जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
वन्य जीव

कोपरगाव तालुक्यात बिबट्याचा संचार,नागरिकांत दहशत

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील जवळके नंतर संवत्सर येथे बिबट्या आढळल्यानंतर आता तो थेट कोपरगाव शहरातील धारणगाव रस्ता आणि शिंगी-शिंदे नगर आदी परिसरात आढळला असून त्याचा वनविभागाने बंदोबस्त करावा अशी मागणी शहरातील नागरिकांनी केली आहे.

“कोपरगाव शहरात प्रसिद्ध झालेले दोन चलचित्रण फेक असल्याचे सांगून ओमनगर परिसरात तो असल्याचे वृत्त खरे असल्याचा त्यांनी दुजोरा दिला आहे.त्या साठी आपण आज सायंकाळी पिंजरा बोलावला असून ज्या ठिकाणी तो आढळेल त्या ठिकाणी पिंजरा लावला जाईल” असे सांगताना त्यांनी पुढे बोलताना म्हटले आहे की,”कुत्री आणि डुक्कर हे वन्य जीव बिबट्याचे आवडते खाद्य असून नागरिकांनी आपला परिसर स्वच्छ ठेवावा व लहान मुलांना एकटयास सोडू नये”-प्रतिभा सोंनवणे,वन अधिकारी,कोपरगाव वन विभाग.

बिबटे मनुष्यवस्तीजवळ रहाणे जास्त पसंत करतात व तेथील कुत्री,पाळीव जनावरे हे त्यांचे आवडते भक्ष्य आहे.यामुळेच दरवर्षी बिबट्या मनुष्यवस्तीत घुसण्याच्या शेकडो घटना घडतात.बिबट्या हा मुख्यत्वे जंगलातच रहाणे पसंत करतो.मात्र अलीकडील काळात त्याचे खाद्य दुर्मिळ होत असल्याने तो मनुष्य वस्तीत घुसताना आढळत आहे.अशीच घटना कोपरगाव तालुक्यातील जवळके नजीक असलेल्या धोंडेवाडीत मार्च महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात उघडकीस आली होती.तेथील पुंजाहारी नेहे वस्ती जवळ असलेल्या विहिरीत तो भक्ष्याच्या शोधात असताना पडला होता.त्यानंतर वनींकरण विभागाच्या अधीकारी प्रतिभा सोनवणे आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी त्यास काढले होते.त्यास चार महिने उलटले नाही तोच पुन्हा एकदा रांजणगाव देशमुख र्ते देर्डे या रस्त्यावर नुकताच बारा जुलै रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास तेथील तरुण किरण जवरे हा आपल्या ट्रॅक्टरवरून वस्तीवर जात असताना सेवा निवृत्त तारतंत्री नामदेव थोरात यांच्या शेताजवळ त्यास दोन बिबटे आडवे गेले होते.त्यानंतर तालुक्यातील संवत्सर येथे गणपत धोंडिबा आचारी यांचे वस्तीवर तर काल कासली रस्त्यालगत रोहोम,डरांगे वस्ती,भाकरे मळा,वरगुडे आदी वस्तीवर तो आढळला असल्याची माहिती आमचे प्रतिनिधी शिवाजी गायकवाड यांनी दिली आहे.त्या ठिकाणी त्याने एका मांजराची शिकार केली होती.त्यामुळे त्याची घबराहट उडाली होती.

दरम्यान परवा रात्री तर थेट कोपरगाव शहरातील धारणगाव रोडलगत पेट्रोलपंपालगत आढळला होता.त्या नंतर आता रात्री दोन च्या सुमारास अंबादास चंदनशिव,बापू काकडे आदी पाच जणांना तो निवारा परिसर व शिंगी-शिंदेंनगर या ठिकाणी असलेल्या काटवनात जाताना आढळला आहे.त्याबाबत सामाजिक संकेतस्थळावर चलचित्रण प्रसारित झाले आहे.या शिवाय बाजार समितीच्या संरक्षक भिंतीच्या वरही बिबट्या आढळला असल्याचे वृत्त प्रसारित झाले होते.मात्र ते चलचित्रण बनावट असल्याचे उघड झाले आहे.त्यामुळे या भागातील नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

त्याबाबत त्यांनी कोपरगाव येथील वन विभागाच्या अधिकाऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते.मात्र त्या कडे त्यांनी दुर्लक्ष केले असल्याचा आरोप या कार्यकर्त्यानी केला आहे.अद्याप तरी अप्रिय घटना घडलेली नाही.त्यामुळे त्या आधीच या प्राण्याचा वन विभागाने बंदोबस्त करावा अशी मागणी कोपरगाव नगरपरिषदेचे माजी अध्यक्ष मंगेश पाटील यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना केले आहे.

दरम्यान या प्रश्नाकडे वनविभागाचे लक्ष वेधण्यासाठी भाजप(कोल्हे गटाचे) कार्यकर्ते वैभव गिरमे व अंबादास चंदनशिव,बापू काकडे यांनी शिंदे-शिंगीनगर आदी काटवनाजवळ प्रतिबंधात्मक पिंजरा लावून,फटाके वाजवून लक्षवेधी आंदोलन केले आहे.

दरम्यान या बाबत आमच्या प्रतिनिधीने याबाबत वन विभागाच्या अधिकारी प्रतिभा सोनवणे यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी,”याबाबत त्यांनी कोपरगाव शहरात प्रसिद्ध झालेले दोन चलचित्रण फेक असल्याचे सांगून ओमनगर परिसरात तो असल्याचे वृत्त खरे असल्याचा त्यांनी दुजोरा दिला आहे.त्या साठी आपण आज सायंकाळी पिंजरा बोलावला असून ज्या ठिकाणी तो आढळेल त्या ठिकाणी पिंजरा लावला जाईल” असे सांगताना त्यांनी पुढे बोलताना म्हटले आहे की,”कुत्री आणि डुक्कर हे वन्य जीव बिबट्याचे आवडते खाद्य असून नागरिकांनी आपला परिसर स्वच्छ ठेवावा व लहान मुलांना एकटयास सोडू नये त्याचे बरोबर मोठ्या व्यक्तीने सोबत असावे” असे आवाहन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close