी विविध उपक्रम राबविले. त्यांचा वारसा पुढेही चालू रहावा त्यांचे स्मरण रहावे यासाठी त्यांचे सुपूत्र प्रा. सुनिल भाकरे यांनी व त्यांचे मित्र आयुर्वेदाचे प्रसारक ज्ञानेश्वर वाकचौरे यांनी सुमारे एक हजार रोपटे गांवासाठी देऊन आज बुधवार रोजी आपला संपर्क पुर्ण केला.
उपसरपंच विवेक परजणे यांनी वृक्षारोपणाचे महत्व विषद करुन आयुर्वेदासारखे अनेक प्रकारची रोपे दान करून भाकरे परिवाराने आजारी माणसांना जिवनदान देण्याचे मोठे कार्य केले आहे.आज लावलेली रोपे भविष्यात मोठी होऊन सावलीबरोबरच जिवनदान देण्याचे काम करणार आहेत.शिवाय झाडांमुळे पर्जन्यमान चांगले होऊन परिसर सुशोभित होण्यास चांगली मदत होणार आहे.तर आयुर्वेदाचार्य डॉ.ज्ञानेश्वर वाकचौरे यांनी झाडे ही गावाची संस्कृती आणि परंपरा असून झाडांमुळे शुध्द ऑक्सीजन माणसांना मिळतो.परिणामी आरोग्य चांगले राहण्यास मदतही होते.
आषाढी एकादशीनिमित्त सालाबादप्रमाणे कमळादेवी भजनी मंडळातर्फे वारकरी व जिल्हा परिषद शाळेतील मुलांची दिंडी काढण्यात आली.दिंडीचे स्वागत उपसरपंच विवेक परजणे,प्रा.सुनिल भाकरे,कारभारी भाकरे, लक्ष्मणराव परजणे,चंद्रकांत लोखंडे,पत्रकार शिवाजी गायकवाड,बाबासाहेव खर्डे,सोमनाथ निरगुडे, भाऊसाहेब कासार,बंडू बढे,दिप भाकरे,मोहन सोनवणे,कापसे,विजय भेसले,लहानू गुंड व भजनी मंडळांनी दिंडीचे स्वागत केले.
संवत्सरच्या सरपंच सुलोचना ढेपले यांनी डोक्यावर तुळस घेऊन दिंडीत सहभाग घेतला.गांवातील अनेक महिलाही त्यांच्या समवेत दिंडीत सहभागी झालेल्या होत्या.संपूर्ण गांवाला प्रदक्षिणा घालून श्री हनुमान मंदिरासमोर दिंडीचा समारोप झाला यावेळी भजनाचा कार्यक्रम होऊन नंतर सर्वांना फराळ,देण्यात आला आहे. याप्रसंगी जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक,विद्यार्थी,ग्रामपंचायतीचे सदस्य,कर्मचारी,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.