जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
लोकसभा कामकाज

शिर्डी लोकसंभा मतदार संघात ०४ कोटी ३८ लाखांचा निधी मंजूर -…यांची माहिती

न्यूजसेवा

कोपरगांव -(नानासाहेब जवरे)

   शिर्डीचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी आपल्या शिर्डी लोकसभा मतदार संघातील ०७ नगर परिषदा आणि दोन ग्रामपंचायत हद्दीतील ०९ विविध विकास कामासाठी राज्याच्या सामाजिक न्याय विभागामार्फत २०२६-२७ साठीच्या विविध कल्याणकारी योजनांसाठी ०४ कोटी ३८ लाखांचा निधी मंजूर केला असून त्यातील १३ कोटी ८० लाख रुपयांचा निधी वितरित केला असल्याची माहिती एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.याबाबत शिर्डी मतदार संघातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

शिर्डीचे खा.भाऊसाहेब वाकचौरे.

 

“राज्याच्या आणि देशाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत विविध कल्याणकारी योजना व विकासाकामांसाठी निधी मंजूर केला जातो त्यात शिर्डी लोकसंभा मतदार संघासाठी खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी एकूण २४ कामासाठी ०४ कोटी ३८ लाखांचा निधी मंजूर झाला असून यातील ०१ कोटी ३० लाख ८० हजारांचा निधी वितरित केला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.त्यांनी याबाबत आपल्या विरोधकांना कृतीतून उत्तर दिले असल्याचे मानलं जात आहे.याबाबत मतदार संघातील नागरिकानी समाधान व्यक्त केले आहे.

   याबाबतचे सविस्तर वृत्त असे की,”राज्याच्या आणि देशाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत विविध कल्याणकारी योजना व विकासाकामांसाठी निधी मंजूर केला जातो.नवीन वसतिगृहे,सुशोभीकरण आणि वस्तीविकास योजनांच्या कामासाठी हा निधी वितरित केला जातो.राज्यभरात १२१० नवीन वसतिगृहे उभारण्याच्या प्रकल्पासाठी १ हजार ५०० कोटी रुपयांचा निधी राखीव ठेवला असल्याची माहिती असून डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांच्या विकासासाठी निधी मंजूर केला जातो.त्याचा पाठपुरावा करून खा.वाकचौरे यांनी आपल्या शिर्डी लोकसभा मतदार संघातील २४ विविध कामे मंजूर केली असल्याची माहिती शिर्डीचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी आज एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.त्यात ही माहिती दिली आहे.

   दरम्यान त्यात त्यांनी दिलेल्या माहितीत एकूण निधी मंजूर आणि वितरीत निधीची माहिती (आकडे लाखांत) पुढील प्रमाणे दिली आहे.त्यात अकोले नगर पंचायत हद्दीत संत रोहिदास भवन उभारणे-२५. -७.५०,संगमनेर नगर परिषद हद्दीत संत रोहिदास भवन उभारणे-२५.-७.५०,कोपरगाव नगर परिषद हद्दीत संत रोहिदास भवन उभारणे-२५. -७.५०,श्रीरामपूर नगरपरिषद हद्दीत संत रोहिदास भवन उभारणे-२५.-७.५०,देवळाली नगरपरिषद हद्दीत संत रोहिदास भवन उभारणे-२५.-७.५०,नेवासा नगरपंचायत हद्दीत संत रोहिदास भवन उभारणे-२५.-७.५०,राहाता नगरपरिषद हद्दीत संत रोहिदास भवन उभारणे -२५.-७.५०,कोळगाव थडी ता.कोपरगांव येथील दलित वस्ती समाज मंदिर बांधणे-१५.-४.५०,जेउर कुंभारी ता.कोपरंगाव येथील डॉ.बाबासाहेब आबेडकर पुतळा स्मारक परिसरात संरक्षक भिंत,सुशोभीकरण करणे-१०.-३., असा एकुण .0२ कोटी निधी मंजूर झाला असून त्यातील .६० लाख रुपयांचा निधी वितरित झाला असल्याची माहिती दिली आहे.

   तर या व्यतिरिक्त पुढील १५ ग्रामपंचायतीत असलेल्या सामाजिक कामांना निधी मंजूर केला असून यातील वितरित निधी (आकडे लाखांत )पुढे दर्शवले आहे ते पुढील प्रमाणे आहे.त्यात कोपरगाव तालुक्यातील काकडी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक सुशोभीकरण करणे-१५ -४.५०,करंजी येथे संत रविदास महाराज मंदिर सभा मंडप बांधकाम करणे-१५.-४.५०,संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे गृहनिर्माण संस्था प्रागणात सभा मंडप बांधकाम करणे-१५.-४.५०,खंदरमाळ गावठाण अतर्गत संत रोहिदास महाराज मंदिरा समोर सभामंडप बांधकाम करणे-१५.-४.५०,आश्वी येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृहास सरक्षक भित व सुशोभीकरण करणे-१५.-४.५०,राहुरी तालुक्यातील करजगाव येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक प्रांगणात पेव्हर ब्लॉक सुशोभीकरण करणे-५.-१.५०,करजगाव येथे दलित वस्ती स्मशान भुमी सुशोभीकरण करणे-१०.-३.,श्रीरामपूर तालुक्यातील निमगाव खैरी येथील संत रोहिदास महाराज मंदिर सभामंडप बांधकाम करणे-१५.-४.५०,खोकर येथील मातंग समाज आमरधाम पेव्हर ब्लॉक बसविणे-५.-१.५०,हरेगाव येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरात सांस्कृतिक भवन बांधकाम करणे-२०.-६.,श्रीरामपूर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरात पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करणे वाटर फिल्टर बसविणे,३-३,जळके खुर्द,आंबेडकरनगर दलित वस्ती सभा मंडप बाधणे-१५.-४.५०,अकोले येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर पदस्पर्श भवन विस्तारीकरण करणे- ३०.-९.,कोपरगाव तालुक्यातील धामोरी येथे संविधान भवन बांधकाम करणे-३०.-९.,श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा येथे संविधान भवन बांधकाम करणे-३०.-९. असा एकूण २ कोटी ३८ लाख रुपयांचा निधी मंजूर आला असून त्यातील  ७०.८० लाखांचा निधी वितरित केला आहे तर एकूण सर्व २४ कामे मिळून एकूण ०४ कोटी ३८ लाखांचा निधी मंजूर झाला असून यातील ०१ कोटी ३० लाख ८० हजारांचा निधी वितरित केला असल्याची माहिती खा.वाकचौरे यांनी शेवटी दिली आहे.याबाबत लोकसभा मतदार संघातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून खा.वाकचौरे यांनी आपल्या विरोधकांना कामातून व कृतीतून उत्तर दिले असल्याचे मानले जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close