पुरस्कार,गौरव
भारत स्काऊट राज्य पूरस्कारासाठी…या विद्यार्थ्याची निवड

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
मुंबई येथे भारत स्काऊट आणि गाईडचा राज्य पुरस्कार वितरण समारंभ राज्यपाल भगतसिंग कोशारी यांचे हस्ते होणार आहे.त्यासाठी सेवानिकेतन कॉन्व्हेंट स्कूलचा विद्यार्थी अथर्व संजय भवर याची नगर जिल्यातून निवड करण्यात आली आहे. त्याच्या या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
राज्य पुरस्कारासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा राज्य पुरस्कार प्रमाणपत्र सोहळा दिनांक २६ एप्रिल रोजी राज्यपाल भगतसिंग कोशारी यांचे हस्ते स्काऊट गाईड पॅव्हिलियन,दादर येथे संपन्न होणार असल्याची माहिती संस्थेने दिली आहे.
सन-२०१८-१९ साली रामबाग भोर,पुणे येथे झालेल्या राज्य पुरस्कार परिक्षेमधे सेवानिकेतन कॉन्व्हेंट स्कूलचा विद्यार्थी अथर्व भवर याने भाग घेतला होता.ही परिक्षा महाराष्ट्रातील सर्व स्काऊटसाठी होती.त्यात राज्य पुरस्कारासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा राज्य पुरस्कार प्रमाणपत्र सोहळा दिनांक २६ एप्रिल रोजी राज्यपाल भगतसिंग कोशारी यांचे हस्ते स्काऊट गाईड पॅव्हिलियन,दादर येथे संपन्न होणार आहे.
या राज्य पुरस्कार सोहळा कार्यक्रमासाठी नगर जिल्ह्यातून दोन स्काऊट व दोन गाईडची निवड करण्यात आली असुन त्यात अथर्व भवरचा समावेश आहे.जिल्हा संघटक [ स्काऊट] जी.जे.भोर, सेवानिकेतन कॉन्व्हेंट स्कूलच्या मी,मॅनेजर सिस्टर झेलमा परेरा,प्राचार्या सिस्टर जोयलेट परेरा व स्काऊट मास्टर ज्ञानदेव घोरपडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले होते.या निवडीबद्दल अथर्व भवरचे तालुक्यातून अभिनंदन होत आहे.