पणन
दान दोन कोटीचे,मात्र कार्यक्रम पत्रिकेत सरपंचाचे नावही नाही,ग्रामस्थांत संताप !

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथे नुकतेच दोन कोटी रुपये मूल्य असलेल्या कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार आवाराचे भूमिपूजन करण्यात आले असले तरी त्या कार्यक्रमास यजमान असलेल्या ग्रामपंचायतीच्या सरपंच जिजाबाई गजानन मते यांचेसह गावातील बहुसंख्य ग्रामस्थांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली असल्याचे उघड झाले आहे.त्याची सर्वत्र उलटसुलट चर्चा होत आहे.दरम्यान यात कोट्यवधी रुपयांच्या जमिनीचे योगदान देऊनही ग्रामपंचायतीला एक रुपयाचे उत्पन्न मिळणार असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

दरम्यान मिळालेल्या माहिती नुसार सदर कार्यक्रम निमंत्रण पत्रिकेत 05 हजार 500 लोकसंख्येचे गाव असलेल्या आणि दोन कोटी रुपयांच्या जमिनीचे दान देणाऱ्या रांजणगाव देशमुख ग्रामपंचायतीचे प्रथम नागरिक आणि सरपंच यांची ‘क ‘ पदार्थ समजून साधा उल्लेख सुद्धा केला नव्हता,सदर कोनशिलेवर त्यांचे संक्षिप्त नाव सुद्धा आढळून आले नाही.त्यामुळे ग्रामस्थांतून ही नाराजी असल्याचे माहिती उघड झाली आहे.
कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती आपल्या वादग्रस्त निर्णयाबाबत वारंवार गाजली जात असते यावेळी त्याचा अपवाद नाही.बाजार समितीने कोपरगाव तालुक्यातील नैऋत्येकडे दुष्काळी समजल्या जाणाऱ्या तेरा गावांसाठी गेली पंचवीस वर्षांपासून उपबाजारची मागणी जवळके येथे केली होती.त्याबाबत तीन सभापतींनी वेळोवेळी ठराव करून स्थळ पाहणी करून पसंती दर्शवली होती.त्यासाठी दिनांक 12 डिसेंबर 2012 रोजी भूमिअभिलेख कार्यालयात 13 हजार 500 रुपयांची मोजणी फी भरली होती व सदर क्षेत्र मोजून घेतले होते.तब्बल चौथ्यांदा जवळके ग्रामपंचायतीने याबाबत ग्रामसभेचा डिसेंबर 2023 मध्ये ठराव करून त्याची मागणी जानेवारी 2024 मध्ये इतर जवळपास तेरा पैकी अकरा ग्रामसंभांचे ठराव करून पाठवले होते.मात्र जवळके ग्रामपंचायत आपल्याला ओंजळीने पाणी पीत नाही.या राजकीय आकसापोटी अकरा गावांचा विरोध डावलून भौगोलिक दृष्ट्या अयोग्य ठिकाणी संगमनेर तालुक्याच्या सीमारेषेवर सदर जवळके ग्रामपंचायतींचा ठरावानंतर आपल्या हितेशी आणि सोयीच्या ठिकाणी आपल्या बाहुल्या समर्थक संचालकामार्फत तब्बल दहा महिन्यांनी ठराव करून तो घुसडवला असल्याचे उघड झाले आहे.शिवाय सदर ग्रामपंचायतीने संगमनेर तालुक्यात समाविष्ट होण्यासाठी दि.17 सप्टेंबर रोजी ठराव घेतला असल्याचे उघड झाले आहे.तरीही आतबट्ट्याचा हा सौदा करून कोणासाठी कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती काम करत आहे असा सवाल निर्माण झाला आहे.

आमच्या प्रतिनिधीने याबाबत गावपातळीवर माहिती घेतली असता कृषी उत्पन्न बाजार समिती आणि रांजणगाव देशमुख ग्रामपंचायतीत दि.17 ऑक्टोबर 2025 रोजी एक एकवीस वर्षासाठी जागेबाबत करार झाला असल्याची खात्रीलायक माहिती उपलब्ध झाली आहे.असून त्यात ग्रामपंचायतीला किती भाडे मिळणार याचा कोणताही उल्लेख केलेला नाही.तर दुसऱ्या माहिती नुसार सदर जमिनीचे भाडे हे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मिळणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.त्यामुळे ग्रामस्थांत अच्छा खांसा रोष आहे.
दरम्यान या कार्यक्रमास यजमान असलेल्या सरपंच आणि ग्रामस्थांना साधे मनोगत व्यक्त करण्याची संधी प्रस्तापित लोकप्रतिनिधी आणि उपस्थित नेत्यांनी न दिल्याने त्यात आणखी नाराजीची भर पडली असल्याचे उघड झाले आहे.याबाबत प्रमुख कार्यकर्ते आणि गाव प्रमुखांना आधीच माहिती असावी असा कयास व्यक्त होत आहे.त्यामुळे त्यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली असल्याचे बोलले जात आहे.वरिष्ठ नेते आणि त्यांच्यात मोठा वाद झाला असल्याच्या बातम्या आहेत.याबाबत तेथील रहिवासी आणि कोपरगाव वकील संघाचे सदस्य ऍड.योगेश खालकर यांनी मोठी नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान या कार्यक्रमांत वकील संघाचे सदस्य ऍड.योगेश खालकर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की,”आपण तळेगाव दिघे मार्गे संगमनेर नादुरुस्त रस्त्यासह गावात एकही राष्ट्रीयकृत बँक नाही,निळवंडे कालव्याच्या चाऱ्यांचे काम अद्याप सुरू केले नाही आणि स्थानिक समस्या मांडणार असल्याने आपल्याला प्रस्थांपितांनी गावचे एकमत असताना बोलू दिले नाही त्यामुळे त्यांनी संताप व्यक्त केला आहे.
दरम्यान मिळालेल्या माहिती नुसार सदर कार्यक्रम निमंत्रण पत्रिकेत रस्त्यालगत असलेल्या दोन कोटी रुपयांच्या जमिनीचे दान देऊनही रांजणगाव देशमुख ग्रामपंचायतीचे प्रथम नागरिक आणि सरपंच यांची ‘क’ पदार्थ समजून साधा उल्लेख सुद्धा केला नव्हता,सदर कोनशिलेवर त्यांचे संक्षिप्त नाव सुद्धा आढळून आले नाही.त्यामुळे ग्रामस्थांतून ही नाराजी असल्याचे माहिती उघड झाली आहे.याबाबत आमच्या प्रतिनिधीने सदर पदाधिकारी यांचेशी संपर्क केला असता त्यांनी याबाबत नाराजी व्यक्त करत,”आपल्याला याबाबत काहीही म्हणणे द्यायचे नाही’ अशी एका ओळीत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.दरम्यान या घटनेत गावात वाद होऊनही गावाचे काहीही साध्य झाले नाही.”दलालाचे हात कोळशाने काळे” अशी एक मराठी म्हण आहे.त्याचा कडवा प्रत्यय रांजणगाव देशमुख ग्रामस्थ आणि पदाधिकारी घेत असल्याचे नागरिक बोलत आहे.यातून ग्रामपंचायतीला एक रुपयाचे उत्पन्न मिळणार नाही ‘ अशी माहिती जबाबदार नागरिक आणि कार्यकर्त्यांकडून उघड झाली आहे.

दरम्यान याबाबत आमच्या प्रतिनिधीने याबाबत गावपातळीवर माहिती घेतली असता कृषी उत्पन्न बाजार समिती आणि रांजणगाव देशमुख ग्रामपंचायतीत दि.17 ऑक्टोबर 2025 रोजी एक एकवीस वर्षासाठी जागेबाबत करार झाला असल्याची खात्रीलायक माहिती उपलब्ध झाली आहे.असून त्यात ग्रामपंचायतीला किती भाडे मिळणार याचा कोणताही उल्लेख केलेला नाही.सार्वजनिक बांधकाम विभाग त्याचे मूल्यांकन करून त्याचे भाडे ठरवणार असल्याचे म्हंटले आहे.सदर संगमनेर रस्त्यालगतच्या 1.60 हेक्टर जागेचे मूल्य जवळपास दोन कोटी असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.तथापि त्या जागेचे भाडे मात्र अहिल्यानगर येथील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना मिळणार असल्याची विश्वसनीय माहिती उपलब्ध झाली आहे.त्यामुळे रांजणगाव देशमुख ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.तर जागा न देऊन जवळके ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
————————-
*पत्रकार नानासाहेब जवरे यांच्या विश्वसनीय बातम्यासाठी ‘न्यूजसेवा‘ वाचा आणि खालील लिंकवर क्लिक करून ग्रुप’मध्ये सामील व्हा*.
*न्यूजसेवा* डिजिटल युग डिजिटल बातमी.



