वन्य जीव
.. या तालुक्यात आढळला मूर्त बिबट्या !

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यात आता बिबट्याची दहशत कमी झालेली असताना घोंडेवाडी हद्दीत काल एक वय वर्षे सहा असलेल्या एक बिबट्या दिपक बाळासाहेब थोरात (रा.जवळके) यांचे गट क्र.289 मधील विहिरीत मृत अवस्थेत आढळून आला आहे.आज सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास वन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यास वर काढून त्याचे शव विच्छेदन करून त्यांचा अग्निसंस्कार केला असल्याची माहिती हाती आली आहे.

काल अचानक जवळके नजिक असलेल्या धोंडेवाडी शिवारात शेतकऱ्यांचा जास्त वावर नसलेल्या गट क्रमांक-289 मध्ये असलेल्या विहिरीत एक मृत बिबट्या पाण्यात तरंगताना आढळून आला असल्याची माहिती किरण प्रल्हाद जवरे यांनी वन विभागाला कळवले होते.आज सकाळी वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन सदर मृत नर बिबट्याला बाजेच्या सहाय्याने बाहेर काढले आहे.याबद्दल वन विभागाचे अधिकारी मेहबूब शेख आणि त्यांचे सहकाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये गत तीनचार महिन्यापूर्वी बिबट्याची चांगलीच दहशत पसरली होती.विशेषतः पुणे,नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये बिबट्यांनी धुमाकूळ घातला होता.उसात लपण्यासाठी जागा,मुबलक प्रमाणात पाणी आणि खाद्य म्हणून पाळीव प्राणी यामुळे बिबट्यांची संख्या वाढतच चालली आहे.आता हे बिबट्या शिकारीच्या शोधात वस्त्यावर आणि गावात शिरत असल्याचं पहायला मिळाले होते.बिबटे पाळीव प्राण्यांसोबतच लहान मुलं आणि वृद्ध माणसांवर देखील हल्ले करत असल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

कोपरगाव तालुक्यातील टाकळी फाटा या ठिकाणी एका ऊसतोड कामगाराची मुलगी ठार झाल्या नंतर येसगाव येथील एक निकोले नामक महिला घास कापत असताना बिबट्याचे त्याच्यावर हल्ला करून तिला जागीच ठार केले होते.सदरचा प्रश्न आ.आशुतोष काळे यांनी विधानसभेत उपस्थित केला होता.व शेतकऱ्यांना चांगली भरभक्कम भरपाई द्यावी अशी मागणी केली होती.त्यानंतर जवळके,सुरेगाव,ब्राम्हणगाव आदी परिसरात बिबट्याने आपली दहशत निर्माण केली असून या धास्तीने अनेक शेतकऱ्यांनी शेतात जाणं देखील सोडून दिलं होतं.मात्र त्यानंतर वन विभागाने बऱ्याच बिबट्यांना जेरबंद करून सुरक्षित ठिकाणी रवानगी केली होती.तरीही जवळके परिसरात तो मागील आठवड्यात आढळला होता.मात्र त्याने कोणाला उपसर्ग पोहचवला असल्याचे दिसून आले नव्हते.मात्र काल अचानक जवळके नजिक असलेल्या धोंडेवाडी शिवारात शेतकऱ्यांचा जास्त वावर नसलेल्या गट क्रमांक-289 मध्ये असलेल्या विहिरीत एक मृत नर बिबट्या पाण्यात तरंगताना आढळून आला असल्याची माहिती किरण प्रल्हाद जवरे यांनी वन विभागाला कळवले होते.मात्र काल उशीर झाला असल्याने आज सकाळी वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन सदर मृत बिबट्याला बाजेच्या सहाय्याने बाहेर काढले आहे.

दरम्यान त्या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना पाचारण करून त्याचे शव विच्छेदन जागेवरच करून त्याची विल्हेवाट लावली असल्याची माहिती कोपरगाव विभागाचे वनपाल क्षेत्र अधिकारी मेहबूब शेख यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.त्यावेळी त्यांना वनपाल भगवान जाधव,निकिता पगारे,वनमजुर मुक्तार शेख,प्रदीप इंदरखे आदींनी सहकार्य केले आहे.



