जाहिरात-9423439946
पुरस्कार,गौरव

…या महाविद्यालयातील प्राध्यापकांचे विशेष नैपुण्य सिद्ध

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगांव तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित के.जे.सोमैया महाविद्यालयातील डॉ.सुनील कुटे व डॉ.वसुदेव साळुंके या दोन प्राध्यापकांनी विद्याविहार मुंबई येथे नुकत्याच संपन्न झालेल्या ‘टॉस अथलेटिक्स २०२४’ मध्ये विशेष नैपुण्य मिळविल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ बी.एस.यादव यांनी दिली आहे.

   

  या स्पर्धेमध्ये डॉ.सुनील कुटे यांनी लक्षवेधी कामगिरी करत १०० व २००मिटर धावणे,लांब उडी व इतर प्रकारात सुवर्ण पदक  मिळवले.त्यांनी धावण्याचा व लांब उडीचे मागील सर्व विक्रम मोडीत काढत विक्रम स्थापित केला आहे.

सोमैया ग्रुप विद्याविहार च्या वतीने दरवर्षी टॉस अथलेटिक्स चे आयोजन करण्यात येत असते.या वर्षी झालेल्या या स्पर्धत दोनही प्राध्यापकांनी आठ स्पर्धमध्ये आठ पदके प्राप्त केली असुन यामध्ये सहा सुवर्णपदक व दोन रजत पदकांचा समावेश आहे.


   या स्पर्धेमध्ये डॉ.सुनील कुटे यांनी लक्षवेधी कामगिरी करत १०० व २००मिटर धावणे,लांब उडी व इतर प्रकारात सुवर्ण पदक  मिळवले.त्यांनी धावण्याचा व लांब उडीचे मागील सर्व विक्रम मोडीत काढत विक्रम स्थापित केला आहे.

    त्यांच्या योगदाना बद्दल त्यांना टॉस अथलेटिक्स २०२४ स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू गौरवाने सन्मानित करण्यात आले. तर डॉ.वसुदेव साळुंके यांनी ४०० मीटर धावणे व रिले प्रकारात सुवर्ण पदक प्राप्त केले तसेच २०० मीटर व गोळाफेक या क्रीडा प्रकारात रजत पदक मिळवले आहे.महाविद्यालयातील प्राध्यापकांनी मिळविलेल्या या नैपुण्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष अशोक रोहमारे,सचिव ॲड.संजीव कुलकर्णी,विश्वस्त संदीप रोहमारे,प्राचार्य डॉ.बी.एस.यादव आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close