जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
परिवहन विभाग

परिवहन विभागाचे शिबिर कोपरगाव पूर्ववत होणार सुरु !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव येथे परिवहन अधिकाऱ्यांच्या शिबिरात शिकावू चालक परवाना देण्याची सुविधा एप्रिल महिन्यापासून बंद करण्यात आली होती.त्यामुळे वाहनधारकांची होत असलेली गैरसोय लक्षात घेवून ते देण्याची सुविधा पूर्ववत सुरु करण्याची राज्याच्या परिवहन आयुक्तांकडे केलेली मागणी मान्य करण्यात आली असून पुढील महिन्यापासून वाहनधारकांना नवीन शिकावू वाहन चालक परवाना देण्याची सुविधा सुरु करण्यात येणार असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी नुकतीच दिली आहे.

श्रीरामपूर येथील विभागीय परिवहन अधिकाऱ्यांमार्फत आधारेच रस्ता कर वसूल केला जातो.तसेच संबंधित अधिकाऱ्यामार्फत गाड्यांची वेळोवेळी तपासणी,चालक परवाना दिला जातो या शिवाय गाड्यांचा विमा तपासणी,गाड्यांची प्रदूषण क्षमता देखील तपासली जाते.त्या साठी दूरच्या नागरिक अथवा नागरिकांना त्यांच्या सोयीसाठी सदर प्रादेशिक परिवहन अधिकारी जागोजागी आपली शिबिरे आयोजित करतात.कोपरगावात असे शिबिर सुरु होते मात्र अलीकडील काळात ते बंद झाले होते.ती सोय पुर्ववत सुरु होत आहे”-आ.आशुतोष काळे,कोपरगाव.

प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या कार्यामध्ये केवळ गाड्यांविषयी माहिती किंवा गाड्यांना नंबर न देता गाडी चालकाला परवाना देणे,नवीन वाहन नोंदणी,चालक परवाना नूतनीकरण आदी कामे केली जातात.यासोबतच विभागीय परिवहन अधिकाऱ्यांमार्फत (आर.टी.ओ.च्या) आधारेच रस्ता कर (रोड टॅक्स) देखील वसूल केला जातो.तसेच संबंधित अधिकाऱ्यामार्फत गाड्यांची वेळोवेळी तपासणी करून गाड्यांचा इन्शुरन्स आहे किंवा नाही आणि त्या गाड्यांची प्रदूषण क्षमता देखील तपासली जाते.त्या साठी दूरच्या नागरिक अथवा नागरिकांना त्यांच्या सोयीसाठी सदर प्रादेशिक परिवहन अधिकारी जागोजागी आपली शिबिरे आयोजित करत असतात.कोपरगावात असे शिबिर सुरु होते मात्र अलीकडील काळात ते बंद झाले होते.त्यासाठी वर्तमानात कोपरगावचे आ.आशुतोष काळे यांनी नागरिकांच्या मागणी नुसार राज्याच्या प्रादेशिक परिवहन आयुक्तांकडे मागणी केली होती.ती परिवहन अधिकाऱ्यांनी मंजूर केली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.ती पूर्ववत सुरु होत असल्याने नागरिकांची सुविधा होणार आहे.त्याबाबत नागरिकांनी व वाहन चालक मालक आदींनी समाधान व्यक्त केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close