जाहिरात-9423439946
लोकसभा कामकाज

पत्रकारांसह मतदार संघातील समस्या सोडवू-खा.वाकचौरे

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

  शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिर्डी,राहाता,कोपरगाव तालुक्यातील पत्रकारांचा पत्रकार दिनानिमित सत्कार करण्यात आला आहे व त्यांच्या व मतदार संघातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण आगामी लोकसभा अर्थसंकल्पीय अधिवेशनात आवाज उठवू असे आश्वासन दिले आहे.

“झगडेफाटा ते वडगाव पान रस्ता,शिर्डी जुना बायपास रस्ता शिर्डीच्या गर्दीच्या काळात वापरला गेला आहे.त्यामुळे अवजड वाहतुकीमुळे या रस्त्याचे मोठे नुसान झाले आहे.मात्र तो सिंहस्थ कुंभमेळा 2027 मध्ये समाविष्ट केला नाही हे दुर्दैवी आहे.या मार्गाकडे साई संस्थाने दुर्लक्ष केलं आहे.त्यामुळे या मार्गावर अनेकांचे बळी जात आहे.वाहनाचे मोठे नुकसान होत आहे.या मार्गाच्या दोन्ही बाजूनी राष्ट्रीय महामार्ग असल्याने मधील ३०-३५ किमी अंतराचा रस्ता राष्ट्रीय महामार्गात रूपांतरित करावा,जवळके,सायाळे मार्गे शिर्डी पालखी मार्ग सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आर्थिक नियोजनात घ्यावाआदी मागण्या केल्या आहेत.

    बाळशास्त्री जांभेकर मराठी भाषेतील आद्य पत्रकार आहे.यांनी मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र दर्पण ६ जानेवारी १८३२ रोजी सुरू केले होते.जुलै १८४० मध्ये दर्पणचा शेवटचा अंक प्रकाशित झाला.त्यांनी गोविंद कुंटे यांच्या मदतीने त्यांनी दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र काढले.6 जानेवारी 1832 रोजी ‘दर्पण’चा पहिला अंक प्रकाशित झाला होता.जनसामान्यांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने ‘दर्पण’ आवर्जून मराठी भाषेत काढण्यात आले.त्याचवेळी इंग्रजी सत्ताधाऱ्यांना स्थानिकांच्या अडचणी आणि भावना कळाव्या यासाठी ‘दर्पण’मध्ये एक स्तंभ इंग्लिश भाषेत लिहिला जात असे.त्या हा दिवस राज्यभर मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.

  दरम्यान शिर्डीतील खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी आपल्या मतदार संघातील पत्रकारांना शुभेच्छा देण्यासाठी विविध तालुक्यात पत्रकार दीन संपन्न केला होता.आधी अकोले,संगमनेर आदी तालुक्यातील पत्रकारांना त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.तर शिर्डी,कोपरगाव,राहाता तालुक्यातील पत्रकारांना व्यक्त होण्यासाठी आणि त्यांच्या समस्या मांडण्यासाठी मुक्त संवाद हे व्यासपीठ उपलब्ध करून दिले होते त्यावेळी ते बोलत होते.

   सदर प्रसंगी शिर्डी लोकसभा मतदार संघाचे समन्वयक मुकुंद सिनगर,निळवंडे कालवा कृती समितीचे संस्थापक नानासाहेब जवरे,पंढरीनाथ पगार,आदिसंह बहुसंख्य पत्रकार उपस्थित होते.
 
   दरम्यान यावेळी अनेकांनी ग्रामीण पत्रकारांच्या समस्या मांडल्या असून मतदार संघातील विविध प्रश्न मांडून लोकसभेच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात समस्या मांडण्यासाठी आपले मनोगत व्यक्त केले आहे.त्यात त्यांनी झगडेफाटा ते वडगाव पान रस्ता,शिर्डी जुना बायपास रस्ता शिर्डीच्या गर्दीच्या काळात वापरला गेला आहे.त्यामुळे अवजड वाहतुकीमुळे या रस्त्याचे मोठे नुसान झाले आहे.मात्र तो सिंहस्थ कुंभमेळा 2027 मध्ये समाविष्ट केला नाही हे दुर्दैवी आहे.या मार्गाकडे साई संस्थाने दुर्लक्ष केलं आहे.त्यामुळे या मार्गावर अनेकांचे बळी जात आहे.वाहनाचे मोठे नुकसान होत आहे.या मार्गाच्या दोन्ही बाजूनी राष्ट्रीय महामार्ग असल्याने मधील ३०- ३५ किमी अंतराचा रस्ता राष्ट्रीय महामार्गात रूपांतरित करावा,जवळके,सायाळे मार्गे शिर्डी पालखी मार्ग सिंहस्थ कुंभ मेळ्याच्या आर्थिक नियोजनात घ्यावा,सी.एन.जी.भारत पेट्रोलियमला जिल्हा निहाय तेल कंपन्यांना दिले आहे.त्यामुळे दुसऱ्या कंपन्या डीलरशिप देऊ शकत नाही.त्यामुळं शिर्डी आणि उत्तर नगर जिल्ह्यात सी.एन.जी.पंपावर लांबच लांब रांगा लागत आहे त्याकडे लक्ष वेधून घ्यावे,मुख्यमंत्री सौर योजना-२ च्या योजना भूसंपादन करताना कंपन्यांची मनमानी सुरू आहे.त्यामुळे योजना जाहीर करूनही त्यांचे निष्कर्ष निराशाजनक आले आहे.बिबट्याचा धुमाकूळ सुरू असताना शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत नाही.सरकार केवळ घोषणाबाजी करत आहे.त्यामुळे उत्तर नगर जिल्ह्यात केवळ केलवड येथेच ही योजना प्रगतीपथावर आहे.त्यांचे नियम सैल करण्यासाठी लोकसभेत आवाज उठवावा,शिर्डी लोकसभा मतदार संघातील रखडलेल्या जलजीवन योजना निधी मिळत नसल्याने पूर्ण होत नाही.ठेकेदारांची बिले भेटत नाही,ते आत्महत्या करत आहेत ग्रामस्थाना अशुद्ध पाणी पुरवठा होत असल्याने आजाराची साथ उद्भवण्याची शक्यता वाढली असल्याचे हा प्रश्न तत्काळ सोडवावा,शिर्डी-पंढरपूर मार्गावर दररोज रेल्वे पुन्हा सुरू करावी,निळवंडे धरणाचे लाभक्षेत्रातील दुष्काळी १८२ गावांचे पाणी आरक्षण करण्यास महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांची तातडीने बैठक लावणे गरजेचे असल्याची मागणी केली आहे.युट्यूब चॅनल,वेब न्यूज पोर्टल आर.एन.आय.मिळणे बाबत मागणी केली आहे.निळवंडे धरणाची उंची वाढवून पश्चिम घाटमाथ्याचे पाणी पूर्वेकडे वळवणे गरजेचे आहे.गोदावरीसह मतदार संघातील नद्यांचे जलप्रदूषण रोखणे बाबत कारवाई लोकसभेच्या अधिवेशनात आवाज उठवणे गरजेचे आहे.राज्यातील ग्रामपंचायतींना गेल्या दोन वर्षापासून १५ व्या वित्त आयोगाचा निधी मिळत नसल्याने विकासकामे ठप्प झाली आहे.त्यासाठी संसदेत लक्ष वेधून घेणे गरजेचे आहे.याशिवाय कोपरगाव,शिर्डी,राहाता तालुक्यातील पत्रकारांना पत्रकार भवन उभारणीसाठी जागा आणि निधी मिळावा अशी मागणी केली आहे.

   दरम्यान या मागण्याबाबत आपण सरकारकडे सकारात्मक पद्धतीने बाजू मांडून न्याय देण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी शेवटी दिले आहे.त्यावेळी उपस्थित पत्रकारांना मिष्ठान्न भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.या उपक्रमाबद्दल सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close