जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
अपघात

अपघातात एक ठार,कोपरगावात गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी )

   कोपरगाव तालुक्यातील वेळापूर शिवारात ब्राह्मणनाल्याजवळ आपल्या पत्नी व मुलांना भेटून आपल्या कारवाडी येथे परत रस्त्याने पायी जात असताना आठ दिवसापूर्वी रात्री ०९ वाजेच्या सुमारास अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यात बापू त्रिंबक माळी (वय-४५) हा इसम ठार झाला असल्याचा गुन्हा फिर्यादीचा चुलतभाऊ नवनाथ विठ्ठल माळी (वय-२९) याने फगुन्हा दाखल केल्याने कारवाडी आणि परिसरात खळबळ उडाली आहे.

मयत इसम हा कारवाडी येथील रहिवासी असून तो आपल्या सासुरवाडीला आपल्या बायकोस आणि मुलास भेटून दिनाक ०९ डिसेंबर रोजी रात्री ०९ वाजता घरी जात असताना त्यास वेळापूर ग्रामपंचायत हद्दीत ब्राह्मणनाला या ठिकाणी अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली आहे.

   देशभरात रस्ते अपघातात वाढ होऊन ते दीड लाखांहून अधिक होऊन ते आता पावणेदोन लाखांवर गेले असल्याची माहिती दस्तुर खुद केंद्रीय रस्तेविकास मंत्री नितीन गडकरी यांनी संसदेत दिली आहे.रस्ते अपघात दिवसेंदिवस भीषण रूप धारण करत आहे.त्यावर तोडगा काढणे अवघड बनले असल्याची कबुली त्यांनी दिली आहे.त्याला नगर-मनमाड , झगडेफाटा ते वडगाव पान फाटा आदी रस्त्यानंतर आता सावळीविहीर ते भरवस फाटा या रस्त्याचा क्रमांक लागतो की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे.

   या रस्त्याचे काम वेगाने सुरू आहे.त्यातील काही काम पूर्णत्वास गेले आहे तर अद्याप काही काम बाकी आहे.मात्र या मार्गावर अपघातांची संख्या कमी होण्याची शक्यता दिसत नाही.अशीच घटना नुकतीच उघडकीस आली आहे.यातील मयत इसम हा कारवाडी येथील रहिवासी असून तो आपल्या सासुरवाडीला आपल्या बायकोस आणि मुलास भेटण्यास आला होता.तो दिनाक ०९ डिसेंबर रोजी रात्री ०९ वाजता घरी जात असताना त्यास वेळापूर ग्रामपंचायत हद्दीत ब्राह्मणनाला या ठिकाणी अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली आहे.त्यात गंभीर जखमी झाला होता.नजीकच्या ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली असता तो जागीच मृत झालेला आढळला असल्याची माहिती आहे.

   दरम्यान या प्रकरणी माहिती मिळताच कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप कोळी,पो.हे.को.एम.बी.दहिफळे आदी हे घटनास्थळी धावून गेले होते.त्यांनी घटनास्थळाचा  पंचनामा करून या प्रकरणी पुढील तपास सुरू केला आहे.

   दरम्यान या प्रकरणी फिर्यादी नवनाथ विठ्ठल माळी याने कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.तालुका पोलिसांनी या प्रकरणी आपल्या दप्तरी गुन्हा क्रं.
या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक-३९९/२०२४ भारतीय न्याय संहिता सन-२०२३चे कलम १०६(१),२८१,१२५,(बी),३२४ (४),मोटार वाहन कायदा कलम १८४,१३१,(अ)(ब) प्रमाणे अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.घटनास्थळी शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांनी भेट दिली आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हे.कॉ.दहिफळे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close