पुरस्कार,गौरव
मुख्यमंत्र्यांना राज्याच्या…या समाजसेवकाकडून शुभेच्छा !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दूरध्वनीद्वारे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.त्याबाबत बाळासाहेब सेनेने कौतुक करुन समाधान व्यक्त केले आहे.
दरम्यान याबाबत मुख्यमंत्र्यांनीं एक विधान केले असून आपण आगामी काळात अण्णा हजारे यांच्या सदिच्छा भेटीसाठी लवकरच राळेगणसिद्धी दौरा करणार असं ल्याचे म्हटले आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज ६० वा वाढदिवस आहे.राज्यात अनेक ठिकाणी मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.या वाढदिवसानिमीत्त मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा देण्यासाठी ठाण्यात अनेक कार्यकर्ते मोठ्या उत्साहात दिसून येत आहे.ठाण्याच्या कोपरी पुलाचं उद्घाटन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घघाटन होत असल्याच्या पार्श्वभुमीवर राज्याचे जेष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान याबाबत मुख्यमंत्र्यांनीं एक विधान केले असून आपण आगामी काळात अण्णा हजारे यांच्या सदिच्छा भेटीसाठी लवकरच राळेगणसिद्धी दौरा करणार असं ल्याचे म्हटले आहे.
दरम्यान महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त अण्णा हजारे यांनी दूरध्वनीवरून शुभेच्छा देताना मुख्यमंत्र्यांच्या कामाचे कौतुक केले.तसेच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीची जोडगोळी गतिमान राज्यकारभार करत आहे असल्याची प्रतिक्रिया नोंदवली असल्याचे समजते दरम्यान मुख्यमंत्री यांचे पुत्र खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या आरोग्य सेवेतील कार्याचे कौतुक करत अण्णा हजारे यांनी केले असल्याचे समजते.