जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
महिला बालविकास विभाग

लाडक्या बहिणींचे २१०० रुपयांचा स्वप्न पूर्ण करणार-…या मंत्र्यांचे सूतोवाच

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

शिर्डी (अहिल्यानगर)

    महायुती सरकारनं ‘लाडकी बहीण योजना’ सुरू करत महिलांना दरमहा १५०० रुपये देण्याचा निर्णय घेतला होता.पुन्हा सत्तेत आल्यावर ही रक्कम २१०० रुपये देण्याची घोषणा निवडणूक प्रचारावेळी करण्यात आली होती टी योग्य वेळी पूर्ण करण्यात येईल असे सूतोवाच महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी नुकतेच केले आहे.

  

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या भेटीबाबत बोलताना त्या म्हणाल्या की,”सार्वजनिक कार्यक्रमात नेत्यांची भेट होत असतात.त्यात वेग़ळं काही पाहण्याची गरज नाही.जरी दोघांनी वेगवेगळे निर्णय घेतले असले तरी ते एकमेकांचे शत्रू नाहीत”-अदिती तटकरे,मंत्री,महिला बालविकास विभाग.महाराष्ट्र राज्य.

   आता महायुतीचं सरकार येवून तब्बल १०० दिवसांचा काळ पूर्ण झालाय.तरी देखील महिलांना २१०० रुपयांची वाट पाहावी लागत आहे.२१०० रुपये देण्याचा शब्द दिला होता की नाही यावरुन मतमतांतर पाहायला मिळत आहेत.यावर आता महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली.तसंच २१०० रुपये देण्यावरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला.त्याला देखील तटकरे यांनी उत्तर दिलंय.

बहिणींना २१०० रुपये देणारच :


“‘लाडकी बहीण योजना’ ही महायुतीची महत्त्वाची योजना असून,ती चालूच राहणार आहे.महिलांना आर्थिक सक्षण करण्यासाठी ही योजना आणली.आता महिलांमध्ये आर्थिक साक्षरता आणणं हे आमचं पुढचं पाऊल आहे.२१०० रुपये देण्याबाबतचा निर्णय आमचं महायुतीचं सरकार योग्यवेळी घेणार आहे.लाडक्या बहिणींना १५०० रुपये देण्याचं वचन जसं आम्ही पूर्ण केलं,तसंच २१०० रुपये देण्याचं वचनही आम्ही पूर्ण करणार आहोत,”असं स्पष्टीकरत देत मंत्री अदिती तटकरे यांनी मात्र २१०० रुपये कधी देणार याची तारीख सांगितली नाही.

  विरोधकांवर हल्लाबोल :


    ‘लाडकी बहीण योजना’ आधीपासूनच विरोधकांच्या नजरेत खुपत आलीये.आता विरोधक स्वत:चं नैराश्य ‘लाडकी बहीण योजने’वर काढत आहेत.मात्र,आम्ही जसे १५०० दिले तसेच २१०० रुपये देण्याचं वचन महिलांना दिलंय.यापासून आम्ही फारकत घेणार नसल्याचं मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे.

…ते एकमेकांचे शत्रू नाहीत :


   “सार्वजनिक कार्यक्रमात नेत्यांची भेट होत असतात.त्यात वेग़ळं काही पाहण्याची गरज नाही.जरी दोघांनी वेगवेगळे निर्णय घेतले असले तरी ते एकमेकांचे शत्रू नाहीत,”अशी प्रतिक्रिया अदिती तटकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जयंत पाटील यांच्या भेटीबाबत बोलताना दिली आहे.

खरेदीचा लुटला आनंद :


   मंत्री अदिती तटकरे रविवारी अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होत्या.अकोले येथे राष्ट्रवादीचे आमदार किरण लहामटे यांच्या कळसूआई महोत्सवाला त्यांनी भेट दिली. महिलांनी स्वयंरोजगातून निर्माण केलेल्या स्टॉलला देखील मंत्री तटकरे यांनी भेट देत खरेदीचा आनंद लुटला आहे.ग्रामीण भागातील बचतगटाच्या महिलांनी आता अर्थिक सक्षमीकरणाकडं लक्ष देवून पतसंस्था उभारत बँकींग क्षेत्रात यावं,असं आवाहन मंत्री तटकरे यांनी शेवटी केलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close