जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
पुरस्कार,गौरव

…या ग्रामपंचायतीस,’क्षयरोग निर्मूलन पुरस्कार’ प्रदान !

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी )
   

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२५ पर्यंत भारत क्षयरोग मुक्त करण्याचा संकल्प केला आहे.त्यानुसार महाराष्ट्राला क्षयरोग मुक्त करण्यासाठी आरोग्य विभागाकडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.त्यात आरोग्य विभागाकडून क्षयरोग मुक्त पंचायत अभियान हाती घेतले असून यात विशेष योगदान देणाऱ्या ग्रामपंचायतींना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.नगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील जवळके येथील ग्रामपंचायतीस जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी शिरीष येरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांचे हस्ते सन्मानचिन्ह आणि सन्मान पात्र देऊन पुरस्कार देण्यात आला आहे.त्यावेळी सरपंच सारिका विजय थोरात यांचेसह त्यांचे सहकारी उपस्थित होते.

दरम्यान जवळके ग्रामपंचायतीने या पूर्वी वृक्ष लागवडीचा माजी केंद्रीय मंत्री स्व.मोहन धारिया यांच्या हस्ते गौरव पटकावला आहे तर संत गाडगे महाराज ग्रामस्वच्छता पुरस्कार,तंटामुक्त ग्राम पुरस्कार,तत्कालीन पालकमंत्री बबनराव पाचपुते यांच्या हस्ते,’लोकराज्य ग्राम’ आदी पुरस्कार मिळवले आहे.वर्तमानात ग्रामपंचायत नावीन्यपूर्ण उपक्रमात व्यग्र आहे.जवलके जिल्हा परिषद शाळेने शिष्यवृत्ती परीक्षेत 27 पैकी 25 विद्यार्थी उत्तीर्ण केले आहे.

पंचायत राज संस्थांमध्ये शाश्वत विकासाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी ‘निरोगी गावे’ ही संकल्पना मांडण्यात आली आहे.गाव आणि उपकेंद्र/एच.डब्ल्यू.सी.स्तरावरील आरोग्य अधिकारी ग्रामपंचायतींच्या पाठिंब्याने क्षयरोग निर्मूलनाच्या दिशेने भरीव प्रगती करत आहेत.केलेल्या प्रयत्नांचे मोजमाप आणि प्रमाणीकरण प्रक्रियेद्वारे प्रमाणीकरण करणे आवश्यक असल्याचे मानले गेले होते.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२५ पर्यंत भारत क्षयरोग मुक्त करण्याची घोषणा गतवर्षी केली होती.त्यानुसार देशातील एक हजार पंचायतमध्ये क्षयरोग मुक्त अभियान राबविण्यात येत आहे.या अभियानाची रायगडमधून सुरुवात झाली होती.त्यानंतर या उपक्रमाची राज्यभर राबविण्यास सुरुवात केली होती.
नगर जिल्हा त्यास अपवाद नाही.नगर जिल्ह्यातील या क्षेत्रात चांगले काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना या वर्षी पुरस्कार देण्याचे जाहीर केले होते.त्यानुसार कोपरगाव तालुक्यातील 09 ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली होती.त्यात जवळके,काकडी,मनेगाव,मढी खुर्द,जेऊर पाटोदा,मुर्षतपुर,शिरसगाव,तीळवणी,खोपडी आदी ग्रामपंचायतीचा समावेश होता.त्यांना आज जिल्हाधिकारी कार्यालयातून निमंत्रण देण्यात आले होते.त्यानुसार आज जवळके येथील सरपंच सारिका विजय थोरात,उपसरपंच सुनील थोरात,ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब थोरात,इंदुबाई शिंदे,मीना विठ्ठल थोरात,वनिता रखमा वाकचौरे,संतोष थोरात आदी मान्यवर उपस्थित होते.त्यावेळी जवळके ग्रामपंचायतींच्या पदाधिकाऱ्यांना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.

   या उपक्रमास जवळके ग्रामपंचायतीचे मार्गदर्शक पत्रकार नानासाहेब जवरे,माजी उपभियंता एस.के.थोरात,माजी सरपंच वसंत थोरात आदींसह विश्वनाथ थोरात,दत्तात्रय थोरात,बाळासाहेब थोरात,राजेंद्र थोरात,माजी उपसरपंच डी.के.थोरात,गोरक्षनाथ थोरात,अलका शिंदे,नवनाथ पन्हाळे,नवनाथ थोरात,अण्णासाहेब भोसले आदींचे मार्गदर्शन लाभले होते तर ग्रामसेवक सतिष दिघे,आरोग्य सेविका सोनाली पानसरे,आशा सेविका वंदना अशोक थोरात आदींनी परिश्रम घेतले होते.त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

   दरम्यान जवळके ग्रामपंचायतीने या पूर्वी वृक्ष लागवडीचा माजी केंद्रीय मंत्री स्व.मोहन धारिया यांच्या हस्ते गौरव पटकावला आहे तर संत गाडगे महाराज ग्रामस्वच्छता पुरस्कार,तंटामुक्त ग्राम पुरस्कार,तत्कालीन पालकमंत्री बबनराव पाचपुते यांच्या हस्ते,’लोकराज्य ग्राम’ आदी पुरस्कार मिळवले आहे.वर्तमानात ग्रामपंचायत नावीन्यपूर्ण उपक्रमात व्यग्र आहे.जवलके जिल्हा परिषद शाळेने शिष्यवृत्ती परीक्षेत 27 पैकी 25 विद्यार्थी उत्तीर्ण केले आहे.

   दरम्यान या पुरस्काराबद्दल शिर्डीचे खा.भाऊसाहेब वाकचौरे, आ.आशुतोष काळे,माजी जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे,गटविकास अधिकारी पाठक,कोपरगाव पंचायत समितीचे माजी सभापती अर्जुन काळे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विकास घोलपआदींनी अभिनंदन केलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close