जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
वन व पर्यावरण

…या गावात वृक्ष संवर्धन कार्यक्रम संपन्न

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील अंजनापूर येथे वृक्षवेध फाउंडेशनच्या वतीने आणि स्थानिक के.जे.सोमैया महाविद्यालयाच्या सहकार्याने ‘प्रकृती वंदन :१३७१ आशीर्वाद वृक्षारोपण आणि संवर्धन शपथ कार्यक्रम’ अत्यंत उत्साहवर्धक वातावरणात संपन्न झाला आहे.

  

“वाढत्या औद्योगीकरणामुळे दिवसेंदिवस पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे.त्यामुळे मोठ्या प्रमाणात तापमानात वाढ होऊन पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे.त्यासाठी वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन करणे गरजेचे आहे.पर्यावरणाचे रक्षण करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे”-नीलिमा मिश्रा,पद्मश्री पुरस्कार विजेत्या कार्यकर्त्या.

  वाढत्या औद्योगीकरणामुळे दिवसेंदिवस पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे.त्यामुळे मोठ्या प्रमाणात तापमानात वाढ होऊन पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे.त्यासाठी वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन करणे गरजेचे आहे.पर्यावरणाचे रक्षण करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे ही गरज ओळखून कोपरगाव तालुक्यातील अंजनापूर येथील वृक्ष फाऊंडेशन या संस्थेच्या वतीने गत दहा वर्षापासून वृक्ष लागवड करण्यात येत आहे.नुकतीच पर्यावरणवादी कार्यकर्ते पद्मश्री शामसुंदर पालीवाल तसेच पद्मश्री व रॅमन मॅगसेसे पुरस्कार प्राप्त समाजसेविका नीलिमा मिश्रा यांच्या प्रमुख उपस्थितीत ०१ हजार ३७१ वृक्षांची लागवड करण्यात येऊन संपन्न झाला आहे.

  सदर प्रसंगी कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे,सचिव अॅड्.संजीव कुलकर्णी तसेच विश्वस्त संदीप रोहमारे,प्र. प्राचार्य डॉ.बी.बी.भोसले आदी मान्यवर उपस्थित होते

     सदर प्रसंगी आयोजकांनी,”यापूर्वी गेल्या नऊ वर्षापासून दरवर्षी असाच कार्यक्रम या गावात दरवर्षी घेण्यात येत आहे.आजपर्यंत एकूण १५ हजार ०१३ वृक्षांची लागवड करून त्यांचे यशस्वी संवर्धन करण्यात आलेले आहे.त्यामुळे आता अंजनापूरची ‘पर्यावरणतीर्थ’ अशी ओळख तयार झालेली आहे.
सदर उपक्रमामध्ये वृक्षवेध फाउंडेशन सोबतच अंजनापूर येथील प्रदिप गव्हाणे,ज्ञानेश्वर गव्हाणे,बी.सी.गव्हाणे,नंदू पाडेकर व संतोष गव्हाणे तसेच समस्त ग्रामस्थ,के.जे.सोमैया महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग,प्राचार्य,व्यवस्थापन आणि कार्यक्रमाधिकारी तसेच अनेक आजी-माजी स्वयंसेवकांचे योगदानअसल्याची माहिती दिली आहे.व त्यांच्या प्रयत्नामुळेच आज अंजनापूर मध्ये १५ हजार वृक्ष दिमाखात उभे आहेत असेही याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणात नमूद करून वृक्षवेध फाउंडेशन तसेच महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातील स्वयंसेवकांचे आणि अधिकाऱ्यांचे कौतुक केले आहे.

     सदर प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रदीप गव्हाणे यांनी केले तर उपस्थितांचे स्वागत ज्ञानेश्वर गव्हाणे यांनी केले आहे तर उपस्थितांचे आभार संतोष गव्हाणे यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close