पशुसंवर्धन विकास
…या तालुक्यात लंपीचा प्रादुर्भाव !

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
अहिल्यानगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जनावरांमध्ये लम्पी आजाराचा फैलाव होत आहे.त्यामुळे संपूर्ण जिल्हाच लम्पीबाधित क्षेत्र म्हणून घोषित जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आला आहे. त्यामुळे कोपरगाव तालुक्यातील पशुधन सुरक्षित राहील यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना करा अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी पशु संवर्धन अधिकारी श्रद्धा काटे यांना दिल्या आहेत.

“लम्पी त्वचा रोग हा गोवंश व म्हैस वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य,वेगाने पसरणारा संसर्गजन्य आजार रोग आहे.या रोगाचा कीटकांपासून प्रसार होतो.त्यामुळे पशुपालकांनी प्रतिबंधात्मक उपाय योजण्याची गरज आहे”-आ.आशुतोष काळे, कोपरगाव.
सध्या महाराष्ट्रातील पशुपालकवर्ग चिंतेत आहेत.कारण जनावरांमध्ये लम्पी हा आजार पहावयास मिळतो आहे.याचा प्रादुर्भाव होताना दिसत आहे. लातूर, बीड, औरंगाबाद, जळगाव,धुळे,अहिल्यानगर पुणे,या जिल्ह्यामधील जनावरांमध्ये लम्पी आजार आढळून आला आहे.लम्पी त्वचा रोग हा गोवंश व म्हैस वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य,वेगाने पसरणारा संसर्गजन्य आजार रोग आहे.या रोगाचा कीटकांपासून प्रसार होतो.
नगर जिल्ह्यासह कोपरगाव तालुक्यात गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात लम्पी आजाराचा फैलाव वाढत चालला असून जनावरांमधील लम्पीचा संसर्ग अधिक असल्याचे दिसून येत आहे. तालुक्यात जरी लम्पीचे प्रमाण कमी असले तरी तालुक्यात लम्पी स्किन डिसीजचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून आवश्यक ती खबरदारी घ्या. जनावरांमध्ये लम्पी स्किन डिसीजचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी जिल्हा प्रशासनाने नियमावली केली असून त्या आधारे शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करून त्यांना योग्य मार्गदर्शन करा याबाबत कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाने देखील जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे व योग्य काळजी घेवून उपाय योजना कराव्यात.
प्रत्येक गावातील शेतकऱ्यांच्या गोठ्यातील जनावरांची तपासणी करून ग्रामपंचायत स्तरावर लम्पीविरोधी लसीकरण मोहीम राबवावी.जनावरांमध्ये लम्पी स्किन डिसीजचे लक्षण आढळून आल्यास प्रत्येक बाधित जनावरे वेगळे ठेवावेत आणि गोठ्यांचे निर्जंतुकीकरण करण्यात यावे.स्थानिक शेतकरी आणि पशुपालकांमध्ये या आजाराविषयी भीती आहे. त्यामुळे जनजागृतीसाठी गावोगावी पोस्टर व शिबिरे आयोजित करून माहिती द्यावी. शेतकऱ्यांचे पशुधन वाचवीण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय तत्काळ राबवावेत अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी पशु संवर्धन विभागाला दिल्या आहेत.