जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
पणन

कांदा लिलाव बंदच,जिल्हा निबंधक काय कारवाई करणार ?

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)        

केंद्र सरकारने कांदा निर्यात शुल्क वाढवून ४० टक्के इतकं केलं होते.केंद्राच्या या निर्णयाविरोधात नगरमधील बाजार समितीच्या व्यापाऱ्यांनी व शेतकऱ्यांनी कांद्याची खरेदी-विक्री बेमुदत काळासाठी बंद केली होती.मात्र सरकारने बाजार समित्या सुरु करण्याचा आदेश काढून,”त्या जर केल्या नाही तर व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करण्याची” धमकी देऊनही आज संपूर्ण दिवस शिरसगाव वगळता कोपरगाव बाजार समिती बंदच ठेवली गेली याला जबाबदार कोण ? अशी चर्चा रंगली असून बंद ठेवणऱ्यांविरुद्ध सरकार काय कारवाई करणार ? असा सवाल निर्माण झाला आहे.

“कोपरगाव बाजार समितीचे लिलाव सुरु करण्याचे आदेश असताना ते बंद ठेवले गेले असल्याने शासनाच्या आदेशाला कोपरगाव बाजार समितीने केराची टोपली दाखवली असल्याचे दिसून आले आहे.व शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.त्याला जबाबदार कोण ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.संबंधितांवर सहकार विभागाचे जिल्हा निबंधक काय कारवाई करणार”-प्रवीण शिंदे,संपर्क प्रमुख शिवसेना उद्धव गट व कांदा उत्पादक शेतकरी.

राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी याबाबत नुकतीच केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांची भेट घेतली होती.यावेळी गोयल यांनी राज्यातील दोन लाख मेट्रिक टन कांदा ‘नाफेड’ कडून ०२ हजार ४१० रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी असल्याचं आश्वासन दिलं होतं.मात्र निर्यात शुल्काबाबत ठोस निर्णय झाला नाही.त्यामुळे शेतकरी आणि व्यापारी अजूनही त्यांच्या भूमिकेवर कायम आहेत.त्यामुळे अ.नगरसह राज्यातील बाजार समित्यांचे लिलाव  सुरु करावे असे आवाहन अ.नगर जिल्हा सहाय्यक निबंधक यांनी केले आहे अन्यथा आपण त्याचे परवाना रद्द करू असा इशारा दिला होता.असे असताना कोपरगावात मात्र बाजार समिती व्यापाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचत असतांना दिसत आहे.त्यात अधिकारी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून व्यापाऱ्यांची बाजू घेत असल्याची विश्वसनिय माहिती उपलब्ध झाली आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

काल आमच्या प्रतिनिधीने संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी कोपरगाव येथील मुख्य बाजार समिती सुरु राहणार असल्याची बतावणी केली होती.मात्र आज दिवसभर बाजार समितीत कांदा लिलाव झाल्याचे दिसले नाही.आमच्या प्रतिनिधीने याबाबत बाजार समितीत समक्ष भेट दिली असता त्या ठिकाणी कोणतेही लिलाव झाले असल्याचे दिसून आले नाही.त्यामुळे  शासनाच्या आदेशाला कोपरगाव बाजार समितीने केराची टोपली दाखवली असल्याचे दिसून आले आहे.व शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.त्याला जबाबदार कोण ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.संबंधितांवर सहकार विभागाचे जिल्हा निबंधक काय कारवाई करणार असा सवाल उद्धव गट शिवसेनेचे संपर्क प्रमुख प्रवीण शिंदे यांनी विचारला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close