पुरस्कार,गौरव
नगर जिल्ह्यातील…या प्रकल्पास गती देणार-खा.वाकचौरे
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
उत्तर नगर जिल्ह्यातील अवर्षण ग्रस्त १८२ गावांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे प्रकल्पाच्या कालव्यांच्या कामास आपण गती देणार असून लवकरच दुष्काळी शेतकऱ्यांना शेती सिंचनासाठी पाणी मिळण्यास मदत होणार असल्याचे प्रतिपादन शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी बहादरपूर येथे बोलताना केले आहे.
नुकत्याच संपन्न झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाआघाडीचे उमेदवार खा.भाऊसाहेब वाकचौरे हे मोठ्या मताधिकक्याने निवडून आले असून त्यांचा सत्काराचा कार्यक्रम कोपरगाव तालुक्यातील बहादरपूर येथील शिवसेना व ग्रामस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ट कार्यकर्ते साहेबराव रहाणे हे होते.
सदर प्रसंगी शिवसेनेचे गिरगाव येथील विभागप्रमुख शिवाजी रहाणे,शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे,प्रमोद लबडे,माजी तालुका प्रमुख श्रीरंग चांदगुडे,तालुका उपाध्यक्ष रंगनाथ गव्हाणे,बहादरपूरचे सरपंच गोपीनाथ रहाणे,उपसरपंच रामनाथ पाडेकर,रामनाथ रहाणे,सागर रहाणे आदी प्रमुख मान्यवरांसह बहुसंख्य ग्रामस्थ व शिवसैनिक उपस्थित होते.
त्या वेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”निळवंडे प्रकल्पास या १४ जुलै रोजी ५४ वर्षे पूर्ण होत आहे.मात्र यात जेवढे राजकारण झाले ते अन्य प्रकल्पात झाले नाही.त्यामुळे हा प्रकल्प रखडला गेला आहे.मात्र आपण आपल्या पहिल्या कार्यकाळात निळवंडे कालवा कृती समितीस बरोबर घेऊन यास केंद्रीय जलआयोगाकडून १७ पैकी १४ मान्यता मिळवून दिल्या होत्या.मात्र मधील प्रतिकूल काळ वगळता कालवा कृती समितीने उच्च न्यायालयात मोठा न्यायिक व रस्त्यावरील संघर्ष करून हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मोठे प्रयत्न केले आहे.त्यामुळे मागील वर्षी त्याचे जलपूजन झाले आहे.ही कालवा कृती समितीची ही मोठी उपलब्धी असून आगामी काळात उर्वरित काम आपण केंद्रात व राज्यात पाठपुरावा करून मार्गी लावणार आहे.त्यासाठी शिर्डीत नुकतीच अधिकाऱ्यांची पहिली समिती पदाधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली आहे व त्यासाठी आपण अधिकाऱ्यांना अपेक्षित सूचना दिल्या असल्याचे सांगितले आहे.
दरम्यान दिल्लीतील पहिल्याच लोकसभेच्या राष्ट्रपतींच्याअभिभाषणावर संपन्न झालेल्या पहिल्याच अधिवेशनात आपण केंद्रीय जलसंसाधन मंत्री सी.आर.पाटील यांची भेट घेऊन हा प्रश्न त्यांच्या कानावर घातला आहे व त्यासाठी सकारात्मक भुमीका घेतली असल्याचे सांगून मोठा दिलासा दिला आहे.आगामी काळात पश्चिम घाटमाथ्याचे पाणी आणण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे असे उपस्थितांना सांगून त्यांनी मोठा दिलासा दिला आहे.
सदर प्रसंगी प्रास्तविक शिवाजी रहाणे यांनी केले तर उपस्थितांना मार्गदर्शन प्रमोद लबडे,श्रीरंग चांदगुडे,सागर रहाणे,रंगनाथ गव्हाणे, आदींनी केले आहे.सूत्रसंचालन गंगाधर रहाणे यांनी केले आहे तर उपस्थितांचे आभार विजय सोपान रहाणे यांनी मानले आहे.