महसूल विभाग
…या ठिकाणी होणार जात पडताळणी कार्यालय !
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
“आदिवासी बांधवांच्या सोयीसाठी नाशिक येथील जात पडताळणी कार्यालय लवकर शिर्डी येथे सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी आदिवासी महादेव कोळी एका शिष्ठ मंडळाला दिले आहे.
अ.नगर जिल्ह्यासाठी शासनाने मंजूर केलेली अनुसूचित जमाती जात पडताळणी समिती नाशिक-२ या नावाने सध्या कार्यरत असून,ती सध्या आदिवासी विकास भवन नाशिक येथेच सुरु आहेत.त्या कार्यक्षेत्रामध्ये व सर्व आदिवासीच्या सोयीसाठी मध्यवर्ती ठिकाणी म्हणून शिर्डी येथे सुरू करण्यासाठी शासन स्तरावरून आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जातील असे आश्वासन कोपरगाव येथे महसुल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी आदिवासी महादेव कोळी युवक संघटनेच्या कार्यकर्त्याना दिले आहे.
याप्रसंगी आदिवासी महादेव कोळी युवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमित आगलावे यांनी यासंदर्भात निवेदन देऊन या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात आणून दिले होते.अनुसूचित जमाती जात पडताळणी समिती नाशिक-२ या कार्यालयाचे कार्यक्षेत्र अ.नगर जिल्हा व नाशिक मधील सहा तालुके आहे.परंतु नाशिक-२ समिती फक्त अ.नगर जिल्ह्यासाठी शासनाने मंजूर केली होती.ती तिच्या कार्यक्षेत्र मध्येच सुरू होणे गरजेचे आहे.या संदर्भात संघटनेमार्फत उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथे २०२१ मध्ये जनहित याचिका दाखल केली असून उच्च न्यायालयाने शासनास आपले म्हणणे सादर करण्यासाठी आदेश केलेले आहेत.
सदर समितीच्या कार्यक्षेत्रातील पंधरा लक्ष आदिवासी बांधवांची गैरसोय सध्या होत आहेत ती समिती शिर्डी येथे होणे संदर्भात संघटनेमार्फत वेळोवेळी प्रयत्न करण्यात आले असून तिच्या कार्यक्षेत्रातील आमदारांनी सुद्धा समिती शिर्डी येथे होणे संदर्भात मंत्र्यांना शिफारस केलेली आहे.यामध्ये आ.आशुतोष काळे.आ.डॉ.किरण लहामटे,आ.निलेश लंके आदींनी या सर्वांनी शिफारस केलेली आहे.
सदर समिती लवकरात लवकर शिर्डी या ठिकाणी स्थापन होऊन कार्यक्षेत्रातील पंधरा लाख आदिवासी बांधवांना होणारा त्रास बंद करून देण्यात यावा अशी मागणी केली आहे.
याप्रसंगी अमित आगलावे व समस्त आदिवासी बांधवांनी मंत्री महोदयांना दिले.यावेळी विजय वहाडणे,माजी नगराध्यक्ष,नगरपालिका कोपरगाव यांनी आदिवासी बांधवांचे शिष्टमंडळ व मंत्री यांच्या दरम्यान चर्चा घडवून आणण्यासाठी मोलाचे सहकार्य केले आहे.