जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
पुरवठा विभाग

शासनाच्या “आनंदाचा शिधा” पाकीटाचे…या गावात वितरण

न्यूजसेवा

संवत्सर (वार्ताहर)

दिवाळी सणाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाने ‘आनंदाचा शिधा’ वाटप करण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह असून गोरगरीब जनतेच्या घरातील अंधार दूर करणारा आहे असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजेश परजणे पाटील यांनी संवत्सर येथील कार्यक्रमात केले.

“वर्तमान महागाईच्या काळात गोरगरीब जनतेला रोजच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर भेडसावत आहे.ही जाणीव ठेवून शिंदे-फडणवीस सरकारने चार वस्तू अवघ्या शंभर रुपयामध्ये देवून दिवाळी गोड केलेली आहे.सर्वसामान्य जनतेला यातून मोठा आधार मिळालेला आहे.’आनंदाचा शिधा ‘ हातात पडल्यावर गोरगरीबांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला आहे”-राजेश परजणे,माजी सदस्य जि.प.

दिवाळी सण आनंदात साजरा करता यावा या उद्देशाने शिंदे-फडणवीस सरकारने गोरगरीब जनतेसाठी शंभर रुपयात रवा,साखर,हरबरा दाळ आणि गोडेतेल या वस्तू ‘आनंदाचा शिधा ‘ म्हणून देण्याची घोषणा केली होती.संवत्सर येथील नामदेवराव परजणे पाटील विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या स्वस्त धान्य दुकानामार्फत हा शिधा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजेश परजणे, सरपंच सुलोचना ढेपले यांच्याहस्ते संवत्सर परिसरातील लाभार्थ्यांना नुकताच वितरीत करण्यात आला.याप्रसंगी ते बोलत होते.

सदर प्रसंगी ज्येष्ठ कार्यकर्ते लक्ष्मण साबळे,चंद्रकांत लोखंडे,लक्ष्मण परजणे,दिलीप ढेपले, सोमनाथ निरगुडे,रघुनाथ भोकरे,दिनकर परजणे,कृष्णा आबक,अविनाश गायकवाड, बापू तिरमखे,विजय आगवन,बापू गायकवाड,बाळासाहेब दहे,अनिल आचारी,बाळासाहेब गायकवाड, हबीब तांबोळी,अर्जुन तांबे,मोहन ढेपले यांच्यासह ग्रामस्थ व लाभार्थी उपस्थित होते.

त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”वर्तमान महागाईच्या काळात गोरगरीब जनतेला रोजच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर भेडसावत आहे.ही जाणीव ठेवून शिंदे-फडणवीस सरकारने चार वस्तू अवघ्या शंभर रुपयामध्ये देवून दिवाळी गोड केलेली आहे.सर्वसामान्य जनतेला यातून मोठा आधार मिळालेला आहे.’आनंदाचा शिधा ‘ हातात पडल्यावर गोरगरीबांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला.अनेकांनी या उपक्रमाचे स्वागत करुन सरकरला धन्यवाद दिलेत.संवत्सर परिसर हा तालुक्यात सर्वात मोठा परिसर असून सर्व लाभार्थ्यांना शिधा वाटप करण्यात येईल असेही परजणे यांनी शेवटी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close