जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
पुरस्कार,गौरव

५.५६ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी,…या वकिलाचा गौरव

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)
  

   तत्कालीन फडणवीस सरकारने २८ जून २०१७ रोजी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमुक्ती योजना अंमलात आणून सदर योजनेप्रमाणे ३० जून २०१६ रोजी थकीत असलेले मु्द्दल व त्यावरील व्याजासह १.५ लाख रुपये मर्यादेपर्यंतचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेऊन ऐनवेळी पिच्छे मूड केला होता होता मात्र या प्रकरणी शेतकरी संघटनेने ऍड.अजित काळे यांच्या मार्फत उच्च न्यायालयाच्या छ.संभाजीनगर खंडपीठात जनहित याचिका करून त्या विरोधात दाद मागून सदर कर्जमाफी देण्याचे निर्देश दिल्याने राज्यातील ५.५६ लाख शेतकऱ्यांना सुमारे ०६ हजार कोटींची कर्जमाफी जाहीर केली आहे.त्याबाबत श्रीरामपूर येथे नेवासा येथील शेतकऱ्यांनी अड्.अजित काळे यांचा नुकताच जाहीर सत्कार केला आहे.

 

शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अड्.अजित काळे यांनी कर्जमाफी प्रकरणी उच्च न्यायालयाच्या अवमानाची याचिका छ.संभाजीनगर न्यायालयात दाखल केली.न्यायालयाने नोटीस बजावल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपूर अधिवेशनात दिड लाखाच्या कर्जमुक्तीची रक्कम देण्याची मोठी ‘राणा भीमदेवी’ थाटाची घोषणा केली आहे.आता शेतकऱ्यांना सुमारे सहा हजार कोटी रुपये मिळणार आहे.

या बाबतचे सविस्तर वृत्त असे की,”राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी शेतकरी संघटनांच्या ‘शेतकरी संप’ आंदोलनामुळे २८ जून २०१७ रोजी शेतकऱ्यांना दिड लाख रुपये कर्जमुक्तीची घोषणा केली होती.मात्र अंमलबजावणी करताना सुमारे ०५ लाख ५६ हजार शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ झाला नव्हता.याविरोधात शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ॲड.अजित काळे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद (छ.संभाजीनगर) खंडपीठात याचिका क्रमांक ९८०८/२०२२ दाखल केली होती.यावर न्या.रविंद्र घुगे आणि अरुण पेडणेकर यांनी सदरील शेतकऱ्यांना दिड लाख रुपये प्रमाणे कर्जमुक्ती करण्याचा आदेश दिला होता.तरीही शेतकऱ्यांना रक्कम मिळत नाही म्हणून न्यायालयाच्या अवमानाची याचिका दाखल केली.न्यायालयाने नोटीस बजावल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपूर अधिवेशनात दिड लाखाच्या कर्जमुक्तीची रक्कम देण्याची मोठी ‘राणा भीमदेवी’ थाटाची घोषणा केली आहे.आता शेतकऱ्यांना सुमारे सहा हजार कोटी रुपये मिळणार आहे.या यशाबाबत नेवासा,श्रीरामपूर,राहाता,कोपरगाव आदी तालुक्यातील शेतकऱ्यांनी अड्.अजित काळे यांचे आभार मानले आहे.व त्यांचा सत्कार आयोजित केला होता.

  सदर प्रसंगी पुरुषोत्तम सर्जे,अनिल मते,कल्याण मते आदींनी संयुक्तरीत्या नेवासा तालुक्याचे वतीने सत्कार केला आहे.त्याप्रसंगी जिल्ह्याचे शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष हरिभाऊ आप्पा तूवर,किरण लंगे,दत्तू निकम,अशोक काळे,दत्तू लांडे,भाऊसाहेब मतकर आदींसह बहुसंख्येने शेतकरी उपस्थित होते.

  सदर प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्तविक शेतकरी संघटनेचे नेवासा तालुक्याचे संपर्कप्रमुख नरेंद्र काळे यांनी केले तर उपस्थितांचे आभार भाऊसाहेब मतकर यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close