जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
पुरस्कार,गौरव

…या नगरीत दांडिया रासला उत्स्फूर्त प्रतिसाद !

कोपरगाव -(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरात नवरात्र उत्सवानिमित्त लायन्स,लिओ व लिनेस क्लब ऑफ कोपरगाव व सखी सर्कल वुमेन्स ग्रुप आयोजित सुधन गोल्ड लोन प्रस्तुत दांडिया रास या भव्य दिव्य स्पर्धा १९ ऑक्टोबर २०२४ रोजी शहरातील साई सिटी येथील भव्य हॉलमध्ये उत्साहात संपन्न झाल्या असून या स्पर्धेला कोपरगाव शहरातील गरबा व दांडिया प्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे.

राधा आणि कृष्ण यांच्या पौराणिक आख्यायिका प्रसिद्ध आहेत.कृष्णाने राधा आणि अन्य गोपी यांच्यासह रासक्रीडा केली.या रासक्रीडेची आठवण म्हणून स्त्री आणि पुरुष दांडिया रास खेळतात असे मानले जाते.हा प्रकार आता महाराष्ट्रात आता चांगलच प्रसिद्ध झाला आहे.

   हरिवंश पुराण किंवा महाभारत या ग्रंथात राधा ही व्यक्तिरेखा आढळत नाही. देवी भागवत या ग्रंथात तिचा उल्लेख आढळतो.तेथे श्रीकृष्णाची रासलीला आणि त्यातील त्याची प्रमुख सहचरी म्हणून राधेचा उल्लेख आढळतो.वैष्णव संप्रदायाच्या भागवत पुराणात राधा ही कृष्णाची परमभक्त असल्याचा केवळ उल्लेख आहे.बाराव्या शतकात जयदेवाच्या गीत गोविंद काव्यातील राधेच्या वर्णनानंतर तिची देवी म्हणून लोकप्रियता अधिक वाढली असे अभ्यासक सांगतात.राधा आणि कृष्ण यांच्या पौराणिक आख्यायिका प्रसिद्ध आहेत.कृष्णाने राधा आणि अन्य गोपी यांच्यासह रासक्रीडा केली.या रासक्रीडेची आठवण म्हणून स्त्री आणि पुरुष दांडिया रास खेळतात असे मानले जाते.हा प्रकार आता महाराष्ट्रात आता चांगलच प्रसिद्ध झाला आहे.त्याला कोपरगाव शहर ही अपवाद नाही.

   

“साई आश्रया अनाथालयातील मुला मुलींसाठी सामजिक दायित्वातून सुधन परिवारातील पदाधिकारी,अधिकारी कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचा पगार दिला असून ही रक्कम १ लाख ५० हजार रुपये इतकी आहे” -संदीप कोयटे,अध्यक्ष,सुधन गोल्ड लोन.

  या स्पर्धेचे उद्घाटन कोपरगाव तालुक्याचे आ.आशुतोष काळे,ए.डी.सी.सी.बँकेच्या माजी संचालिका चैताली काळे,महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे,कोपरगाव नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा सुहासिनी कोयटे गोदावरी दूध संघाचे चेअरमन राजेश परजणे आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
     या स्पर्धेत तुलसीदास खुबानी ज्वेलर्स कडून उत्कृष्ट गरबा नृत्य करणाऱ्या ग्रुपला ११ हजार रुपये,उत्कृष्ट गरबा नृत्य करणाऱ्या कपाला विसपुते सराफ यांच्याकडून ३ हजार रुपये, वैशाली ऑटोमोबाईल्स कडून उत्कृष्ट गरबा नृत्य करणाऱ्या तीन महिलांना प्रत्येकी  २ हजार १०० रुपये, उत्कृष्ट गरबा नृत्य करणाऱ्या तीन पुरुषांना साई ज्योती पाइल्स हॉस्पिटल कडून २ हजार १०० रुपये,लहान मुलांमध्ये उत्कृष्ट कारभार नृत्य करणाऱ्या व उत्कृष्ट वेशभूषा असणाऱ्या मुलांना ५०० रुपये अशा प्रकारे रोख स्वरूपाची बक्षीसे देण्यात आली.
     सन्मती फायनान्शिअल ग्रुप कडून उत्कृष्ट वेशभूषा करणाऱ्या ग्रुपला ८ हजार रुपये,भारत एफ.आर.पी.कडून उत्कृष्ट वेशभूषा करणाऱ्या प्रत्येकी तीन कपलला ३ हजार रुपये, उत्कृष्ट वेशभूषा करणाऱ्या तीन महिलांना प्रत्येकी २ हजार १०० रुपये तर विमल फर्निचर कडून उत्कृष्ट वेशभूषा करणाऱ्या पुरुषांना प्रत्येकी २ हजार १०० रुपये, जेडी बिल्डर्स अँड इंटेरियर कडून उत्कृष्ट थ्री पीस व गरबा रिल्स असे प्रत्येकी २ व्यक्तींना २ हजार १०० रुपयांचे रोख बक्षीस देण्यात आले.
    तपेश्वरी शर्मा यांच्या डी जेच्या विविध गीतांच्या तालावर सहभागी स्पर्धकांनी मनमुराद आस्वाद घेतला.शिर्डी येथील साई आश्रया अनाथालयातील विद्यार्थ्यांनी विविध मराठी व हिंदी गीतांच्या तालावर सादर केलेले नृत्य कार्यक्रमाचे आकर्षण ठरले.लिओ दांडिया रास यशस्वीतेसाठी लायन्स,लिओ,लिनेस क्लब ऑफ कोपरगाव,सखी सर्कल वुमेन्स ग्रुपचे पदाधिकारी, सभासद यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close