जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
पुरस्कार,गौरव

आपला क्रीडा क्षेत्रातील प्रवास अपयशातून यशाकडे जाणारा-…या खेळाडूंचे प्रतिपादन

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)   

आपला क्रीडा क्षेत्रातील प्रवास अपयशातून यशाकडे जाणारा असून यात अपयश,अनुभवातून शिकत गेलो अन् यश मिळत गेले.बेसबॉल या क्रीडा प्रकाराच्या माध्यमातून राज्याचे व देशाचे नाव क्रीडा क्षेत्रात उंचविण्याची संधी मिळाली असून या यशामागे माझे कुटुंबासह समता परिवाराचे योगदान असल्याचे प्रतिपादन राज्यस्तरीय शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त अक्षय आव्हाड यांनी नुकतेच कोपरगाव येथे बोलताना केला आहे.

   

“आज फुटबॉल,बॅडमिंटन,टेनिस बास्केटबॉल,हॉलीबॉल,क्रिकेट यांसारख्या विविध खेळात प्राविण्य मिळविलेले ५ हजारांपेक्षा पेक्षा अधिक राष्ट्रीय खेळाडू आहे.महाराष्ट्र शासनाचा क्रीडा विभाग आणि तालुक्यातील विविध संस्था,संघटनांनी विविध खेळ आणि खेळाडूंना ऊर्जितावस्था प्राप्त करून देत नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न करावा”-डॉ.प्रीतम जपे,प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ,कोपरगाव.

समता परिवाराचे सदस्य व तालुक्यातील जेऊर कुंभारी येथील अक्षय मधुकर आव्हाड यांना महाराष्ट्र शासनाचा क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार मिळाल्याबद्दल बॅडमिंटनपटू व वैद्यकीय क्षेत्रातील अस्थि रोग तज्ज्ञ डॉ.प्रीतम जपे आणि समता सहकारी पतसंस्थेचे संस्थापक ओमप्रकाश कोयटे यांच्या हस्ते सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.

सदर प्रसंगी अस्थिरोग तज्ज्ञ डॉ.प्रीतम जपे,माजी नगराध्यक्ष जेष्ठ खेळाडू दिलीप दारूणकर,सुनिल गंगुले,अ.नगर बेसबॉल असोसिएशनचे अध्यक्ष अरुण चंद्रे,महाराष्ट्र बेसबॉल असोसिएशनचे सहसचिव मकरंद कोऱ्हाळकर,कोपरगाव तालुका क्रीडा समिती अध्यक्ष नितीन निकम,विद्यापीठ बेसबॉल व सॉफ्टबॉल प्रशिक्षक सुनिल कुटे,जेष्ठ क्रीडा प्रशिक्षक दत्ता देवकर,धनंजय देवकर,माजी पुणे विद्यापीठ संघ कर्णधार सुभाष पाटणकर,बाळासाहेब वक्ते,राजाभाऊ गिरमे,राजेंद्र कोपरे,समता इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या हर्षलता शर्मा,मधुकर आव्हाड आदींसह श्रीरामपूर,राहाता,येवला तालुक्यातील आजी-माजी खेळाडू,समता पतसंस्थेचे पदाधिकारी,अधिकारी आणि समता इंटरनॅशनल स्कूलचे शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.

सदर प्रसंगी प्रसिद्ध बॅडमिंटनपटू डॉ.प्रितम जपे म्हणाले की,”बेसबॉल या क्रीडा प्रकारात अक्षय आव्हाड यांना शिवछत्रपती पुरस्कार मिळाल्यामुळे कोपरगाव शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून महाराष्ट्र शासनाने या खेळाच्या लोकप्रियतेची जबाबदारी महाराष्ट्र शासनाने त्यांच्याकडे दिली आहे.कोपरगाव तालुक्यात कबड्डी,खो-खो खेळांपासून सुरुवात झाली होती.आज फुटबॉल,बॅडमिंटन,टेनिस बास्केटबॉल,हॉलीबॉल,क्रिकेट यांसारख्या विविध खेळात प्राविण्य मिळविलेले ५ हजारांपेक्षा पेक्षा अधिक राष्ट्रीय खेळाडू आहे.महाराष्ट्र शासनाचा क्रीडा विभाग आणि तालुक्यातील विविध संस्था,संघटनांनी विविध खेळ आणि खेळाडूंना ऊर्जितावस्था प्राप्त करून देत नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन त्यांनी शेवटी केले आहे.

सदर प्रसंगी हॉलीबॉल व तलवारबाजी खेळाचे राज्यस्तरीय पंच शिवप्रसाद घोडके लिखित ‘क्रीडा विश्व कोपरगावचे… या लेखाचे प्रकाशन  प्रमुख पाहुणे व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.तत्पूर्वी अक्षय आव्हाड यांची डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन लेझीमच्या तालात व डिजेच्या मंगलमय वातावरणात मिरवणूक काढण्यात आली होती.

सदर कार्यक्रमाचे प्रास्तविक अहमदनगर जिल्हा जम्प रोप असोसिएशन अध्यक्ष व सुधन गोल्ड लोनचे अध्यक्ष संदीप कोयटे यांनी केले तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व उपस्थितांचे आभार समता इंटरनॅशनल स्कूलचे उपप्राचार्य समीर अत्तार यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close