महिला बालविकास विभाग
‘नारी शक्ती दूत’ ऐप थकले,सेतू चालकांना मोबदला नसल्याने पंचाईत !
न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
महाराष्ट्र सरकारकडून,’लाडकी बहीण योजने’ची घोषणा करण्यात आल्यानंतर राज्यभरात सध्या याच योजनेची चर्चा सुरु आहे.या योजनेची चर्चा होण्यामागील कारणही अगदी तसंच आहे.राज्य सरकार अडीच लाखांपेक्षा कमी वार्षित उत्पन्न करणाऱ्या कुटुंबातील महिलांना दर महिन्याला आता १५०० रुपये मदत म्हणून देणार आहे.राज्य सरकार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतून ही आर्थिक मदत राज्यभरातील महिलांना करणार आहे.मात्र यातील,’नारी शक्ती दूत एप’ चालताना दिसत नसल्याने महिलांची मोठी कुचंबणा होताना दिसत आहे.यातच राज्य सरकारने सेतू चालकांना सदरचे काम मोफत करण्याची सूचना केल्याने सेतू चालकांच्या तोंडाला पाने पुसून हे काम अधिकृतरित्या सरकार कसे करणार हा प्रश्न निर्माण झाला आहे.
महाराष्ट्र सरकारकडून लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आल्यानंतर राज्यभरात सध्या याच योजनेची चर्चा सुरु आहे.राज्य सरकार अडीच लाखांपेक्षा कमी वार्षित उत्पन्न करणाऱ्या कुटुंबातील महिलांना दर महिन्याला आता १ हजार ५०० रुपये मदत म्हणून देणार आहे.राज्य सरकार,’मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेतून ही आर्थिक मदत राज्यभरातील महिलांना करणार आहे.या योजनेच्या घोषणेनंतर राज्य सरकारने ०५ एकर पेक्षा जास्त जमीन असलेल्या महिलांनाही अर्ज करता येईल,अशी सुधारणा निकषांमध्ये केली.या योजनेच्या घोषणानंतर तहसील कार्यालयांवर महिलांची मोठी गर्दी होऊ लागली होती.विविध कागदपत्रे बनवण्यासाठी ही गर्दी जमत होती.ही गर्दी पाहून राज्य सरकारने कागदपत्रांमध्येही शिथिलता दिली आहे.आता महिलांच्या जन्मदाखला,मतदान ओळखपत्र यांच्यावरही त्यांना अर्ज करता येणार आहे.या योजनेचा अर्ज करण्यासाठी महिलांची सेतू कार्यालयांवर होणारी गर्दी पाहता सरकारने एक अॅपदेखील आणलं आहे.या अॅपमधून महिला घरबसल्या या योजनेसाठी अर्ज करु शकणार आहेत. ‘नारीशक्ती दूत’ असं या अॅपचं नाव आहे.अंगणवाडी सेविकांना याचे ५० रुपये अर्ज मंजूर झाल्यावर दिले जाणार असल्याची माहिती आहे.मात्र या सेतू चालकांना हे काम मोफत करण्याची सूचना केली आहे व जर यात कोणी रकमेची मागणी केली तर कारवाई करणार असल्याचा इशारा राज्याच्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.त्यामुळे सेतू चालकांची अवस्था,’तोंड दाबून बुक्क्यांचा मार’ अशी झाली असून तक्रार कोणाकडे करायची असे अवघड जागेचे दुखणे झाले आहे.त्या विरोधात त्यांनी एक दिवशीय लक्षणीय आंदोलन केले आहे.मात्र त्याची दखल कोणीही घेतलीं नाही हे विशेष !
दरम्यान सदरचे नारी शक्ती दूत हे ऐप दिवसा आणि रात्री उशिरा पर्यंत चालत नाही ते चालते पहाटे ०३ ते सकाळी ०६ वाजेच्या दरम्यान चालते अशी सार्वत्रिक तक्रार आहे.बऱ्याच वेळा ओ.टी.पी.न टाकता ही सदर अर्जदाराचा टाइम आउट झाला तरी तो अर्ज स्वीकारला जात असल्याच्या तक्रारी आहेत.व विशेष म्हणजे तो स्वीकारला जात आहे.मात्र त्यात अर्जदाराच्या मोबाईलवर येणारा ओ.टी.पी.आणि समक्ष ऑनलाइन फोटो टाकला तरच ते अधिकृत धरला जाणार असे सरकारने जाहीर केले आहे.त्यामुळे मोठा गोंधळ उडत आहे.शिवाय पहाटेच्या वेळेला अर्ज भरला तरी सेतू चालकांना पहाटे अर्जदार महिला कशा सापडणार ? त्यांचा ओ.टी.पी.कसा मिळणार असा सवाल निर्माण झाला आहे.शिवाय मामला हा महिलांचा आहे.
दरम्यान याबाबत आमच्या प्रतिनिधीने एकात्मिक महिला बाल कल्याण विभागाचे तालुका अधिकारी पंडित वाघेरे यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी या बाबी मान्य केल्या असून याबाबत आमची वर्तमानात चलचित्रण बैठक सुरू असून यात एकात्मिक महिला व बाल कल्याण विकास विभागाचे अधिकारी,जिल्हाधिकारी,गटविकास अधिकारी आदींची बैठक सुरू असून यावर पर्याय शोधण्याचे काम सुरू असल्याची माहिती दिली आहे.तर यातील अडचणी दूर करण्यासाठी उद्या सकाळी पुन्हा एकदा जिल्हाधिकारी,आयुक्त,महिला बाळ कल्याण विभागाचे अधिकारी,राज्य पातळीवर असलेले सचिव आदी सहभाग नोंदवणार असल्याची माहिती दिली असून या अडचणी आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कानावर घातल्या असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
दरम्यान सरकारने आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा उद्योग सुरू केला आला तरी वर्तमान स्थितीत महाविद्यालयीन प्रवेश सुरू आहे.त्यासाठी उत्पन्न,जातीचे दाखले,नॉन क्रिमिलेअर व अन्य शैक्षणिक दाखले गेल्या अनेक दिवसापासून प्रलंबित होत आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ शकत असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.