पुरस्कार,गौरव
देशाच्या नागरी भागात शांतता ठेवण्याचे काम नागरिकांवर-मुख्याधिकारी
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
देशाच्या नागरी भागात शांतता ठेवण्याचे काम आपल्यासारख्या नागरिकांवर असल्याचे प्रतिपादन कोपरगाव नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी कोपरगाव येथील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त वर्षभर आयोजित विविध उपक्रमांच्या समारोपीय उपक्रमांतर्गत नाशिक विभागातील सर्व ग्रामपंचायती व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ‘मेरी माटी मेरा देश’ या अभियानाला आजपासून सुरुवात झाली आहे. या उपक्रमांतर्गत शिलाफलक,वसुधावंदन अंतर्गत ७५ देशी वृक्षांची लागवड करून नगरपरिषदेच्या परिसरात ध्वजारोहण,स्वातंत्र्य सैनिक व वीरांना वंदन आदी उपक्रमाचीही सुरुवात झाली असून आज कोपरगाव नगरपरिषदेच्या वतीने आज माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला आहे.त्यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोमैय्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस.यादव हे होते.
“राज्यातील पहिली नगरपरिषदेने सर्वात आधी पालिका कर माफ केला असल्याचे कौतुक केले आहे.त्यावेळी त्यांनी उपस्थित माजी सैनिकांचा सत्कार केला आहे व शहर आणि तालुक्यात विविध कार्यक्रम सैनिकांसाठी आयोजित केल्याबद्दल मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांचेबाबत सैनिक संघटनेचे अध्यक्ष युवराज गांगवे यांनी गौरवोद्गार काढले आहे.
सदर प्रसंगी कोपरगावचे आ.आशुतोष काळे,कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासकीय अधिकारी शांताराम गोसावी,उपमुख्याधिकारी ज्ञानेश्वर चाकने,के.जे.सोमैय्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस.यादव,जिल्हा परिषदेच्या बांधकाम अभियंता जनार्दन फुलारे, लेखापाल तुषार नालकर, माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष युवराज गांगवे,उपाध्यक्ष मारुती कोपरे,सचिव भाऊसाहेब निंबाळकर,नगरपरिषदेचे माजी गटनेते विरेंन बोरावके,माजी नगरसेवक कृष्णा आढाव,रमेश गवळी,राजेंद्र वाघचौरे,आनंद डिके,विनोद थोरात,संदीप कोळपकर, सचिन कोळपकर,दादासाहेब चोळके,आप्पासाहेब दवंगे,विजय भास्कर,प्रमोद कवडे,शंकर घोडेराव,विकास बेंद्रे,दिनकर खरे,विक्की जोशी,मुकुंद इंगळे आदींसह वीरगती प्राप्त सैनिकांच्या धर्मपत्नी सरलाताई जाधव,मंगल वलटे,रंजना कुटे,आदीसह बहुसंख्य नागरिक,महिला उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”सैनिकांबद्दल आपल्याला कायमच कुतूहल वाटत आले आहे.देशाची सीमा सैनिक सांभाळत असले तरी देशाच्या नागरी भागात शांतता ठेवण्याचे काम आपल्यावर आहे पण दुर्दैवाने समाजात असंवेदनशीलता वाढत असल्याने चिंता वाटत आहे.महिलांना देशात आता वेगवेगळ्या संधी प्राप्त होत आहे त्याचा फायदा त्यांनी करून घ्यायला हवा असे आवाहन त्यांनी शेवटी केले आहे.
सदर प्रसंगी डॉ.बी.एस.यादव बोलताना म्हणाले की,” या देशात मुघलांचे व इंग्रजांचे प्रत्येकी दोनशे वर्षे राज्य केले त्यांना परत पाठवण्यासाठी अनेकांनी आपल्या जीवनाचा त्याग केला आहे.प्राणांची आहुती दिली आहे.आज स्वातंत्र्यानंतर देशाने जी प्रचंड प्रगती केली असून जगातील कोणत्याही संशोधनात्मक कार्यात उद्योगात भारतीय तरुण असतो.पण आज जीवनात शिक्षणाची प्रचंड गरज निर्माण झाली आहे.आज देशातील जवळपास पावणेदोन लाख तरुणी महिला गायब होतात हा देशात काय प्रकार सुरू आहे.या महिला काही पशुपक्षी नाही ज्या उडून गेल्या आहेत.माणसातील संवेदनाशिलता कुठे गेली असा महत्वाचा सवाल केला आहे.व ज्या कुटुंबातील तरुण सैन्यात जातो त्याचे कुटुंब स्थिरस्थावर नक्कीच सावरतो असे शेवटी सांगितले आहे.
सदर वेळी युवराज गांगवे यांनी सत्काराला उत्तर देताना म्हटले आहे की,”राज्यातील पहिली नगरपरिषदेने सर्वात आधी पालिका कर माफ केला असल्याचे कौतुक केले आहे.त्यावेळी त्यांनी उपस्थित माजी सैनिकांचा सत्कार केला आहे व शहर आणि तालुक्यात विविध कार्यक्रम सैनिकांसाठी आयोजित केल्याबद्दल त्यांनी गौरवोद्गार काढले आहे.कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी व त्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे.
कोपरगाव नगरपरिषदेचे माजी गटनेते विरेंन बोरावके, मारुती कोपरे,विनोद थोरात,मंगल सुनील वलटे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले आहे.
सदर प्रसंगी उपस्थित सैनिकांचा सन्मानपत्र शाल,फेटा,पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजश्री पिंगळे मॅडम यांनी केले आहे.तर उपस्थितांचे आभार रवींद्र वाल्हेकर यांनी मानले आहे.