पणन
कांदा उत्पादकांना ५२.७१लाखाचे अनुदान मंजूर-…यांची माहिती

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी असून,तालुक्यातील २१० शेतकऱ्यांना एकूण ५२ लाख ७१ हजार ६४४ रुपये कांदा अनुदान मंजूर झाल्याची माहिती जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी दिली आहे.या अनुदान मंजुरीबद्दल त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पणन मंत्री जयकुमार रावल यांचे आभार मानले आहेत.

“शासन निर्णयानुसार १ फेब्रुवारी २०२३ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच खाजगी बाजारात या शेतकऱ्यांनी कांदा विक्री केली होती. मात्र,संबंधित शेतकऱ्यांच्या ७/१२ उताऱ्यावर आवश्यक नोंदी नसल्याने त्यांना शासनाच्या कांदा अनुदान योजनेत अपात्र ठरविण्यात आले होते.त्यांना या अनुदानाचा लाभ होणार आहे”-विवेक कोल्हे,अध्यक्ष महर्षी कोल्हे सहकारी साखर कारखाना.
याबाबत कोल्हे यांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की,”अहिल्यानगर जिल्ह्यात सन २०२२-२३ या कालावधीत एकूण १४०७ कांदा उत्पादक शेतकरी अनुदानासाठी अपात्र ठरविण्यात आले होते.यामध्ये कोपरगाव तालुक्यातील २१० शेतकऱ्यांचा समावेश होता.या शेतकऱ्यांच्या समस्या लक्षात घेऊन त्यांनी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला असल्याचा दावा केला आहे.

शासन निर्णयानुसार १ फेब्रुवारी २०२३ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच खाजगी बाजारात या शेतकऱ्यांनी कांदा विक्री केली होती. मात्र,संबंधित शेतकऱ्यांच्या ७/१२ उताऱ्यावर आवश्यक नोंदी नसल्याने त्यांना शासनाच्या कांदा अनुदान योजनेत अपात्र ठरविण्यात आले होते.या अन्यायाविरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पणन मंत्री जयकुमार गोरे यांच्या दालनात तसेच शासनाकडे आणि अहिल्यानगर जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता.या प्रयत्नांना यश येत,जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी २७ नोव्हेंबर २०२५ रोजीच्या पत्रान्वये फेरछाननीनंतर अंतिम पात्र लाभार्थ्यांना प्रलंबित कांदा अनुदान वितरित करण्याचे आदेश दिले.
या निर्णयामुळे कोपरगाव तालुक्यातील २१० कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून,शेतकऱ्यांच्या न्यायहक्कासाठी शासन दरबारी सातत्याने आवाज उठवण्याची भूमिका पुढेही कायम राहील,असे विवेक कोल्हे यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात शेवटी म्हटले आहे.



