वन व पर्यावरण
बिबट्याने केली शेळ्यांची शिकार,कोपरगाव परिसरात दहशत
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहराच्याजवळ बिबट्याचा संचार अद्याप कायम असून आज त्याने जेऊर पाटोदा आणि मुर्शतपुर आदी परिसरात त्याने दोन दिवसात तीन शेळ्यांची शिकार त्याने केली असून त्यासाठी वन विभागाने संशियत ठिकाणी पिंजरा लावला असल्याची माहिती कोपरगाव वन विभागाच्या अधिकारी प्रतिभा सोनवणे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
कोपरगाव आणि जेऊर पाटोदा,मुर्शतपुर आदी परिसरात त्यास मोठया प्रमाणावर डुकरे,कुत्री,शेळ्या आदी शिकार सहज सापडत असल्याने त्याने त्याच परिसरात ठिय्या दिला आहे.गत दोन दिवसात त्याने जेऊर पाटोदा परिसरात दोन शेळ्या आपल्या शिकार बनवल्या आहेत त्यातील दोन शेळ्या मृत अवस्थेत आढळून आल्या आहेत तर मुर्शतपुर या ठिकाणी त्याने एक शेळी शिकार बनवली आहे त्यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरवर्षी बिबट्या मनुष्यवस्तीत घुसण्याच्या शेकडो घटना घडतात.बिबट्या हा मुख्यत्वे जंगलातच रहाणे पसंत करतो.मात्र अलीकडील काळात त्याचे खाद्य दुर्मिळ होत असल्याने तो मनुष्य वस्तीत घुसताना आढळत आहे.अशीच घटना कोपरगाव तालुक्यातील जवळके नजीक असलेल्या धोंडेवाडीत मार्च महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात उघडकीस आली होती.त्यानंतर तालुक्यातील संवत्सर येथे गणपत धोंडिबा आचारी यांचे वस्तीवर तर कासली रस्त्यालगत रोहोम,डरांगे वस्ती,भाकरे मळा,वरगुडे आदी वस्तीवर तो नुकताच आढळला होता.आता कोपरगाव आणि जेऊर पाटोदा,मुर्शतपुर आदी परिसरात त्यास मोठया प्रमाणावर डुकरे,कुत्री,शेळ्या आदी शिकार सहज सापडत असल्याने त्याने त्याच परिसरात ठिय्या दिला आहे.गत दोन दिवसात त्याने जेऊर पाटोदा परिसरात दोन शेळ्या आपल्या शिकार बनवल्या आहेत त्यातील दोन शेळ्या मृत अवस्थेत आढळून आल्या आहेत तर मुर्शतपुर या ठिकाणी त्याने एक शेळी शिकार बनवली असून ती शेजारच्या उसाच्या शेतात ओढुन नेली आहे.त्यामुळे या परिसरात शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान या प्रकरणी कोपरगाव वन विभागाच्या अधीकारी प्रतिभा सोनवणे यांनी त्यास दुजोरा दिला आहे व वन विभागाने जेऊर पाटोदा आणि मुर्शतपुर आदी दोन ठिकाणी आज सायंकाळी पिंजरा लावला असल्याची माहिती दिली आहे.त्यामुळे या परिसरासह कोपरगाव शहरात घबराहट उडाली आहे.