जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
पणन

कांदा पिकासाठी लवकरच दुबईशी करार करणार-पणन मंत्री

न्यूजसेवा

कोपरगाव -(नानासाहेब जवरे)

   राज्यात कांदा पिकाबद्दल कायम अडचण निर्माण होत आहे.म्हणून लघु व दीर्घकाळासाठी कांदा प्रकल्प राबवणार आहे.त्यासाठी कांदा महाबँक निर्माण करणार करून साठवणूक,पॅकिंग,पेस्ट निर्माण करून त्याचे ब्रॅण्डिंग,पॅकिंग, सॉर्टिंग मशीन उपलब्ध करून देऊन मूल्यवर्धन करण्याबरोबरच लवकरच दुबईशी करार करून कांद्याला भाव देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी नुकतेच केले आहे.

उपस्थिताना मार्गदर्शन करताना राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल दिसत आहे.

    कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने आज दुपारी २.४५ वाजता १.७३ कोटी रुपये खर्चाच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन’ इमारतीचे भूमिपूजन कार्यक्रम आज आ.काळे व राजेश परजणे यांच्या संचालकांच्या बहिष्काराच्या पार्श्वभूमीवर आज राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांचे शुभहस्ते व संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष बिपीन कोल्हे यांचे अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.त्यावेळी ते बोलत होते.

राज्याचे पणन मंत्री यांचा सत्कार करताना मंत्री जयकुमार रावल.

दरम्यान या कार्यक्रमाला आ.आशुतोष काळे (राष्ट्रवादी अजित पवार) गटाने व दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांनी आधी लेखी कळवून बहिष्कार टाकला होताच पण कोपरगाव तालुका आघाडीचे (औताडे) गटाचे संचालक गैरहजर असल्याचे दिसून आले आहे.त्याबद्दल उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

  सदर प्रसंगी माजी आ.स्नेहलता कोल्हे,सहकार महर्षी कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष बिपीन कोल्हे,गणेश सहकारी कारखान्याचे अध्यक्ष सुधीर लहारे,जी.एस. गिरासे,कोपरगाव नगरपरिषद अध्यक्ष पराग संधान,उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर,बाजार समितीचे सभापती साहेबराव रोहोम,कारखाना संचालक बाळासाहेब वक्ते,बाजार समिती संचालक मीरा कदम,सचिव नानासाहेब रणशूर,कैलास ठोळे,दत्तात्रय जगताप,
विविध संस्थांचे पदाधिकारी,शेतकरी आदींच्या उपस्थित होते.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन’ इमारतीचे भूमिपूजन करताना जयकुमार रावल,कारखाना अध्यक्ष विवेक कोल्हे,सभापती साहेबराव रोहोम आदी मान्यवर.

सदर प्रसंगी राज्याचे मंत्री जयकुमार रावल हे तब्बल दिड तास उशिराने कार्यक्रमस्थळी पोहचले असल्याचे दिसून आले आहे.शेतकऱ्यांना हवामान खात्याने पावसाचा अंदाज व्यक्त केलेला असताना शेतकऱ्यांनी मोठ्या धाडसाने या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवली आहे.

  त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”जगात इंधन तुटवडा असताना कोल्हे कारखाना इंधन निर्माण करतो ही मोठी बाब आहे.कोपरगाव तालुक्याला मोठा राजकीय वारसा आहे.त्यावेळी मंत्री रावल यांनी शेतकऱ्यांच्या संस्थेत मतभेद नसायला हवा अशी अपेक्षा केली आहे.शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे देशाचा आर्थिक कणा आहे.त्यामुळे शेतकऱ्याला आम्ही १.७३ कोटींचा निवारा निर्माण करून दिला आहे.राज्यात आम्ही विविध योजना राबवत आहे.विकसित महाराष्ट्र ही वाटचाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्वाखाली सुरू केली आहे.शेतकऱ्यांना कितीही हजारो कोटी रुपये लागो पण आम्ही वीज मोफत आम्ही दिली आहे.लाडकी बहीण योजना अद्याप सुरू आहे.विरोधकांनी टीका केली पण ती आम्ही खोटी ठरवली आहे.शेतकऱ्यांना आम्ही सहा हजार रुपये,शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी सौर पंप दिला आहे.शेतकऱ्यांना कर्जमाफी सुद्धा जाहीर केली आहे.नियमित कर्ज भरणाऱ्यांना सुद्धा ५० हजार रुपये दिले जाणार आहे.शेतकऱ्यांना जादा पिकले तरी अडचण आहे.जादा पिकले तरी अडचण आहे.म्हणून शेतकरी जगला पाहिजे या साठी हे सरकार काम करत आहे.शेतकऱ्याच्या शेतमाल’ इ नाम’ या पोर्टलवर विकता येणार आहे.निर्यात तसेच मूल्यासाखळी निर्माण करत आहे.मूल्यवर्धन साठी काम करत आहे.गतवर्षी ०१ हजार कोटी रुपये खर्च केले आहे.कोपरगावात लॉजिस्टिक सारखा एखादा उद्योगाला निधी द्यायला तयार आहे.वाढवण बंदर हे जगातले सर्वात मोठे बंदर निर्माण करत आहोत.राज्याने सर्वात जास्त शेतकरी माळ विकत घेतला आहे.त्यात सोयाबीन,मका,कापूस खरेदी करून दहा हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले आहे.कांदा पिकाबद्दल कायम अडचण निर्माण होत आहे.म्हणून लघु व दीर्घकाळासाठी प्रकल्प राबवणार आहे.त्यासाठी कांदा महाबँक निर्माण करणार आहे.साठवणूक,पॅकिंग,पेस्ट निर्माण करून त्याला न्याय देणार आहे. ब्रॅण्डिंग,पॅकिंग, सॉर्टिंग मशीन उपलब्ध करून देऊन मूल्यवर्धन करणार आहे. दुबईशी करार करून कांद्याला भाव देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.कोपरगाव बाजार समितीचे काम चांगले आहे.आगामी काळात एक ते दीड वर्षात लवकरच या शेतकरी भवनाचे लोकार्पण करू असे आश्वासन दिले आहे.

  सदर प्रसंगी प्रास्ताविक सभापती साहेबराव रोहोम यांनी केले त्यावेळी त्यांनी अडीच वर्षाचा हिशोब सादर केला आहे.त्यात त्यांनी ४-५ तालुक्यातून कांदा येतो.त्या शेतकऱ्यांसाठी निधी मंजूर केल्याबद्दल मंत्री रावल यांचे अभिनंदन केले आहे.तिन्ही वर्षी चांगला कारभार केल्याचा दावा केला आहे.बाजार समितीने ०१ कोटींचा रस्ता केला त्याचे उद्घाटन केले,बैल बाजाराचे उत्पन्न वाढवले,पिण्याचे पाण्याची सोय केली,५० लाख रुपयांच्या भाजीपाला लिलाव सोयी साठी शेड निर्माण केले आहे.तिळवणी येथे ६०-७० लाखांचे काँक्रीटीकरण केले,तीन उपबाजार मंजूर केले, धामोरी,रांजणगाव देशमुख,पोहेगाव आदीचा त्यात समावेश आहे.पेट्रोल पंप सुरू करीत आहे.राज्याचे मंत्र्यांनी निर्यातीला परवानगी दिली आहे.बाजार समितीला कर्मचारी मंजूर करावे असे आवाहन केले आहे.बाजार समितीला पुरस्कार मिळाला असल्याचे सांगून त्यासाठी माजी आ.कोल्हे,कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांचे मोठे सहकार्य मिळाले असल्याचे शेवटी सांगितले आहे.

कार्यक्रमाला उपस्थित शेतकरी आणि नागरिक.

यावेळी माजी आ. स्नेहलता कोल्हे यांनी,”आपण सर्वांना बरोबर घेऊन काम करतो पण ज्यांना निवडून दिले ते आ.आशुतोष काळे हे अनुपस्थित असल्याबाबद खेद व्यक्त करून त्यांनी विधानसभा निवडणुकीत काळे यांना निवडून देऊनही ते अनुपस्थित राहिले मात्र ते सरकारमध्ये काम करत आहेत याची आठवण करून दिली आहे. व याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र त्यांच्या उमेदवाराला विजयी केल्याबद्दल आभार मानले असल्याची आठवण करून दिली आहे.

  दरम्यान आपले मनोगत व्यक्त करताना विवेक कोल्हे म्हणाले की,”बाजार समितीला जवळपास ११ कोटींची विकासकामे केली व ०५ कोटींचे उत्पन्न वाढवले असल्याचा दावा केला आहे.माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या कार्याचे स्मरण केले आहे.शेतकरी हित त्यांनी जपले आम्ही तोच वसा जपत आहे.आमचे बहुमत असले तरी काळे कोल्हेंचा आदर्श घेऊन निवडणुका बिनविरोध करत आलो आहे.पिण्याचे पाण्यासाठी एकत्र आंदोलन करतो असे सांगून उपबाजार सुरू केले असल्याचे सांगून येथील काम पारदर्शक असल्याचा दावा केला आहे.सिलिंगच्या जमिनी जाऊन शेतकऱ्यांना १८ एकर जमिनी राहिल्या त्यानंतर तीन पिढ्या झाल्या आहेत.(पण पाणी कोणी हिरावले हे सांगण्याचे ते विसरले आहे) सरकारने कर्जमाफी केल्याबद्दल सरकारचे स्वागत केले आहे.व कृषी उत्पन्न निर्यातीसाठी मदत करण्याचे आवाहन केले आहे.पश्चिमेचे पाणी वळविण्यासाठी निधी द्यावा त्यामुळे त्याचा आमचा फायदा होईल असा आशावाद व्यक्त केला आहे.वर्तमानांत शेतकरी ऊर्जदाता झाला असल्याचे सांगितले आहे.त्यातून परकीय चलन वाचले आहे.मात्र त्यांनी आ.काळे,परजणे,औताडे अनुपस्थित राहिले असल्याचे सांगण्यास टाळले असल्याचे निदर्शनास आले आहे.

“देशात सरकारने युद्ध सुरू असताना सुद्धा अद्याप पेट्रोल,डिझेल भाववाढ न होता मिळत आहे.अशा प्रतिकूल स्थितीत मतभेद बाजूला ठेवून काम करायला हवे असे सांगून (अनुपस्थित काळे-परजणे) विरोधकांवर बोट ठेवले.राजकारण तेवढ्यापुरते करायला हवे असे आवाहन केले.माझा फोटो छापला नाही म्हणून कोणी येत नसेल तर अवघड आहे.असे म्हणून जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे,राजेश परजणे यांच्यावर टीका केली आहे.नेत्यांची भूमिका कशी असायला हवी असा सवाल उपस्थित करत आपण आपला फोटो लावला नाही तरी कोणावर रुसलो नाही”- बिपीन कोल्हे,माजी अध्यक्ष,संजीवनी सहकारी साखर कारखाना.

  यावेळी संजीवनी कारखान्याचे माजी अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी आम्ही तीन वेळा बाजार समिती निवडणूक बिनविरोध केली आहे.राहाता उपबाजार समितीला कोपरगाव बाजार समितीने विकत घेतलेली जागा दिली असल्याची आठवण करून देऊन परजणे यांना आठवण करून दिली असल्याचे दिसून आले आहे.त्यावेळी त्यांनी माजी मंत्री कोल्हे यांचा रुमणे मोर्चा,’वीज मीटर फेको ‘ आंदोलन केले आहे.खंडकरी शेतकऱ्यांची जमीन सोडून देण्याचे अनेक महिने आंदोलन केले आहे.शेती पाण्याचे आंदोलने केली व शेतकऱ्यांचे कल्याण केले आहे.पणन मंत्री जयकुमार रावल यांनी त्यांची नगरपालिका मोठ्या सायानाने बिनविरोध केल्याबद्दल अभिनंदन केले आहे.त्यावेळी देशात अद्याप पेट्रोल,डिझेल भाववाढ न होता मिळत आहे.अशा स्थितीत मतभेद बाजूला ठेवून काम करायला हवे असे सांगून अनुपस्थित विरोधकांवर बोट ठेवले.राजकारण तेवढ्यापुरते करायला हवे असे आवाहन केले.माझा फोटो छापला नाही म्हणून कोणी येत नसेल तर अवघड आहे.असे म्हणून जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे,राजेश परजणे यांच्यावर टीका केली आहे.नेत्यांची भूमिका कशी असायला हवी.आपण आपला फोटो लावला नाही तरी कोणावर रुसलो नाही.सन-२०१२ साली निर्मळ पिंपरी येथे निळवंडेचे आंदोलन केले आपल्याला छातीत त्रास झाला होता. व नंतर आपल्याला अँजिओप्लास्टी करावी लागली असल्याची आठवण करून दिली आहे.मध्येच भाषण थांबण्याची चिठ्ठी आली.याचा संदर्भ देऊन आम्ही थांबायला तयारच आहोत.आपण राष्ट्रीय पातळीवर १४ संस्थावर काम केलं.पण फोटोची अपेक्षा केली नाही.

  सदर प्रसंगी माजी आ.स्नेहलता कोल्हे यांनी,”आपण सर्वांना बरोबर घेऊन काम करतो पण ज्यांना निवडून दिले ते आ.आशुतोष काळे हे अनुपस्थित असल्याबाबद खेद व्यक्त करून त्यांनी विधानसभा निवडणुकीत काळे यांना निवडून देऊनही ते अनुपस्थित राहिले मात्र ते सरकारमध्ये काम करत आहेत याची आठवण करून दिली आहे. व याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र त्यांच्या उमेदवाराला विजयी केल्याबद्दल आभार मानले असल्याची आठवण करून दिली आहे.तर सूत्रसंचालन श्री.कांबळे सर यांनी केले आहे तर उपस्थितांचे आभार प्रकाश गोर्डे यांनी मानले आहे.

  

  

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close