रेल्वे सेवा
खा.वाकचौरे यांचे उपस्थितीत रेल्वे अधिकाऱ्यांची बैठक !

न्युजसेवा
कोपरगाव -(नानासाहेब जवरे)
शिर्डी लोकसभा मतदार संघाच्या रेल्वेच्या विविध समस्या सोडविण्यासाठी व प्रत्यक्ष पाहणी करणेसाठी दिनांक १९ जुलै रोजी रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी भेट दिल्यानंतर आता याबाबत बुधवार दि.१३ ऑगस्ट २०२५ रोजी कोपरगाव तहसील कार्यालयात दुपारी १२ वाजता खा.भाऊसाहेब वाकचौरे यांच्या उपस्थितीत बैठक होणार असल्याची माहिती खा.वाकचौरे यांचे प्रसिद्धी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

रेल्वेच्या विकास कामांनी शेतकऱ्यांचे रस्ते बाधित होत असल्याने कोपरगाव तहसील कार्यालयात संयुक्त बैठक होत आहे त्या करीता रेल्वे अधिकारी समक्ष उपस्थीत अधिकारी राहणार असून दिनांक १३ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता तहसील कार्यालयात आयोजित करणेकामी योग्य ती उचित कार्यवाही करावी असे आदेश खा. भाऊसाहेब वाकचौरे यांनी कोपरगाव तहसीलदार महेश सावंत यांना दिलेले आहे.
भारतीय रेल्वेने आपले आधुनिकिरण करण्याचे काम वेगाने सुरू केले आहे.विशेषता मेट्रो मार्गाचा विस्तार आणि त्यावर वाढविण्यात येणाऱ्या गाड्या मोठ्या प्रमाणावर वाढविण्यात येत आहे.त्यामुळे प्रवाशांचा प्रवासाचा वेग वाढून वेळ कमी होत आहे.त्यामुळे राज्यासह देशात वंदे भारत,आणि तत्सम मेट्रो गाड्यांचे स्वागत होत आहे तर दुसरीकडे रेल्वेचा वेग वाढविण्याच्या नादात रेल्वे मार्गांना झपाट्याने रेल्वे संरक्षक कठडे (बॅरिकेट) बसविण्यासाठी व भुयारी मार्ग काढण्याच्या कामास वेग आला असून हे काम अंतिम टप्प्यात आले आहे.मात्र यासाठी ज्या शेतकऱ्यांच्या शेतातून हा रेल्वेमार्ग जात आहे त्यांना विचारात घेताना दिसत नाही.परिणामस्वरूप त्यांच्या शेतात जाण्याचे मार्ग बंद होताना दिसत आहे.काही ठिकाणी अद्याप भुयारी मार्ग तयार झालेले नाही.त्यामुळे नागरी वस्तीचे थेट विभाजन होऊन त्यांच्यात संपर्क तुटत आहे.अशीच अवस्था कोपरगाव,राहाता,श्रीरामपूर,राहुरी तालुक्यात होत आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाण्यासाठी मोठे अडथळे निर्माण झाले आहे.त्यातून मार्ग काढण्यासाठी मागील महीण्यात शिर्डीचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी पुणे रेल्वे विभागाचे अधिकारी यांचे उपस्थितीत शिर्डीत बैठक घेऊन खिर्डी गणेश,बोलकी,आचलगाव,संवत्सर (लक्ष्मणवाडी) येथील स्थळ पाहणी केली होती.त्यानुसार बुधवार दिनाक १३ ऑगस्ट रोजी कोपरगाव तहसील कार्यालयात बैठकीचे आयोजन करणार असल्याचे जाहीर केले होते.

दरम्यान या बैठकीत वेळ आणि पैसा वाचविण्यात अहंम भूमिका निभावणारा व दुष्काळी भागाचे भविष्य उज्ज्वल करणारा पुणे- नाशिक रेल्वे गतिशील होण्याची अपेक्षा असून जवळके,बहादरपूर मार्गे साईबाबांची शिर्डी हा सर्वात जवळचा मार्ग जोडण्याची चर्चा अपेक्षित आहे.
दरम्यान या बाबत पुणे येथील रेल्वे अधिकारी यांचे समक्ष पाहणी केली असता त्यात महसूल विभागाने लक्ष घालणे आवश्यक असल्याचे दिसून आलेले आहे. त्यासाठी संबधित येवला येथील पालखेड पाटबंधारे डावा कालवाचे कार्यालयाचे निर्णयक्षम अधिकारी,सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी,तलाठी,मंडळ अधिकारी,यांची कोपरगाव तहसील कार्यालयात संयुक्त बैठक होत आहे त्या करीता रेल्वे अधिकारी समक्ष उपस्थीत अधिकारी राहणार असून दिनांक १३ ऑगस्ट रोजी दुपारी १२ आयोजित करणेकामी योग्य ती उचित कार्यवाही करावी असे आदेश कोपरगाव तहसीलदार महेश सावंत यांना दिलेले आहे.राहाता,कोपरगाव तालुक्यातील संबंधित अधिकारी,शेतकरी आणि अधिकाऱ्यांनी या बैठकीसाठी उपस्थित राहावे असे आवाहन खा.वाकचौरे यांनी शेवटी केले आहे.