पणन
शेतकऱ्यांचे कांदा अनुदान जमा -…यांची माहिती

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
शासनाने दोन वर्षापूर्वी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल ३५० रुपये अनुदान जाहीर केले होते,मात्र अनेक शेतकरी या अनुदानापासून वंचित होते.त्याबाबत केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून महायुती शासनाकडून कोपरगाव तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ५२ लाख ७१ हजार ६४४ रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.

राज्य सरकारने कांद्याचे भाव पडल्यावर शेतकऱ्यांना २०० क्विंटलच्या मर्यादेत प्रतिक्विंटल ३५० रुपये अनुदान देण्याचे जाहीर केले होते. या योजनेतील काही अर्ज प्रलंबित होते. अशा १४,६६१ शेतकऱ्यांना २८ कोटी ३२ लाख ३० हजार ५०७ रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे.त्यात कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचा समावेश आहे.
राज्यात सन -२०२३ मध्ये उन्हाळी कांद्याच्या दरात मोठी पडझड झाली होती.त्यानंतर शेतकऱ्यांना २०० क्विंटलच्या मर्यादेत प्रतिक्विंटल ३५० रुपये अनुदान देण्याचे जाहीर केले होते. या योजनेतील काही अर्ज प्रलंबित होते. अशा १४,६६१ शेतकऱ्यांना २८ कोटी ३२ लाख ३० हजार ५०७ रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. या अनुदानाचा अहिल्या नगर जिल्ह्यासह कोपरगाव तालुक्याला मोठा सर्वाधिक लाभ होणार आहे.

“कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा दिला असून पात्र असलेल्या परंतु तांत्रिक अडचणीमुळे अनुदान न मिळालेल्या एकूण २१० शेतकऱ्यांना ५२ लाख ७१ हजार ६४४ रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे असल्याचे समजते मात्र उद्या याबाबत सहकारी जिल्हा निबंधक यांचेकडून बाजार समितीनिहाय अधिकृत माहिती मिळू शकेल -“नानासाहेब रणशूर,सचिव,कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती.
कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती,खासगी बाजार समिती व नाफेडला १ फेब्रुवारी २०२३ ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत लाल कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्रती शेतकरी २०० क्विंटल पर्यंत ३५० रुपये प्रती क्विंटल याप्रमाणे अनुदान मंजूर करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता.परंतु काही तांत्रिक अडचणी व कागदपत्रांची अपूर्तता यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अनुदानासाठी पात्र असतांना देखील त्यांना अनुदान मिळाले नव्हते.
हि बाब लक्षात घेवून आ. काळे यांनी मतदार संघातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळावे यासाठी मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांना समक्ष भेटून लेखी निवेदन देखील दिले होते. व आजतागायत त्यांचा पाठपुरावा सुरु होता. त्या पाठपुराव्यातून अखेर महायुती शासनाने कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा दिला असून पात्र असलेल्या परंतु तांत्रिक अडचणीमुळे अनुदान न मिळालेल्या एकूण २१० शेतकऱ्यांना ५२ लाख ७१ हजार ६४४ रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून त्यांनी आ. काळे यांचे आभार मानले आहे.केलेल्या पाठपुराव्याची दखल घेवून ५२.७१ लाख रुपये अनुदान मंजूर केल्याबद्दल त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचे आभार मानले आहे.