जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
पुरस्कार,गौरव

…या साहित्य पुरस्काराची परंपरा भविष्यातही सुरू ठेवा-आवाहन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

   कोपरगाव  तालुक्यातील “भि.ग.रोहमारे ट्रस्ट पोहेगाव आणि त्यांच्या वतीने दिला जाणाऱ्या राज्यस्तरीय भि.ग.रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्काराची परंपरा मोठी असून भविष्यातही हा पुरस्कार सुरू ठेवावा असे आवाहन प्रसिद्ध लोककवी प्रा.प्रशांत मोरे यांनी नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

“माजी आ.स्व.के.बी.रोहमारे यांनी राजकारण समाजकारण आणि शिक्षण तसेच इतर अनेक क्षेत्रात डोंगराएवढे कार्य केले.ते अ.नगर जिल्ह्यातील सहकाराचे अग्रदूत ठरले होते.त्यांचा संजीवनी व कोपरगाव सहकारी साखर कारखाना उभारणीत तसेच जिल्हा बँकेच्या स्थापनेत त्यांचा मोलाचा वाटा उचलला होता”-प्रशांत आंबरे,साहित्यिक.

कोपरगाव येथील स्थानिक के.जे.सोमैया वरिष्ठ व के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाच्या साकरबेन सोमैया सभागृहामध्ये आयोजित के.बी.रोहमारे पुण्यस्मरण व भि.ग.रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार वितरण समारंभाचे प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे होते.

   सदर प्रसंगी कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव ऍड.संजीव कुलकर्णी,भि.ग.रोहमारे ट्रस्टचे सचिव रमेश रोहमारे,संस्थेचे विश्वस्त जवाहर शहा,रोहिदास होन,संदीप रोहमारे,राहुल रोहमारे,चंद्रशेखर कुलकर्णी,अॅड संजय भोकरे,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष माधवराव खिलारी आदी मान्यवरांसह विविध कवी लेखक बहुसंख्येने उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाचे प्रास्तविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस.यादव यांनी करताना त्यांनी महाविद्यालयाच्या कार्यकर्तृत्वाचा संक्षिप्त इतिहास व त्यामागे के.बी.रोहमारे यांच्या योगदानावर प्रकाशझोत टाकला तर त्यावेळी साहित्यिक प्रशांत आंबरे,लक्ष्मण महाडिक,नवकवी प्रवीण पवार,पुरस्कृत समीक्षक डॉ.रवींद्र कानडजे आणि डॉ. मारोती घुगे यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

    दरम्यान या वर्षी नागू विरकर यांना हेडाम या ग्रामीण कादंबरीसाठी,गणपत जाधव यांना, ‘हावळा’ या ग्रामीण कथासंग्रहासाठी विभागून,आप्पासाहेब खोत यांना,’काळीज विकल्याची गोष्ट’, मनीषा पाटील हरोलीकर यांना,’नाती वांझ होताना’ या उत्कृष्ट ग्रामीण कवितासंग्रहासाठी  विभागून,प्रविण पवार यांना,’ भुई आणि बाई’ या उत्कृष्ट ग्रामीण कवितासंग्रहासाठी विभागून,डॉ.रवींद्र कानडजे यांना,’ शेतकरी जीवनसंघर्ष :ऐतिहासिक परामर्श’ या उत्कृष्ट ग्रामीण समीक्षेसाठी विभागून,डॉ.मारुती घुगे यांना,’१९८० पूर्वीची ग्रामीण कविता :प्रेरणा आणि प्रवृत्ती प्रवृत्ती’ या उत्कृष्ट ग्रामीण समीक्षेसाठी विभागून देण्यात आला आहे,या पुरस्काराचे स्वरूप रुपये १५ हजार रोख,प्रशस्तीपत्र व सन्मान चिन्ह असे होते.

या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कार्यवाह डॉ.गणेश देशमुख,सहकार्यवाह डॉ संजय दवंगे,रजिस्ट्रार डॉ.अभिजित नाईकवाडे,आबासाहेब कोकाटे आदींसह सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर सेवकांनी विशेष परिश्रम घेतले.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.शैलेंद्र बनसोडे यांनी केले आहे तर उपस्थितांचे आभार प्रा.वर्षा आहेर यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close