जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
महसूल विभाग

मोठ्या प्रतीक्षेनंतर वर्ग-२च्या शेतकऱ्यांना मिळाला न्याय-माहिती

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

भोगवटदार वर्ग २ चा जवळपास १२२ कोटीचा महसूल बुडविण्यात राज्याचे प्रशासन सहमत नसतांना महसूलमंत्री विखे यांनी घेतलेल्या निर्णायक भूमिकेमुळे खंडकरी शेतकऱ्यांना न्याय मिळाला आहे.त्याचबरोबर महसूल विभागाच्या अनेक ऐतिहासिक निर्णयांचा कोपरगाव मतदार संघाला फायदा झाला असल्याचे गौरवोद्गार आ.आशुतोष काळे यांनी नुकतेच काढले आहे.

 

  सन-२०२३-२४च्या खरीप हंगामाच्या नुकसान भरपाई पोटी पिक विम्याची अग्रिम मदत ३५ कोटी १६ लाख दिलेली असून उर्वरित ७५ टक्केची ४४.४२ कोटी रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होत असून एक लाख पर्यंत नुकसान भरपाई मिळाली आहे. सोयाबीन, कपाशी हेक्टरी पाच हजार अनुदान व दुध अनुदान प्रती लिटर सात रुपये वाटप सुरु आहे"-आ.आशुतोष काळे,कोपरगाव.

   कोपरगाव तहसील कार्यालयाच्या सभागृहात आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते खंडकरी शेतकऱ्यांना वर्ग-१ च्या सात बारा उताऱ्यांचे वितरण करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते.

सदर प्रसंगी महानंदाचे माजी चेअरमन राजेश परजणे,तहसीलदार महेश सावंत,कर्मवीर शंकरराव काळे कारखाना तसेच विविध संस्थांचे संचालक,पदाधिकारी,महसूल विभागाचे अधिकारी,खंडकरी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

         सदर प्रसंगी पुढे बोलतांना आ. काळे म्हणाले की,”कोपरगाव शहरालगत असलेल्या डेअरी पोल्ट्री व वळूमाता प्रक्षेत्राची असलेली जागा व औद्योगिक वसाहतीला देण्याचा निर्णय असेल किंवा शेती महामंडळाची जागा एमआयडीसीला देणे तसेच शेती महामंडळाच्या कर्मचारी व त्यांच्या वारसांना,घरकुल लाभार्थ्यांना व ग्रामपंचायतीला सार्वजनिक कामासाठी देण्याचा निर्णय मतदार संघासाठी अत्यंत फायद्याचा असून खंडकरी शेतकऱ्यांच्या जमिनीच्या उताऱ्यावर असलेली भोगवटादार २ हि नोंद रद्द करून भोगवटादार १ करून महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी खंडकरी शेतकऱ्यांना न्याय दिला आहे.त्याबद्दल मतदार संघातील खंडकरी शेतकऱ्यांच्या वतीने त्यांचे आभार मानले आहे. या उताऱ्यावर इतर हक्कामध्ये शेती महामंडळ किंवा बायो-रिफाइनरी अशी येत असलेली नोंद देखील या उताऱ्यावरून दिवाळीपूर्वीच काढून टाका अशा सूचना तहसीलदार महेश सावंत यांना दिल्या त्या सूचनेचे उपस्थित खंडकरी शेतकऱ्यांनी टाळ्या वाजवून स्वागत केले आहे.

  सन -२०२३ च्या खरीप हंगामाच्या नुकसान भरपाई पोटी पिक विम्याची अग्रिम मदत ३५ कोटी १६ लाख दिलेली असून उर्वरित ७५ टक्केची ४४.४२ कोटी रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होत असून एक लाख पर्यंत नुकसान भरपाई मिळाली आहे. सोयाबीन, कपाशी हेक्टरी पाच हजार अनुदान व दुध अनुदान प्रती लिटर सात रुपये वाटप सुरु आहे”-आ.आशुतोष काळे,कोपरगाव.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close