पुरस्कार,गौरव
…या शिक्षकांस,’मराठी अध्यापन सेवा पुरस्कार’
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगांव येथील श्रीमान गोकुळचंदजी विदयालयातील दिलीप कुडके यांना,’ मराठी भाषा गौरव दिना’ निमित्तानं मराठी ग्रामीण साहित्य संमेलानात राज्यस्तरीय उत्कृष्ट मराठी अध्यापन सेवा कार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
ज्ञानज्योती बहुउदृशीय संस्थेच्या वतीने मराठी भाषेची निगडित सेवा प्रसार व संशोधनकार्याच्या अनमोल योगदाना बद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
दिलीप कुडके हे विदयालयात क्रीडा शिक्षक म्हणून देखिल कार्यरत असुन त्यांनी स्काऊट आणि गाईड मध्ये देखिल लक्षवेधी काम केले आहे.त्यांच्या या यशा बद्दल कोपरगांव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष कैलास ठोळे सचिव दिलीप अजमेरे,स्थानिक स्कुल कमिटीचे चेअरमन चंद्रकांत ठोळे,सहसचिव सचिनअजमेरे,संदीपअजमेरे,डाॕ.अमोल अजमेरे,राजेश ठोळे,आनंद ठोळे,मुख्याध्यापक मकरंद को-हाळकर,उपमुख्याध्यापक रमेश गायकवाड,पर्यवेक्षक उमा रायते,विदयालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदिनी अभिनंदन केले आहे.
दरम्यान या पुरस्काराने आपल्याला प्रेरणा मिळाली असुन मराठी भाषेसाठी चांगले कार्य करण्याची संधी मिळाली आहे असे दिलीप कुडके यांनी स्पष्ट केले आहे.