पुरस्कार,गौरव
डॉ.थोरात सी.सी.एम.पी.परीक्षा उत्तीर्ण
न्यूजसेवा
माहेगाव देशमुख-(प्रतिनिधी)
महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून २०२१ मध्ये घेण्यात झालेल्या सी.सी.एम.पी.या पदव्युत्तर परीक्षेमध्ये डॉ.अमोल थोरात हे प्रथम श्रेणी सह उत्तीर्ण झाले आहेत.त्यांच्या या यशाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
डॉ.अमोल रामनाथ थोरात गेल्या पंधरा वर्षांपासून,कोळपेवाडी-सुरेगाव परिसरामध्ये वैद्यकीय सेवा देत आहेत.कोरोना सारख्या महामारीमध्ये तसेच इतर साथीचा आजारां मध्ये शास्त्रशुद्ध उपचार व मानसिक आधार देऊन अनेक गरीब व गरजू रुग्णांना माफक दरात उपचार केले असून रुग्णांना योग्य सल्ला देवून त्यांचे वेळ पैसा व श्रम वाचविले हे यश मिळवले आहे.
कोळपेवाडी-सुरेगाव येथील डॉ.अमोल रामनाथ थोरात गेल्या पंधरा वर्षांपासून,कोळपेवाडी-सुरेगाव परिसरामध्ये वैद्यकीय सेवा देत आहेत.कोरोना सारख्या महामारीमध्ये तसेच इतर साथीचा आजारां मध्ये शास्त्रशुद्ध उपचार व मानसिक आधार देऊन अनेक गरीब व गरजू रुग्णांना माफक दरात उपचार केले असून रुग्णांना योग्य सल्ला देवून त्यांचे वेळ पैसा व श्रम वाचविले हे यश मिळवले आहे.त्याबदल त्यांचे कोळपेवाडी फॅमिली फिजीशन असोशिअशनचे अध्यक्ष डॉ.प्रकाश कोळपे व इतर पदाधिकारी सदस्य डॉ.दत्तात्रय म्हसू कोळपे,डॉ.अरुण वैराळ,डॉ.शिवाजीराव चांदगुडे,डॉ.सोपानराव जुंधारे,डॉ.आय.के.सय्यद तसेच कोळपेवाडी सरपंच सूर्यभान कोळपे,व इतर मान्यवर यांनी त्याचें अभिनंदन केले आहे.
आधुनिक वैद्यकशास्त्र मधील (अॅलोपॅथी) फार्मकोलाॅगी च्या विशेष अभ्यासक्रमामुळे ग्रामीण भागातच रुग्णांना अधिक सक्षमपणे आधुनिक औषधोपचार प्राप्त होणार आहे असे त्यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले आहे.