जाहिरात-9423439946
वन व पर्यावरण

…या ठिकाणी पर्यावरण व्यवस्थापन समितीची बैठक संपन्न

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड यांच्यावतीने शिर्डी येथील विमानतळ आणि परिसराच्या व्यवस्थापनासाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘पर्यावरण व्यवस्थापन समितीची बैठक जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या अध्यक्षतेखाली आज मोठ्या उत्साहात शिर्डी विमानतळ येथे संपन्न झाली आहे. 

  सदर प्रसंगी बैठकीस विमानतळ संचालक मुरली कृष्णा,अतिरिक्त पोलिस अधीक्षक स्वाती भोर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
   सदर प्रसंगी जिल्हाधिकारी श्री सालीमठ म्हणाले की,”शिर्डी येथे देशासह विदेशातून अनेक नागरिक येत असतात. या नागरिकांसाठी विमानतळ परिसरात एम.टी.डी.सी.च्या साह्याने टुरिझम हेल्प डेस्क उभारण्यात यावा.तसेच विमानतळ परिसरामध्ये सोलर हायमास्क उभारणीसाठीचा प्रस्ताव सादर करण्यात यावा.शासन नियमानुसार विमानतळाच्या निर्धारित परिसरामध्ये नवीन बांधकाम,होर्डिंग उभारणीसाठी  परवानगी देताना महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाची मंजुरी घेणे आवश्यक आहे.त्यानुसार सर्व संबंधित विभागांनी याबाबत दक्षता घ्यावी.तसेच विमानतळ परिसरापासून निर्धारित परिसर लेझर फ्री झोन आहे.शहरात व परिसरात होणाऱ्या कार्यक्रमात वापरण्यात येणाऱ्या लेझर शो साठी परवानगी देताना पोलीस विभागानेही आवश्यक ती काळजी घेण्याच्या सुचना जिल्हाधिकारी श्री सालीमठ यांनी यावेळी दिल्या आहेत.

सदर बैठकीस संगमनेरचे तहसीलदार धीरज मांजरे,कोपरगावचे तहसीलदार संदीपकुमार भोसले,राहताचे  तालुका कृषीअधिकारी आबासाहेब भोरे,कोपरगांवचे गट विकास अधिकारी सचिन सूर्यवंशी,मॅनेजर एअरसाईड रोहित रेहपाडे,परिचालन व सुरक्षा अधिकारी पंढरीनाथ शेळके,नायब तहसिलदार हेमंत पाटील,सहाय्यक वनसंरक्षक गणेश मिसाळ,वरिष्ठ प्रबंधक (वित्त व लेखा)अभिजित वासटवार यांच्यासह संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

अ.नगर जिल्ह्यातील ऐतिहासिक वास्तूंची व जिल्हयाची माहिती दर्शविणारे फलक विमानतळ परिसरात उभारण्यात यावेत.  परिसरात भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याबरोबरच परिसरात पशुपालन करणा-या पोल्ट्री फार्म चालकांना मृत्यू झालेल्या पक्षांची विल्हेवाट लावण्याच्या सूचना द्याव्यात.याबाबत नियमितपणे तपासणी करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी श्री सालीमठ यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close