जाहिरात-9423439946
भ्रष्टाचार

…या कारणासाठी महिला कर्मचाऱ्याने घेतली लाच !

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

   कोपरगाव तहसील कार्यालयात काल 07 हजार रुपयांची साक्षीदारांसमोर लाच घेताना अटक केलेल्या महसूल सहाय्यक अंजना पंडीत पवार यांनी तक्रारदार यांच्याकडे न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे नमुद मिळकतीचा वाटप तक्ता मंजुर करून ताबा देण्याचा आदेश तहसिलदार यांचेकडुन मिळवुन देण्यासाठी घेतली असल्याचे उघड झाले आहे.त्यामुळे तालुक्यातील ग्रामस्थानी नाराजी व्यक्त केली आहे.महसूल विभागातील हा लुटण्याचा धंदा थांबणार केव्हा असा सवाल केला आहे.

कोपरगाव तहसील कार्यालय.

“महसूल विभाग हा भ्रष्टाचारात निर्ढावलेला आहे.त्यांच्या निवडणूक शाखेत दीड वर्षापूर्वी निवडणुकीचे काम पाहणारे सरकारी कर्मचारी (बी.एल.ओ.) यांचे पर्यवेक्षणाची सुमारे सहा लाखांची रक्कम तत्कालीन तहसीलदार संदीप भोसले,नायब तहसीलदार मनिषा कुलकर्णी,निवडणूक शाखेत काम करणारा कर्मचारी शिरसाठ आदींनी मिळून हडप केली आहे.याबाबत आपण कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करूनही अद्याप पोलिसांनी कारवाई केलेली नाही.केवळ चौकशी सुरू असल्याचे ते सांगत आहे”-संजय काळे,सामाजिक कार्यकर्ते,कोपरगाव.

संजय काळे,कोपरगाव.

   भाजपचे केंद्रीय नेतृत्व चांगले काम करताना दिसत असले तरी मात्र खालच्या पातळीवर नागरिकांना मात्र मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचाराचा सामना करावा लागत असल्याचे वास्तव आहे.दिवेदिवस तो वाढताना दिसत आहे.विविध विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यात मोठ्या प्रमाणावर सामील आहे.कोपरगाव तालुक्यातील शासनाच्या विविध विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असून नागरिकांना अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी हैराण करून सोडत असल्याचे दिसून येत आहे.त्यातून अनेक घटना उघडकीस येत असून आजच काही वेळापूर्वी तहसील कार्यालयात अंजना पंडित पवार नामक महसूल सहाय्यक महिला हिने सुमारे सात हजारांची लाच घेताना अहिल्यानगर येथील लाच लुचपत विभागाच्या पोलिस निरीक्षक छाया देवरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी साक्षीदारसंह पकडली असून तिला अटक केली होती.तिच्यावर मध्यरात्री 12 वाजेच्या सुमारास कारवाई केली आहे.याबाबत सर्वात आधी ‘ न्यूजसेवा’ या न्यूज पोर्टलवर बातमी प्रसिद्ध झाली होती.त्यामुळे कोपरगावसह उत्तर नगर जिल्ह्यातील महसूल विभागात खळबळ उडाली होती.मात्र सदर गुन्हा दाखल व्हायला आणि आरोपी महिलेचे जाबजबाब घ्यायला मध्यरात्र झाली होती.त्यानंतर हा गुन्हा दाखल झाला होता.त्यात त्यांनी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम सन-1988 चे कलम 7 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

विजय वहाडणे.

“केंद्र सरकार व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी,राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सातत्याने सर्वसामान्य माणसाला आधार मिळावा,न्याय मिळावा यासाठी प्रयत्नशील आहेत.पण दुर्दैवाने कोपरगाव शहरातील शासकीय,निम शासकीय कार्यालयात सर्वसामान्य जनतेची अक्षरशः लुट सुरु आहे.अपवाद वगळता प्रत्येक टेबलवर पैसे दिल्याशिवाय काम होऊच शकत अशी भयानक परिस्थिती आहे”-विजय वहाडणे,माजी नगराध्यक्ष,कोपरगाव नगरपरिषद.

   दरम्यान यासाठी सापळा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक भारत तांगडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक छाया देवरे यांचेसह पर्यवेक्षण अधिकारी अजित त्रिपुटे यांनी मोलाची कामगिरी केली असून त्यांना सापळा पथकातील सदस्य पोलिस कॉन्स्टेबल गजानन गायकवाड,सचिन सुद्रुक,वैभव सुपेकर,हारून शेख आदींनी मोलाची भूमिका निभावली आहे.त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

     दरम्यान याबाबत सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी म्हटले आहे की,”महसूल विभाग हा भ्रष्टाचारात निर्ढावलेला आहे.त्यांच्या निवडणूक शाखेत दीड वर्षापूर्वी निवडणुकीचे काम पाहणारे सरकारी कर्मचारी (बी.एल.ओ.) यांचे पर्यवेक्षणाची सुमारे सहा लाखांची रक्कम तत्कालीन तहसीलदार संदीप भोसले,नायब तहसीलदार मनिषा कुलकर्णी,निवडणूक शाखेत काम करणारा कर्मचारी शिरसाठ आदींनी मिळून हडप केली आहे.याबाबत आपण कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करूनही अद्याप पोलिसांनी कारवाई केलेली नाही.केवळ चौकशी सुरू असल्याचे ते सांगत आहे.त्यांना कोणीही शासन करत नाही असा सार्वत्रिक समज पसरला असल्याचे ही मंडळी कोणालाही जुमानत नाही असा आरोप संजय काळे यांनी शेवटी केला आहे.दरम्यान आता या घटनेनंतर तरी कोपरगाव महसूल विभागातील भ्रष्टाचार कमी होणार का ? असा सवाल कार्यकर्ते संजय काळे यांनी विचारला असून तालुक्याचे आ.आशुतोष काळे याबाबत महसूल विभागातील या किडीचा कसा बंदोबस्त करणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

    याबाबत भाजपचे माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी म्हटले आहे की,”केंद्र सरकार व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी,राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सातत्याने सर्वसामान्य माणसाला आधार मिळावा,न्याय मिळावा यासाठी प्रयत्नशील आहेत.पण दुर्दैवाने कोपरगाव शहरातील शासकीय,निम शासकीय कार्यालयात सर्वसामान्य जनतेची अक्षरशः लुट सुरु आहे.अपवाद वगळता प्रत्येक टेबलवर पैसे दिल्याशिवाय काम होऊच शकत अशी भयानक परिस्थिती आहे.सर्वसामान्य माणसांनी न्याय मागण्यासाठी जायचे तरी कुणाकडे ?असा सवाल केला आहे.आपल्या तालुक्याचे आ.आशुतोष काळे हे अनेकदा जनता दरबार घेतात.नागरिक पोटतिडकीने आपल्या समस्या मांडतात,कागदपत्रांची पूर्तता असूनही पैसे द्यावेच लागतात असे तोंडावर सांगतात.तरी काही गेंड्याच्या कातडीचे अधिकारी व कर्मचारी पैसे घेतल्याशिवाय काम करतच नाहीत.आ.काळे यांनी अनेकदा संताप व्यक्त केला,खडसावले तरीही निर्लज्ज अधिकारी भिकाऱ्यासारखे पैसे मागतातच.तहसील कार्यालयाभोवती अधिकाऱ्यांनी पोसलेले काही दलाल फिरत असतात.त्यांना चिरीमिरी दिली तर काम सोपे होते असा आरोप विजय वहाडणे यांनी शेवटी केला आहे.

  

“राजकीय नेत्यांच्या कार्यकर्त्यांचे अवैध वाळू,रेशनमधील तांदूळ,गहू वाहतूक व विक्री करण्याचा धंदा तेजीत आहे.त्यामुळे राजकिय नेते देखील या धंद्यांना संरक्षण पुरवत असतात त्यामुळे राजकिय नेत्यांचा महसूल अधिकारी यांच्यावर कोणताही वचक राहिला नाही.त्यामुळे कर्मचारी यांच्या तक्रारी कोणाकडे कराव्या या मनःस्थितीत असलेले नागरीक थेट लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटून तक्रार दाखल करत आहे”- ॲड.नितीन पोळ,कोपरगाव,लोकस्वराज्य आंदोलन.

   दरम्यान याबाबत लोकस्वराज्य आंदोलनाचे ॲड.नितीन पोळ यांनी म्हटले आहे की,”पूर्वीच्या काळात राजकिय नेत्यांचा प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यावर वचक होता मात्र वर्तमानात तरी राजकीय नेत्यांचा प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यावर वचक राहिला नाही असे दिसत आहे.महसूल विभागात मोठ्या प्रमाणावर राजरोसपणे भ्रष्टाचार सूरू असल्याचे दिसून येते.महसूल विभागात छोटया मोठया कामासाठी सर्व सामान्य नागरिकांना वारंवार चकरा माराव्या लागतात.मात्र महसूल विभागातील अधिकारी पैसै दिल्याशिवाय कोणतेही काम करत नाही जनतेने या भ्रष्ट अधिकारी यांची तक्रार कोणाकडे करावी असा प्रश्न पडला आहे.राजकीय नेत्यांच्या कार्यकर्त्यांचे अवैध वाळू,रेशनमधील तांदूळ,गहू वाहतूक व विक्री करण्याचा धंदा तेजीत आहे.त्यामुळे राजकिय नेते देखील या धंद्यांना संरक्षण पुरवत असतात त्यामुळे राजकिय नेत्यांचा महसूल अधिकारी यांच्यावर कोणताही वचक राहिला नाही.त्यामुळे कर्मचारी यांच्या तक्रारी कोणाकडे कराव्या या मनःस्थितीत असलेले नागरीक थेट लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटून तक्रार दाखल करत असल्याचा आरोप ॲड.नितीन पोळ यांनी शेवटी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close