जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
महसूल विभाग

बनावट जात प्रमापत्र बनवणारी टोळी सक्रिय,शिर्डीत उघड !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

    मागास प्रवर्गातील व्यक्तीला शिक्षण,राजकारण,नोकरी किंवा इतर कशातही आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्राची आवश्यकता असते.मात्र या कामासाठी बनावट प्रमाणत्र देणारी एक टोळी कोपरगाव शहरात सक्रिय असल्याची धक्कादायक माहिती शिर्डीत उघड झाली असल्याची माहिती हाती आली असून त्यांच्यावर शिर्डी येथील प्रांताधिकारी यांनी कारवाई सुरू केली आहे.त्याला जबाबदार अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे.

 

या बाबत एका इतर मागास जात प्रमापत्राची शंका अधिकाऱ्यांना आल्याने हा भांडाफोड शिर्डीत झाला आहे.या बाबत आता तपासणी सुरू झाली असून प्राथमिक तपासणीत कोपरगाव तहसील पातळीवर दोन तर प्रांत शिर्डी पातळीवर एक प्रमाणपत्र बनावट आढळून आले आहे.

  मागास प्रवर्गातील व्यक्तीला शिक्षण,राजकारण,नोकरी किंवा इतर कशातही आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्राची आवश्यकता असते.आरक्षित जागांवर शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेतला किंवा नोकरी मिळवली तर जात वैधता प्रमाणपत्र सादर करणं बंधनकारक असतं.यासोबतच सरकारी नोकरदारांना आरक्षणानुसार बढती मिळवायची असेल तर त्यांच्याकडे जात वैधता प्रमाणपत्र असणं आवश्यक असतं.वर्तमानात याच ओबीसी आरक्षणावरून मोठे रणकंदन सुरू आहे.यावरून याचे गांभीर्य सहज लक्षात येईल.


    मात्र हे जात वैधता प्रमाणपत्र म्हणजे नेमकं काय ? हे प्रमाणपत्र काढण्यासाठी कुठे अर्ज करावा लागतो? त्यासाठी कोणकोणती कागदपत्रं लागतात ? आणि जात वैधता प्रमाणपत्र नेमकं किती दिवसात मिळतं ? याची अनेक ग्रामस्थांना माहिती नसते याचा अनेक टोळ्या फायदा उचलून त्यांची मोठी आर्थिक लुबाडणूक करताना दिसत असून याचीच पूनरार्वृती कोपरगाव शहरात होतांना दिसत असून अशीच एक टोळी उघड झाली असल्याची माहिती हाती आली आहे.

    या बाबत एका इतर मागास जात प्रमानपत्राची शंका अधिकाऱ्यांना आल्याने हा भांडाफोड झाला आहे.या बाबत आता तपासणी सुरू झाली असून प्राथमिक तपासणीत कोपरगाव तहसील पातळीवर दोन तर प्रांत शिर्डी पातळीवर एक प्रमाणपत्र बनावट आढळून आले आहे.

  दरम्यान या पूर्वी तहसीलमधील अनेक कागदपत्रे बाहेर दलाल यांचेकडे आढळून आले असताना व त्याची संबंधितांना माहिती असताना या पूर्वीच्या तहसीलदारांनी काहीही कारवाई केलेली असल्याचे दिसून आले नाही.त्यामुळे जबाबदार अधिकारी यात सामील असल्याचे उघड झाले आहे. महुसल मंत्र्यांच्या जिल्ह्यात हे दलाल सक्रिय असल्याने आता प्रांताधिकारी काय कारवाई करणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close