जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
परिवहन विभाग

बस मध्येच नादुरुस्त,प्रवाशी हैराण !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

राज्य परिवहन मंडळाच्या कोपरगाव आगाराच्या विविध मार्गावर फेऱ्या मारणाऱ्या बसची अवस्था मोठी बिकट झाली असून त्या मध्येच नादुरुस्त होत असून त्याचा प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून त्यांचा वेळ आणि पैसा वाया जात असल्याने त्यांनी मोठा संताप व्यक्त केला आहे व या कोपरगाव आगाराच्या बस त्वरित दुरुस्त कराव्या अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

राज्य परिवहन मंडळाच्या कोपरगाव बस आगाराची नाशिक नजीक नादुरुस्त झालेली बस दिसत आहे.

  

   “राज्य परिवहन मंडळाच्या कोपरगाव आगाराची कोपरगाव-नाशिक मार्गावर धावणारी बस नाशिक रोड ते नाशिक दरम्यान ब्रेक नादुरुस्त झाल्यामुळे जागेवरच थांबवण्याची नामुष्की आज सायंकाळी ५.१५ वाजता चालकांवर ओढवली होती.ती चालवणे धोक्याचे असल्याने सदर बसमधील प्रवाशांना दुसऱ्या बसमध्ये बसवून देण्यात आले आहे.त्यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे”-किसन पवार,पवासी,चांदेकसारे,ता.कोपरगाव.

राज्य सरकारने महिलांना मोफत प्रवास सूरु केल्यापासून राज्य परिवहन महामंडळाच्या बस मध्ये प्रवासासाठी मोठी गर्दी होताना दिसत आहे.मात्र राज्य परिवहन मंडळाचे कागदोपत्री उत्पन्न वाढले असल्याचे दिसत असले तरी प्रत्यक्षात ते तिजोरीत रिकामी असल्याचे दिसून येत आहे.सरकार त्यांच्या कडची बाकी रक्कम देण्यास टाळाटाळ करत असल्याने राज्य परिवहन मंडळाची अवस्था असून,’अडचण नसून खोळंबा’ अशी झालेली दिसून येत आहे.सरकार केवळ कर्मचाऱ्यांच्या पगाराची व्यवस्था करताना दिसत असून बाकी देखभाल दुरुस्तीसाठी अंगठा दाखवताना दिसत आहे.त्यामुळे भंगारात काढावयाच्या बस रस्त्यावर धावताना दिसत असून त्याची किंमत मात्र प्रवाशांना चुकवावी लागत असताना दिसत आहे.त्यामुळे राज्य परिवहन मंडळाच्या बस मध्येच बंद पडताना दिसत असून त्यांचा खर्चाचा मेळ बसवणे अवघड झाल्याचे दिसून येत आहे.

   एक बस १३ वर्ष किंवा १३ लाख कि.मी.निश्चित असताना कोपरगाव सह राज्यातील बहुतांश बस कालबाह्य अथवा आयुष्य संपलेल्या दिसून येत आहे.परिणामी एस.टी.महामंडळाच्या भंगार बसेसचा मुद्दा सातत्याने ऐरणीवर येत आहे.एस.टी.महामंडळाच्या भंगार आणि नादुरुस्त बसेसमुळे अनेक ठिकाणी अपघातांच्या घटना घडत आहेत.तर काही ठिकाणी या बस मध्येच बंद पडत असून बऱ्याच वेळा नादुरुस्त होत असल्याच्या घटना वारंवार समोर येत आहे.त्यामुळे प्रवाशांमध्ये संताप व्यक्त होत आहे.या बसचा त्रास निव्वळ प्रवाशांना होत नाही तर चालक आणि वाहक यांनाही होत आहे.त्यांना अनेक व्याधी जडत आहे.मनोधैर्यावर होताना दिसत आहे.कोपरगाव बस स्थानक त्याला अपवाद नाही.वर्तमानात या स्थानकाच्या अनेक बस मध्येच बंद पडत असून अशीच घटना आज सायंकाळी ५.१५ वाजेच्या सुमारास नाशिक रोड-ते नाशिक दरम्यान घडली आहे.कोपरगाव आगाराची बस नाशिकहुन कोपरगाव कडे येत असताना ती मध्येच बंद पडली होती.त्यावेळी चालकाने प्रवाशांना खाली उतरून दुसऱ्या बसमध्ये बसवून दिले आहे.मात्र दरम्यानच्या काळात सदर प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला असल्याची माहिती प्रवाशांनी आमच्या प्रतिनिधीस बोलताना दिली आहे. 

  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close