जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
लोकसभा कामकाज

भटक्या समाजाच्या समस्या कधी सुटणार ? …या खासदारांचा सवाल

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

   नवी दिल्ली येथे संपन्न होत असलेल्या लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनात शिर्डीचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी भटक्या विमुक्त जाती जमातीचा प्रश्न उपस्थित करून त्यांना न्यायाची मागणी केली असता केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्री डॉ.विरेंद्र कुमार यांनी,”भटके व अर्धभटके समुदायांना जात प्रमाणपत्रे व संबंधित दस्तावेज राज्य सरकारांमार्फत देण्यात येतात आणि त्यानुसार त्यांना विविध शासन योजनांमध्ये हक्क मिळतात असे स्पष्टीकरण आज दिले आहे.त्यामुळे या समाज घटकांनी समाधान व्यक्त केले आहे.

उत्तर देतांना केन्द्रीय मंत्री डॉ.विरेन्द्र कुमार दिसत आहेत.

  

“केंद्र सरकार देशातील भटका आणि विमुक्त समुदाय सरकारी योजनांपासून वंचित राहिला आहे.केन्द्र सरकार सामाजिक न्यायाशी निगडीत विविध योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी कटिबध्द आहे तसेच शिर्डी लोकसभा क्षेत्रासह देशातील वंचित घटकांपर्यंत कल्याणकारी योजना पोहोचवण्यासाठी तसेच या समुदायांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य सरकारच्या समन्वयाने आवश्यक ती पावले गतीने उचलली जात आहेत”-डॉ.विरेन्द्र कुमार,केंद्रीय मंत्री,भारत सरकार.

    नवी दिल्लीत लोकसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू असून त्याचा दुसरा आठवडा सुरू झाला असून त्यात शिर्डीचे खा.भाउसाहेब वाकचौरे यांनी सातत्याने विविध प्रश्न उपस्थित करीत आहेत.त्यात यावेळी आज त्यांनी विमुक्त,घुमंतू,अर्धघुमंतू समुदाय यांच्या समस्यांवर आज लोकसभेत प्रश्न उपस्थित केला होता.यावर उत्तर देतांना केन्द्रीय मंत्री डॉ.विरेन्द्र कुमार यांनी सांगितले की,”बदलती परिस्थिती,स्थिर निवासाचा अभाव आणि योग्य कागदपत्रे नसल्यामुळे हा घुमंतू अर्धघुमंतू समुदाय सरकारी योजनांपासून वंचित राहिला आहे.केन्द्र सरकार सामाजिक न्यायाशी निगडीत विविध योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी कटिबध्द आहे तसेच शिर्डी लोकसभा क्षेत्रासह देशातील वंचित घटकांपर्यंत कल्याणकारी योजना पोहोचवण्यासाठी तसेच या समुदायांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य सरकारच्या समन्वयाने आवश्यक ती पावले गतीने उचलली जात आहेत.

लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनात शिर्डीचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी भटक्या विमुक्त जाती-जमातीचा प्रश्न उपस्थित केला तो क्षण.

“भटक्या जाती जमातीसाठी महाराष्ट्रासह सात राज्यांमध्ये उपविभागीय अधिकारी स्तरावर सत्यापन मोहीम राबवली जात आहे.महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यांत ही प्रक्रिया सुरु असून त्यात अहिल्यानगर,बीड,उस्मानाबाद,सोलापूर आणि पुणे आदी जिल्ह्याचा त्यात समावेश असल्याची माहिती केंद्रीय मंत्री डॉ.विरेंद्र कुमार.

   योजनामध्ये शैक्षणिक सक्षमीकरणासाठी उच्च स्पर्धा परीक्षांच्या प्रशिक्षणाची व्यवस्था,आरोग्य विमा सुविधा,उद्योजकतेसाठी लहान उद्योग स्थापन करण्यास प्रोत्साहन, घरकुलासाठी आर्थिक मदत अशा अनेक उपक्रमांचा समावेश असल्याचेही त्यांनी सांगितले.याशिवाय ओबीसी,ईबीसी आणि डीएनटी विध्यार्थ्यांसाठी पूर्व माध्यमिक शाळा शिष्यवृती,शाळांत परीक्षा शिष्यवृती,टॉप क्लास स्कूल शिक्षण शिष्यवृती,राष्टीय ओव्हरसिज शिष्यवृती,अनुसूसचित जाती,विमुक्त घुमंतू,अर्धघुमंतू जमाती,भुमिहीन कृषीमजुर व पारंपारिक कारागीरांसाठी विदेशात उच्च शिक्षणाच्या संधी अशा योजना राबवित असल्याचे मंत्री डॉ.विरेन्द्र कुमार यांनी सांगितले.

   दरम्यान पुढे बोलताना मंत्रालयाने सांगितले की,”दिनाक 21 फेब्रवारी  2019 च्या नीति आयोगाच्या तज्ञ समितीच्या शिफारशीनुसार देशभरातील भटक्या,अर्धभटक्या समुदायांचे सूचीकरण आणि जात प्रमाणिकरण जलद गतीने सुरु आहे,महाराष्ट्रासह सात राज्यांमध्ये उपविभागीय अधिकारी स्तरावर सत्यापन मोहीम राबवली जात आहे.महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यांत ही प्रक्रिया सुरु असून त्यात अहिल्यानगर,बीड,उस्मानाबाद,सोलापूर आणि पुणे आदी जिल्ह्याचा त्यात समावेश असल्याचे शेवटी सांगितले आहे.खा.वाकचौरे यांनी भटक्या समाजाच्या व्यथा लोकसभेत उपस्थित केल्याबद्दल त्यांचे अनेकांनी स्वागत केले आहे व त्यांचे आभार मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close