जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
पणन

… या गावाला भरला आठवडे बाजार !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)


कोपरगाव तालुक्यातील पुर्व भागात कोपरगाव वैजापूर रस्त्यालगत असलेल्या पढेगावला आठवडे बाजार भरावा हि ग्रामस्थांची संकल्पना होती.त्यासाठी पंधरा दिवसांपासून तसा प्रचार करण्यात आला आणि मंगळवारी मोठ्या दिमाखात उत्साहपूर्वक वातावरणात आठवडे बाजाराचा शुभारंभ झाला आहे.

दिवसेंदिवस पढेगावची लोकसंख्या वाढली ग्रामस्थ शेजारच्या बाजारात मोठ्या संख्येने खरेदीसाठी जात होते ही बाब ओळखून नागरीकांनी ग्रामपंचायतला बाजार भरविण्याची गळ घातली होती.ग्रामपंचायतने हा प्रस्ताव मान्य केल्याने हा उपक्रम सुरू झाला आहे.


     
आठवडी बाजार म्हणजे दर आठवड्याच्या एका विशिष्ट दिवशी व विशिष्ट स्थानी भरणारा बाजार होय.या ठिकाणी विक्रेते आपापला माल घेऊन येतात व विक्री करतात.ज्या ठिकाणी भरपूर दुकाने नाहीत व अशी दुकाने असणाऱ्या ठिकाणी जाणे गैरसोयीचे व आर्थिक दृष्ट्या परवडणारे नसते,तेथे अशा प्रकारचा बाजार भरविला जातो. त्यातून परिसरातील शेतकऱ्यांची आपला माल विकण्याची व्यवस्था होत असते.पढेगाव येथे असा बाजार नुकताच सुरू झाला आहे.या ठिकाणी पूर्वी आठवडे बाजार भरत होता.त्यात १९८७ साली शुक्रवारी भरणारा आठवडे बाजार बरेच दिवस भरला मात्र ग्रामस्थांकडून त्यावेळी फारसा प्रतिसाद न मिळाल्यामुळे तो लवकरच बंद पडला होता.दिवसेंदिवस गावची लोकसंख्या वाढली गावातील नागरीक शेजारच्या बाजारात मोठ्या संख्येने खरेदीसाठी जातात.हि गरज ओळखून नागरीकांनी ग्रामपंचायतला बाजार भरविण्याची गळ घातली.ग्रामपंचायतनेही हिरारीने पुढाकार घेतला पंचक्रोषीत भरत असलेल्या आठवडा बाजारात भाजी विक्रेते,खाऊ,खेळणी सर्वच प्रकारच्या दुकानदारांना जाहिरात पत्रके वाटली.मंगळवारी हनुमान मंदिराच्या प्रांगणापासुन ते मुख्य रस्त्यावर सकाळी दहा वाजता चांगला बाजार भरला गावातील नागरीक,महिला,लहान मुलांनांही कुतुहल वाटत असल्याने खरेदीची मोठी लगबग बघायला मिळाली आहे.या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close