जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
पुरस्कार,गौरव

…यांनी साहित्य निर्मितीची संस्कृती जोपासली-डॉ.उपाध्ये

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

    श्रीरामपूर(वार्ताहर) साहित्य म्हणजे समाजहित साधते ते लेखन असून कोपरगावचे साहित्यिक हेमचंद्र भवर यांनी साहित्यनिर्मिती आणि समाज प्रबोधन संस्कृती जोपासली असे  प्रतिपादन साहित्यिक डॉ.बाबुराव उपाध्ये यांनी नुकतेच श्रीरामपूर येथील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

“पुस्तके ही उगवत्या पिढीसाठी अमृतसरोवरे आहेत,ज्यातून त्यांच्या जीवनाला ज्ञान संजीवनी मिळणार आहे.शब्द हे देवाचे धन आहे ते वाचन भक्तीने आणि चिंतन पूजनाने आत्मसात केले पाहिजेत”-डॉ.बाबुराव उपाध्ये,साहित्यिक.


  
    श्रीरामपूर येथील इंदिरानगरमधील ग्रंथा वाचनालयात हेमचंद्र भवर आणि त्यांच्या साहित्य परिवाराचा सन्मान करण्यात आला,त्याप्रसंगी डॉ.उपाध्ये यांनी आपले मत व्यक्त केले आहे.

    प्रारंभी वाचन संस्कृती प्रतिष्ठनचे कार्याध्यक्ष गणेशानंद उपाध्ये यांनी हेमचंद्र भवर यांचा शाल,पुस्तके देऊन सत्कार केला.कोषाध्यक्षा मंदाकिनी उपाध्ये यांनी मंगल हेमचंद्र भवर यांचा सत्कार केला.प्रतिष्ठानच्या सचिव आरती उपाध्ये यांनी राधा अभिजित भवर यांचे स्वागत केले.अभिजित भवर व पंकज त्र्यंबक परजणे यांचा सन्मान डॉ.बाबुराव उपाध्ये यांनी करून दिव्यत्वाचे चिंतन,साहित्याचे दीपस्तंभ,समाजचिंतन,जीवनचिंतन आदी पुस्तके हेमचंद्र भवर यांच्या ग्रंथालयासाठी भेट दिली आहे.

   त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”पुस्तके ही उगवत्या पिढीसाठी अमृतसरोवरे आहेत,ज्यातून त्यांच्या जीवनाला ज्ञान संजीवनी मिळणार आहे.शब्द हे देवाचे धन आहे ते वाचन भक्तीने आणि चिंतन पूजनाने आत्मसात केले पाहिजेत.त्यासाठी गावोगावी ग्रंथप्रसार आणि ग्रंथनिर्मिती ही संस्कृती वाढावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

   त्यावेळी हेमचंद्र भवर यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले की,”डॉ.उपाध्ये यांचे वाचनालय म्हणजे परिसरासाठी अमृतसरोवर आहे.नगर जिल्ह्यात१९९० पासून त्यांनी वाचन चळवळ जोपासली त्यातून अनेक कवी,लेखक यांना वाचन,लेखन प्रेरणा मिळाली आणि नवोदित साहित्यिकांना निर्मितीसाठी सहकार्य केले आहे.
  
   कोपरगाव येथे डॉ.कन्हैय्या कुंदप,मेहता भाऊ,र.फ.शिंदे आदिंनी साहित्याला बळ दिले,श्रीरामपूरला डॉ.र.बा.मंचरकर,नामदेवराव देसाई,प्राचार्य डॉ.अशोक शिंदे,प्राचार्य देवदत्त हुसळे आदिंनी योगदान दिले,ते काळाच्या पडद्याआड गेले पण त्यांची प्रेरणागाथा येथे मनामनात आहे,आज डॉ. उपाध्ये ही ज्ञानज्योत पुढे नेत आहे,हे भूषणावह असल्याचे सांगून या साहित्य चळवळीच्या.आठवणी जागवल्या आहेत.सदर प्रसंगी आरती उपाध्ये यांनी सूत्रसंचालन करून उपस्थितांचे आभार मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close