पुरस्कार,गौरव
चांगल्या कर्तव्याचे फळ मधुर-…या नेत्याचे प्रतिपादन
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
आपले संचित कर्म चांगले असले की,आपणास सद्बुद्धी होऊन आपण सन्मार्गाला लागतो.आपल्या हातून आणखीन चांगले कर्म घडत जातात त्यामुळे माणसाला मोठे मानसिक समाधान मिळत असल्याचे प्रतिपादन गोदावरी नामदेवराव परजणे तालुका सहकारी दुघ संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांनी नुकतेच संवत्सर येथील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी गोरक्षनाथ शेळके हे नुकतेच आपल्या सेवेतून सेवा निवृत्त झाले असून त्यांचा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजेश परजणे यांनी मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार केला असून त्यांच्यासोबत संवत्सर ग्रामपंचायतीचे कर्मचारी ताराचंद साळुंखे यांचाही सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.
सदर प्रसंगी संवत्सर ग्रामपंचायतीच्या सरपंच सुलोचना ढेपले,उपसरपंच विवेक परजणे,लक्ष्मणराव साबळे,दिलीपराव ढेपले, शिवाजी गायकवाड,लक्ष्मणराव परजणे,अनिलराव आचारी,दिलीप तिरमखे,बापूसाहेब गायकवाड,बाबुराव मैंद,ज्ञानेश्वर कासार, ग्रामविकास अधिकारी कृष्णा अहिरे आदीसंह बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”सेवानिवृत्तीने माणसाला वयाची जाणीव करुन दिलेली असते,शरीर कुरकुरायला लागते.बुद्धी अन् मनाचे विचार काय कमावले आणि काय गमावले याचा ताळेबंद मांडत असतात.काय काय करायचे राहिले याचा विचार सुरु होतो.सेवानिवृत्तीनंतर खरंतर आयुष्यातला एक नविन टप्पा,नविन मार्ग, ‘स्व’ चा शोध घेण्याचा श्री गणेशा! सुरुवात अशी की जी सहज असावी,आनंद देणारी अन् आनंद घेणारी असावी.’हृदयातून’ अन् हृदयाच्या प्रत्येक ‘स्पंदना’तून असावी.जगण्याची उर्मी असावी,जगण्याची स्फुर्ती असावी.खरंतर ही एक नविन ओळख असते,स्वतःची स्वतःशी झालेली ! तीस-चाळीस वर्षांच्या ‘वृत्ती’ तून म्हणजे राग,लोभ,द्वेष,मत्सर,अहंकार,सुख-दु:ख यातून बाहेर पडण्याची वेळ असते.त्यातून इच्छा असो अथवा नसो प्रत्येक नोकरी करणाऱ्याला जावेच लागते.अशीच सेवा निवृत्ती माहेगाव देशमुख येथील ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी गोरक्षनाथ शेळके यांनी स्वीकारली असल्याचे गौरवोद्गार त्यांनी शेवटी काढले आहे.
सदर प्रसंगी त्यांच्या सोबत संवत्सर येथील ग्रामपंचायतीचे कर्मचारी ताराचंद साळुंखे यांनाही भावपूर्ण निरोप देण्यात आला आहे.
सदर प्रसंगी संवत्सर ग्रामपंचायतीच्या सरपंच सुलोचना ढेपले यांनी प्रास्तविक केले तर सूत्रसंचालन ग्रामविकास अधिकारी अहिरे यांनी केले आहे.तर उपस्थितांचे आभार उपसरपंच विवेक परजणे यांनी मानले आहे.