जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
न्यायिक वृत्त

‘त्या’ लाचखोर अधिकाऱ्याच्या जामीनाबाबत झाला हा निर्णय

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगावचे तहसीलदार विजय जबाजी बोरुडे व त्यांना लाच घेण्यात मदत करणारा आरोपी गुरमितसिंग दडियाल या दोन आरोपीना वाळूचोरीतील वाहनांवर कारवाई न करण्यासाठी २० हजार रुपयांची लाच घेताना नुकतीच त्यांना चार दिवसापूर्वी अटक करण्यात आली होती त्यांची दोन दिवसांची पोलीस कोठडी काल संपल्याने त्यांना कोपरगाव येथील न्यायमूर्ती रजेवर असल्याने आज पुन्हा एकदा नेवासा येथील जिल्हा व सत्र न्यायालयात न्या.जी.बी.जाधव यांचे समोर आज दुपारी ३.३० वाजता हजर केले असता त्यांची ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्याच्या जामिनावर मुक्तता केली असल्याची माहिती नाशिक येथील लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

दरम्यान पहिल्या एका महिलेच्या विनयभंग प्रकरणात सदर तहसीलदार विजय बोरुडे यास तालुक्यातील नेत्यांनी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाठीशी घातले होते.व बदली करण्याऐवजी त्यास त्याच जागी नेमणूक करून उपकृत केले होते.आता या लाच प्रकरणाची विभागीय चौकशी करणार असल्याची घोषणा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी वैजापूर दौऱ्यावर असताना केली आहे.मात्र जिल्ह्यातील अन्य अधिकारी आणि राजकीय नेते निलंबित करणार की त्यांस पाठीशी घालणार आहे का ? याकडे तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फिर्यादी (वय-३३) यांनी आपले वाळूचोरीत पकडलेल्या वाहनावर कारवाई न होण्यासाठी तहसीलदार विजय बोरुडे याने आपल्या गुरमितसिंग दडीयाल या हस्तकांमार्फत २० हजार रुपयांची लाच मागितली होती.त्यावर नाराज होऊन फिर्यादीने हा सापळा लावला होता.त्यातून कोपरगावचा तहसीलदार विजय बोरुडे (वय-४४) हा आपल्या हस्तकांमार्फत सुमारे २० हजारांचा हप्ता पंचासमक्ष घेताना नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप्पधीक्षक प्रवीण लोखंडे यांच्या पथकाकडून पडकले गेले आहे.त्यांना सहकार्य करणारा इसम गुरमीतसिंग दडियाल (वय ४०) रा.कोपरगाव यास हि दि.१९ मे रोजी सायंकाळी तहसील कार्यालयाच्या कोपऱ्यावर असलेल्या हॉटेल मध्ये काल सायंकाळी ०७ वाजेच्या सुमारास रंगेहात पकडले होते.

त्यावेळी नाशिक लाचलुचपत विभागाचे उपअधीक्षक प्रवीण लोखंडे यांना पोलीस हवालदार पंकज पळशीकर,पो.नाईक नितीन कराड,प्रवीण महाजन,प्रभाकर गवळी,चालक पो.ना.संतोष गांगुर्डे आदींनी महत्वपूर्ण भूमिका निभावली होती.या आरोपींना लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी कोपरगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयासमोर हजर केले असता त्या दोघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.त्याची मुदत काल संपली होती.मात्र कोपरगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालय हजर नसल्याने व श्रीरामपूर येथील तीच स्थिती असल्याने त्या आरोपीना थेट नेवासा येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या.जी.बी.जाधव यांचे समोर सलग दुसऱ्या दिवशी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास हजर केले होते.त्यावेळी न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून आरोपी तहसीलदार विजय बोरुडे व दडियाल यांची न्यायिक कोठडीतुन आज ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला असल्याची माहिती लाचलुचपत विभागाचे उपअधीक्षक प्रवीण लोखंडे यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close